Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माय स्टार्ट अप सिझन 4 - 0

 माय स्‍टार्टअप सीझन ४.०


ब्रिटानिया मारी गोल्‍डचा माय स्‍टार्टअप उपक्रम महिला उद्योजिका बनण्‍यास व आर्थिकदृष्‍ट्या स्‍वावलंबी बनण्‍यास प्रेरित


·      १० महिला उद्योजकांसाठी १ कोटी रूपये सीड फंड 


·     २ दशलक्षहून अधिक इच्‍छुकांकडून प्रतिसाद मिळाला, जो आतापर्यंतचा सर्वोच्‍च   


 



एप्रिल २०२३: ब्रिटानिया मारी गोल्‍ड माय स्‍टार्टअप उपक्रमाने त्‍यांच्‍या चौथ्‍या सीझनच्‍या अव्‍वल दहा विजेत्‍यांची घोषणा केली आहे आणि त्‍यांचा व्‍यवसाय उद्यम सुरू करण्‍यास मदत करण्‍यासाठी प्रत्‍येकाला १० लाख रूपये बक्षीसासह सन्‍मानित केले आहे. 


ब्रिटानिया मारी गोल्‍डचा माय स्‍टार्टअप उपक्रम हे व्‍यासपीठ आहे, जे महिलांना उद्योजिका बनण्‍यास आणि बदल्‍यात रोजगार निर्मात्‍या व आर्थिकदृष्‍ट्या स्‍वावलंबी बनण्‍यास प्रेरित करते. यशस्‍वीरित्‍या ४ सीझन्‍स राबवत या प्रमुख उपक्रमाला या सीझनमध्‍ये २ दशलक्षहून अधिक इच्‍छुकांचा प्रतिसाद मिळाला आहे. ब्रिटानिया मारी गोल्‍ड टीम ८०,००० हून अधिक सहभागींना व्‍यवसाय कौशल्‍य प्रशिक्षण उपक्रमासह प्रशिक्षित करण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरली आहे.  


यंदा शॉर्टलिस्‍ट करण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धकांनी ज्‍यूरी सदस्‍यांच्‍या प्रख्‍यात पॅनेलसमोर त्‍यांच्‍या संकल्‍पना सादर केल्‍या. या पॅनेलमध्‍ये रश्‍मी डागा, सैरी चहल, पिया बहादूर, लता चंद्रमौली आणि रूचिका भुवाल्‍का यांसारख्या महिला उद्योजकांचा समावेश होता. ज्‍यूरीमध्‍ये ब्रिटानियाच्‍या लीडरशीप टीममधील सदस्‍यांसह प्रख्‍यात व्‍यवसाय व मीडिया व्‍यक्तिमत्त्वांचा देखील समावेश होता.



ब्रिटानिया मारी गोल्‍डच्‍या माय स्‍टार्टअप उपक्रमाने यशस्‍वी चार सीझन्‍स राबवले आहेत, ज्‍यामधून उदयोन्‍मुख महिला उद्योजकांना निधीसाह्य व स्किलिंग सपोर्ट मिळण्‍यासाठी इकोसिस्‍टम प्रदान करत आहे. ४ वर्षांदरम्‍यान उपक्रमाने आर्थिक साक्षरता, सूक्ष्म उद्योजकीय कौशल्ये आणि व्यावसायिक वातावरणात आवश्यक संभाषण कौशल्ये यावर ऑनलाइन प्रशिक्षण देण्यासाठी नॅशनल स्किल्‍स डेव्‍हपमेंट कौन्सिल (एनएसडीसी) व गुगल यांसारख्‍या कंपन्‍यांसोबत सहयोग केला आहे.


ब्रिटानिया मारी गोल्‍ड माय स्‍टार्टअप कॉन्‍टेस्‍ट ४.० च्‍या फिनालेबाबत सांगताना ब्रिटानिया इंडस्‍ट्रीज लिमिटेडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अमित दोशी म्‍हणाले, ‘‘काळासह ब्रिटानिया मारी गोल्‍डने देशभरातील महिलांसोबत दृढ संबंध स्‍थापित केले आहेत. वर्ल्ड बँक स्‍टडीनुसार प्रत्‍येकी शंभरमधून फक्‍त सात उद्योजक महिला आहेत. मिनिस्‍ट्री ऑफ स्‍टॅटिस्टिक्‍स अॅण्‍ड प्रोग्राम इम्‍प्‍लीमेन्‍शनच्‍या ६व्‍या आर्थिक जनगणनेनुसार भारतात एकूण उद्योजकांमध्‍ये फक्‍त १३.७६ टक्‍के महिला आहेत. माय स्‍टार्टअप उपक्रमासह आमची भारतातील उद्योजकता परिसंस्‍थेत महिलांचे प्रतिनिधित्‍व स्थिर गतीने व शाश्‍वतपणे वाढवण्‍याचे मिशन आहे. हा उपक्रम आर्थिक सहाय्यता, कौशल्‍य व बाजारस्‍थळ उपलब्‍धता या ३ प्रमुख आवश्‍यकतांवर लक्ष केंद्रित करतो. सीझन ४ मध्‍ये आम्‍हाला भारतभरातील २ दशलक्षहून अधिक इच्‍छुकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला, जी आतापर्यंतची सर्वोच्‍च आकडेवारी आहे. या सीझनमधील आमचे विजेते देशातील काही दुर्गम नगर व गावांमधील आहेत आणि त्‍यांनी त्‍यांच्‍या व्‍यवसाय संकल्‍पनांना प्रकाशझोतात आणण्‍यासाठी अविश्‍वसनीय धैर्य व उत्‍कटता दाखवली आहे. ब्रिटानिया सल्लागाराची भूमिका बजावेल आणि विजेत्यांना त्यांच्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात करताना मदतीचा हात पुढे करेल.’’

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.