Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्रीयांच्या आर्थिक स्वातंत्र्याला बळ देण्यासाठी कोटो अणि ऑस्पर एकत्र

 *स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याला बळ देण्यासाठी कोटो आणि ऑस्पर एकत्र*


 

स्त्रियांना स्वतंत्रपणे गुंतवणूक करण्याची क्षमता देण्याच्या उद्दिष्टाने कोटोने जाहीर केला ऑस्परसोबत सहयोग


राष्ट्रीय: कोटो हा वेब3 तत्त्वांवर केवळ स्त्रियांसाठी विकसित करण्यात आलेला सोशल कम्युनिटी प्लॅटफॉर्म सातत्याने वाढत आहे आणि दर दिवशी त्यात सुधारणा होत आहे. जगातील सर्व स्त्रियांसाठी त्यांना आवडणाऱ्या विषयांच्या आधारे समुदाय उभारण्यासाठी, तयार करण्यासाठी व त्यांत सहभागी होण्यासाठी ही एक सुरक्षित जागा आहे. कोटोने आता स्त्रियांना स्वतंत्रपणे गुंतवणूक करण्याची क्षमता देण्यासाठी ऑस्पर ह्या नवीन युगातील गोल्ड-टेक प्लॅटफॉर्मशी सहयोग केल्याचे जाहीर केले आहे.


ऑस्परच्या गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी आणि सिस्टरहूड ऑफ ज्वेलरी ह्या दोन जोमाने वाढणाऱ्या कम्युनिटीज (समुदाय) कोटोवर आहेत. गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी समुदायामध्ये वेगवेगळ्या ज्वेलर्सतर्फे दिल्या जाणाऱ्या ऑफर्स व एक्स्लुजिव डील्सवर चर्चा होते. सिस्टरहूड ऑफ ज्वेलरी हा एक प्रेरणाधारित समुदाय असून, तो स्त्रियांना सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी एकमेकींशी अर्थपूर्ण संभाषणे करून माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करतो.



कोटोच्या स्त्रियांना सक्षम करण्याच्या उद्दिष्टाशी ही संलग्नता सुसंगत आहे आणि ऑस्परसोबतच्या सहयोगाचे उद्दिष्ट स्त्रियांमधील आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणे हेच आहे.


*कोटोच्या सहसंस्थापक अपर्णा आचरेकर म्हणाल्या,* “ऑस्परसोबत झालेल्या सहयोगाच्या माध्यमातून जगभरातील स्त्रियांसाठी डिजिटल मूल्यनिर्मितीला उत्तेजन देणारे व त्यांत समानता राखणारे एक जबाबदार वातावरण निर्माण होईल तसेच त्यातून स्त्रियांच्या भविष्यकाळावर सकारात्मक परिणाम होईल, अशी आशा आम्हाला वाटते. स्त्रियांच्या सबलीकरणासोबतच हा सहयोग आर्थिक साक्षरतेलाही प्रोत्साहन देईल, कारण, ह्यामुळे त्यांना समविचारी स्त्रियांशी व कोटो समुदायातील तज्ज्ञांशी चर्चा करण्याची मुभा मिळेल, त्यांना आवश्यक असलेले सर्व ज्ञान एकत्र करण्यात त्यांना मदत मिळेल आणि सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी त्या काही माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील.”


*चीफ बिझनेस ऑफिसर अवी कुमार म्हणाले,* “ऑस्परने त्यांच्या स्त्री ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोटोवर अर्थपूर्ण समुदाय तयार केले ह्याचा आम्हाला आनंद वाटतो. स्त्रियांना संवादासाठी, समुदाय बांधणीसाठी, कोटोचे लाभ व अन्य फायदे प्राप्त करण्याच्या दृष्टीने अन्य स्त्रियांना आमंत्रित करण्यासाठी एक खुला मंच उपलब्ध करून देऊन त्यांचे सबलीकरण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने हा सहयोग एक महत्त्वाचे पाऊल आहे. कोटो गेन्स हे स्त्रियांसाठी सोन्यासारखे आहेत, त्या तयार करत असलेल्या काँटेण्टच्या प्रत्येक तुकड्यासाठी त्यांना ह्याद्वारे मूल्य प्राप्त करता येते. हा लाभ अन्य कोणतेही सोशल अॅप पुरवत नाही. ह्याशिवाय, ऑस्पर स्त्रियांना त्यांच्याकडे आधीपासून असलेल्या प्रत्येक कोटो गेनसाठी 15 रुपयांचे बक्षीस देणार आहे. ब्रॅण्ड्सना त्यांच्या ग्राहकांच्या जवळ येण्यासाठी, त्यांच्याशी व्यक्तिगत नाते प्रस्थापित करण्यासाठी जागरूकता व संवाद उभा करण्याची संधी देण्याचे उद्दिष्टही आमच्यापुढे आहे.”


ऑस्परच्या सहसंस्थापक आणि सीईओ इशा साप्रा, जानेवारी 2023 मध्ये स्थापना झाल्यापासून ब्रॅण्डने केलेल्या पहिल्या सहयोगाबद्दल, म्हणाल्या, “कोटोशी झालेल्या सहयोगाबद्दल आणि जागरूक स्त्रियांचे सोने विभागाशी संबंधित समुदाय उभे करण्याबाबत आम्ही खूपच उत्साही आहोत. भारतात सोने हे स्त्रीधन म्हणजेच स्त्रीची व्यक्तिगत संपदा समजली जाते आणि त्याबाबतचे निर्णय घेण्यात ती केंद्रस्थानी असणे अत्यंत साहजिक आहे. ऑस्पर हा भारतातील पहिला स्त्रियांसाठी तयार करण्यात आलेला सुवर्ण उपभोग प्लॅटफॉर्म आहे. ह्यावरील आर्थिक उत्पादने, स्त्रियांना दागिने खरेदी करण्यासाठी पैसा जमवण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या तसेच सुधारण्याच्या दृष्टीने, खास विकसित करण्यात आली आहेत. आमच्या कोटो समुदायांच्या माध्यमातून, स्त्रियांना मोकळेपणाने चर्चा करता येतील, त्यांच्यासारख्याच अन्य स्त्रियांकडून व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन प्राप्त करता येईल आणि सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय घेता येतील.”


ऑस्परने कोटोवर एका विशेष ऑफरची घोषणा केली आहे. त्यानुसार स्त्रिया व त्यांच्या कोटोवरील मैत्रिणींना त्यांच्याकडे आधीपासून असलेल्या प्रत्येक कोटो गेनसाठी 15 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. हे 12 दिवसांचे मर्यादित काळासाठी असलेले प्रमोशन आहे. ते अक्षय्य तृतीयेला सुरू झाले आहे आणि 1 मे 2023 रोजी समाप्त होत आहे. ह्या खास बक्षिसाकरता पात्र ठरण्यासाठी स्त्रियांकडे किमान 7 कोटो गेन्स असले पाहिजेत.


*कोटोविषयी*

कोटो हा एक केवळ स्त्रियांसाठी वेब3 तत्त्वांवर उभारण्यात आलेला जागतिक सोशल कम्युनिटी प्लॅटफॉर्म आहे. संमती व सातत्यपूर्ण स्वामित्वाची ग्वाही हा प्लॅटफॉर्म देतो. नकारात्मक परिणामांची चिंता किंवा विषारीपणा हे दूर ठेवून स्त्रियांना त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कोटो देतो. ही एक सुरक्षित ऑनलाइन जागा आहे. स्त्रिया ह्या प्लॅटफॉर्मवर, सहभागाला चालना देऊन तसेच समुदाय बांधणीद्वारे, त्यांच्या सर्जनशीलतेचे रूपांतर उत्पन्नात करू शकतात.

*सोशल मीडिया:*

https://www.instagram.com/cotoapp/


https://twitter.com/cotoapp


https://www.linkedin.com/company/cotoapp/


https://www.facebook.com/cotoapp


https://www.youtube.com/@coto5008

*अॅप स्टोअर:*


अँड्रॉइड: https://play.google.com/store/apps/details?id=world.eve.coto


अॅपल: https://apple.co/3zSKgX

 

*ऑस्परविषयी*

ऑस्पर हा स्त्रियांसाठी तयार करण्यात आलेला तसेच सोने व सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीच्या दृष्टीने बचत करण्याचा नवीन, चतुर, सुलभ व व्यक्तिनुरूप मार्ग दाखवणारा, भारतातील पहिला तंत्रज्ञानाधारित सर्वमार्गीय प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म 3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देते- बचत कशी करायची, काय खरेदी करायचे आणि कोठून खरेदी करायचे.


सोने हा भारतातील महाकाय प्रवर्ग असून, ह्यातील 95% खरेदी स्त्रियांसाठी केली जाते. मात्र, नवीन युगातील बहुतेक तंत्रज्ञानाधारित सोल्युशन्स गुंतवणुकीसाठी खरेदी करणाऱ्यांवर (प्रामुख्याने पुरुष) लक्ष केंद्रित करतात. ऑस्परपुढे एक सर्वमार्गीय सोल्युशन तयार करण्याचे लक्ष्य आहे. हे सोल्युशन ऑनलाइन व ऑफलाइन अनुभवांचे एकत्रीकरण करेल आणि ग्राहकाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खरेदी अनुभवाची नव्याने कल्पना करेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.