महानगर गॅस लिमिटेड आणि बीइएसटी (बेस्ट) संयुक्तपणे सादर करीत आहेत,
इंधन भरून घेण्याचा ‘तेज’ मार्ग
बेस्टच्या डेपोजमध्ये ‘एमजीएल तेज’ ऍप वापरकर्त्यांसाठी सीएनजी भरण्याची विशेष सुविधा
गोरेगाव-ओशिवारा आणि घाटकोपर बस डेपोंमध्ये पहिल्या टप्प्यात सीएनजी डिस्पेंसर्स मिळणार
मुंबई - भारतातील प्रमुख शहरी गॅस वितरण कंपनी महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल), यांनी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्स्पोर्ट (बीइएसटी) यांच्या सहयोगाने आज घाटकोपर बेस्ट बस डेपो येथे ‘एमजीएल तेज’ ची सुरूवात केली. या उपक्रमाअंतर्गत आज ’एमजीएल तेज’ च्या वापरकर्त्यांसाठी विशेष सीएनजी डिस्पेन्सरचे उद्घाटन श्री. लोकेश चंद्रा, जनरल मॅनेजर, बीइएसटी आणि एमजीएलचे बोर्ड डायरेक्टर, श्री. सय्यद शहानवाझ हुसेन यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. संजय शेंडे, डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर, एमजीएल आणि महानगर गॅस लिमिटेड आणि बीइएसटी मधील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या नव्यानेच सुरू केल्या गेलेल्या मोबाइल ऍप्लिकेशनमध्ये चारचाकी सीएनजी वाहनांच्या वापरकर्त्यांना बीइएसटी बस डेपोमधील सीएनजी सुविधेमध्ये रीफ्युएलिंगसाठी विशिष्ट वेळा (टाइम स्लॉट) आरक्षित करता येतील. ‘एमजीएल तेज’ ऍप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून त्याचा उपयोग करून सीएनजी वाहनधारक त्यांच्या सोयीनुसार आधीपासूनच विशिष्ट वेळ (टाइम स्लॉट) आरक्षित करून लांब रांगेत थांबणे कमी करू शकतील. या डेपोंमध्ये ‘एमजीएल तेज’ द्वारे बुकिंग केलेल्या ग्राहकांसाठी एक विशिष्ट सीएनजी डिस्पेन्सर असेल. वापरकर्ते (ग्राहक) सकाळी ९.०० ते संध्याकाळी ७.०० या काळात, आठवड्यातील सर्व दिवशी, सीएनजी भरण्यासाठी विशिष्ट वेळ आरक्षित करू शकतील व डिजिटल माध्यमांद्वारे पैसे भरू शकतील.
सध्या, ही सेवा गोरेगाव-ओशीवारा आणि घाटकोपर बस डेपोंमध्ये उपलब्ध आहे आणि अशाच प्रकारची सुविधा मुंबई मधील बीइएसटी व्यवस्थापनाखालील इतर १३ बस डेपोंमध्ये देण्याचे नियोजित आहे.
या सहयोगाबद्दल बोलताना श्री. लोकेश चंद्रा, जनरल मॅनेजर, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्स्पोर्ट म्हणाले, ‘‘बीइएसटी (बेस्ट) ला एमजीएलच्या सहयोगाने पर्यावरण-स्नेही इंधन पुरवण्याच्या या हरित उपक्रमात सहभागी होताना अतिशय आनंद होत आहे. या उपक्रमामुळे केवळ मुंबईकरांसाठी सीएनजी भरून घेणे सोयीचे होईल इतकेच नव्हे तर आम्हाला संपूर्ण समाजाच्या फायद्यासाठी आमच्या स्रोतांचा अधिकाधिक वापर करता येणे शक्य होईल.’’
या प्रसंगी बोलताना श्री. संजय शेंडे, डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर, महानगर गॅस लिमिटेड यांनी सांगितले की,’’ आम्हाला ’एमजीएल तेज’ सादर करताना आणि बीइएसटीच्या सहयोगाने विशेष सीएनजी डिस्पेन्सिंग सुविधेची सुरूवात करताना अतिशय आनंद होत आहे. या उपक्रमाच्या मदतीने आमच्या ग्राहकांसाठी सीएनजी भरून घेणे अधिक सोयीस्कर करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
आम्ही हीच सुविधा बीइएसटीच्या अन्य १३ बस डेपोंमध्येही देऊ इच्छितो, ज्यामुळे स्वच्छ आणि हरित भविष्याच्या दिशेने असलेल्या आमच्या वाटचालीत आम्हाला अधिकाधिक ग्राहकांची साथ लाभेल.’’