Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एनसीपीए चे वतीने अक्रम खान यांच्या जेनोस या पूर्णाकृती एकल सादरीकरणाचे आयोजन

 एनसीपीए’च्या वतीने अक्रम खान यांच्या ज़ेनोस या शेवटच्या पूर्णाकृती एकल सादरीकरणाचे आयोजन  


प्रख्यात नृत्यदिग्दर्शक अक्रम खान यांचे नर्तक म्हणून बहुप्रतीक्षित अंतीम एकल सादरीकरण संपन्न होणार   


 



11 मे 2023, मुंबई: ज़ेनोस (XENOS) ही पहिल्या महायुद्धातील वसाहतवादी सैनिकाच्या अकथित कथेचा शोध घेणारी एक प्रभावी आणि अर्थपूर्ण कलाकृती आहे. अक्रम खान यांनी भारतीय उपखंडातील सैनिकांच्या अनेकदा दुर्लक्षित असलेल्या दुर्दशेवर एक विशिष्ट आणि विचार-प्रवर्तक भूमिका मांडली आहे. त्यांनी ब्रिटनसाठी नृत्य, संगीत आणि स्टेज डिझाइनद्वारे लढा दिला. 24 आणि 25 जून 2023 रोजी मुंबईतील NCPA च्या जमशेद भाभा थिएटर येथे अक्रम खान कंपनीच्या "XENOS" या पुरस्कारप्राप्त रंगमंचीय नृत्य निर्मितीचे शेवटचे प्रकटीकरण आयोजित करण्यात येत असल्याची माहिती देताना नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (NCPA) ला आनंद वाटतो.  


 

एक भारतीय नर्तक मानवी स्थितीचे सौंदर्य आणि भय ज़ेनोस (XENOS) च्या आधारे मांडतो. त्याचं शरीर हे युद्धाचं साधन बनते. ड्रामाटर्ग रूथ लिटल आणि प्रख्यात कॅनेडियन नाटककार जॉर्डन टनाहिल यांच्यासोबत, अक्रमने जर्मन डिझायनर मिरेला वेनगार्टन, पुरस्कार विजेते प्रकाशयोजनाकार मायकेल हल्स, वेशभूषाकार किमी नाकानो आणि संगीतकार विन्सेंझो लामाग्ना यांना आपल्या मंडळात सामील करून घेतले. त्यांनी पाच आंतरराष्ट्रीय संगीतकार म्हणजे तालवादक बी सी मंजुनाथ, गायक आदित्य प्रकाश, बास प्लेयर नीना हॅरीस, व्हायोलिन वादक फ्रा रुस्तुमजी आणि सॅक्सोफोन वादक तामार ओसबोर्न यांचाही समावेश कलाकृतीत आहे.  


 


एनसीपीए’चे चेअरमन श्री. खुशरू सुनटूक म्हणतात, "अक्रम खान हे NCPA मध्ये परतले आहेत, यंदा पूर्णाकृती अंतीम सादरीकरणासाठी नर्तकाच्या रूपात ते आले आहेत. या महत्त्वाच्या प्रसंगासाठी त्यांनी संकल्पनेची निवड केली. त्यांची ही संकल्पना पहिलं महायुद्ध आणि दक्षिण आशिया यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखली जाते. ज्याची ओळख तरुण पिढीला करून देणे आवश्यक आहे. आम्ही श्री. खान यांचं एकल नृत्यातील शानदार कारकिर्दीबद्दल अभिनंदन करतो. ते नृत्य-विश्वातील त्यांचं विचारप्रवर्तक कार्य सुरू ठेवतील ही आशा बाळगतो.”



AKC डायरेक्टर, कोरिओग्राफर, डान्सर श्री. अक्रम खान म्हणतात, “ज़ेनोस (XENOS) हे एक असं काम आहे, जे मला एक कलाकार म्हणून माझ्या वैयक्तिक प्रवासाशी सुसंगत वाटतं. आपल्या जगाबद्दल मला कसं वाटते याचं ते प्रतिबिंब होते आणि अजूनही आहे. मानवतेच्या हानीचं ते बोलकं उदाहरण म्हणता येईल आणि भूतकाळातील आणि सध्याच्या युद्धांद्वारे, आपण मानव असणं म्हणजे नेमकं काय या ज्वलंत प्रश्नाला पुन्हा कशाप्रकारे सामोरे जात आहोत यावर भाष्य करेल. माझ्या ज़ेनोस (XENOS) च्या भारतातील शेवटच्या सादरीकरणाद्वारे समारोप करणं हा एक कलाकार म्हणून माझ्या स्वत:च्या प्रवासाचा कायमच एक महत्त्वाचा घटक वाटला आहे. कोणताही संबंध नसूनही युद्ध लढलेल्या सर्व भारतीय सैनिकांना ही एक मार्मिक श्रद्धांजली वाटेल. मुंबईतील NCPA च्या साथीने माझ्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट घेताना मला अभिमान वाटतो.”





अक्रम खान हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित नर्तक व नृत्यदिग्दर्शक आहेत. गेल्या 22 वर्षांमध्ये, त्यांनी करिअर विकसित केलं असून यूके आणि परदेशात कलेत शक्तिशाली योगदान दिले आहे. त्यांनी Gnosis, जंगल बुक रिइमॅजिन्ड, आऊटविटींग द डेव्हील्स, ज़ेनोस (XENOS), iTMOi (इन द माइंड ऑफ ईगोर), अंटील द लायन्स, काश, DESH, व्हर्टीकल रोड आणि झीरो डिग्रीज अशा आपल्या सर्जनशील, वाखाणण्याजोग्या, समर्पक निर्मितीच्या विजयावर कलेचं संवर्धन केलं आहे.


                                                                                                                                                                 

अक्रम खान यांचं उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन, ज़ेनोस (XENOS) हा एक आकर्षक आणि अविस्मरणीय अनुभवाचं वचन देते. आम्ही सर्व नृत्य, नाट्य आणि इतिहास प्रेमींना या अपवादात्मक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहोत. खरोखरच उल्लेखनीय आणि फिरती निर्मिती पाहण्याची ही एक संधी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.