महानगर गॅस लिमिटेडने वाढवली आपली व्याप्ती; नेव्ही नगर येथे झाली घरगुती पीएनजीची पहिली जोडणी
रफिया मंझिल येथे पहिले घरगुती पीएनजी रुपांतरण पूर्ण झाले
एमओयूअंतर्गत 8000 घरे, तसेच आयएनएचएस अश्विनी हॉस्पिटल यांना पीएनजी मिळणार आहे.
मुंबई - महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ही भारतातील एक सर्वांत मोठी शहर गॅस वितरण कंपनी असून, तिने सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून भारतीय नौदलाच्या मुंबईमधील निवासी व कार्यालयीन जागी पाइप्ड नैसर्गिक वायूचा (पीएनजी) पुरवठा करण्यासाठी भारतीय नौदलासोबत सामंजस्य कराराअंतर्गत (एमओयूअंतर्गत) पहिली घरगुती पीएनजी जोडणी केलेली आहे. रफिया मंझिलमधील नौदल अधिकाऱ्यांच्या सदनिकांमध्ये जोडणीचे काम सुरू झाले आहे आणि एप्रिल 2023 मध्ये पहिल्या सदनिकेसाठी पीएनजी पुरवठा सुरू झाला.
महानगर गॅस लिमिटेड आणि भारतीय नौदल यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये भारतीय नौदलाच्या पश्चिमी नौदल कमांडच्या मुख्यालयामध्ये सामंजस्य करारावर (एमओयूवर) स्वाक्षरी केली होती. स्वाक्षरीकृत एमओयूनुसार, महानगर गॅस लिमिटेड ही दक्षिण मुंबईमधील नेव्ही नगरमध्ये पीएनजीचा पुरवठा करेल. पीएनजीचा पुरवठा मिळणाऱ्या आस्थापनांमध्ये भारतीय नौदलाची 8000 घरे, आयएनएचएस अश्विनी रुग्णालय आणि अनेक गॅलीज आणि बॅचलर किचन्स यांचा समावेश आहे.
एमओयूचा भाग म्हणून, कुलाबा येथील नेव्ही नगरमधील संरक्षण दलाच्या इमारतींमधील रफिया मंझिल हे पीएनजीचा पुरवठा प्राप्त होणारे पहिले निवासी संकुल बनले आहे.
या सहयोगाबाबत बोलताना, महानगर गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, श्री. आशू सिंघल म्हणाले की, “भारतीय नौदलाशी सहयोग स्थापित करणे आणि सुरक्षित, कार्यक्षम व विश्वासार्ह ऊर्जेसह, आपल्या देशाच्या या शूर लढवय्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सेवा प्रदान करणे हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. तसेच मुंबईमधील ऊर्जाविषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या व हरित ऊर्जेकडे स्थित्यंतर करण्याच्या दिशेने आमच्या बांधिलकीचाही हा एक विस्तार आहे.