Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

टायगर श्रॉफचा एक प्रख्यात ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ब्रॅन्ड आयवेयर कलेक्शन सोबत करार

 टायगर श्रॉफचा एक प्रख्यात ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ब्रॅन्ड आयवेयर कलेक्शन सोबत करार


कॅरेरा या इटलीतील आघाडीच्या लाईफस्टाईल आणि स्पोर्ट्स आयवेअर ब्रॅन्ड कडून आज प्रॉल या प्रसिध्द बॉलिवूड कलाकार टायगर  श्रॉफ याचा प्रसिध्द ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ब्रॅन्ड बरोबर सहकार्य करार करुन या माध्यमातून ‘कॅरेरा एक्स प्रॉल’ आयवेयर केलेशनची सुरुवात केली.  या सहकार्या मुळे कॅरेरा ने स्वत:चे नियम करणार्‍या तसेच लोकांपेक्षा वेगळा विचार करणार्‍या तरुण ग्राहक आणि मिलेनियल ग्रुप साठी हे नवीन कलेक्शन तयार करण्यात आलेले आहे. या नवीन कलेक्शन मध्ये वापरणार्‍या बोल्ड आणि अनोखी स्टाईल दिसणार असून याचा प्रसार संपूर्ण भारतातील सर्व प्रकारच्या चॅनल्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ज्यामुळे ब्रॅन्ड चे अस्तित्वही वाढीस लागेल.



 


या सहकार्या विषयी घोषणा करतांना सॅफिलो इंडिया प्रा. लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष वैद्य यांनी सांगितले “ भारतातील सर्वात आश्वासक लाईफस्टाईल ब्रॅन्ड्स पैकी एक असलेला - प्रॉल बाय टायगर श्रॉफ बरोबर सहकार्य करतांना आम्ही उत्साही आहोत, हा ब्रॅन्ड अगदी थोडक्या कालावधीत तरुणाईत प्रसिध्द झाला असून स्टारचे सहकार्य लाभलेल्या या आयकॉनिक ब्रॅन्ड ने तरुणाईत आपले नाव मिळवले आहे,  सातत्याने प्रोत्साहन देऊन या ब्रॅन्ड ने अनेकांना आपल्या कडे आकर्षित केले आहे.  प्रॉल हा उर्जा, आत्मविश्वास आणि सातत्याच्या ने काम करत असल्याने कॅरेराच्या ब्रॅन्ड मुल्यांशी मिळताजुळता बनला आहे.  मला खात्री आहे की कॅरेरा प्रॉल कलेक्शन नक्कीच खेळाडू आणि लाईफस्टाईलची आवड असणार्‍या लोकां बरोबरच विशेषकरुन मिलेनियल्सना आवडेल.  विशेषकरुन टायगर बरोबर असल्याने तो मुलांमध्ये, तरुणांमध्ये आणि अनेक लोकांमध्ये प्रसिध्द असल्याने ही भागीदारी खूपच प्रोत्साहक होईल.”


 



“कॅरेरा हा ब्रॅन्ड प्रॉल बरोबर नक्कीच जोडला जात आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे बोल्ड, उत्साही आणि त्यांचा बेधडक दृष्टिकोन होय.  डिझाईनची परंपरा आणि उत्तम डिझाईन ने युक्त अशा कॅरेरा ब्रॅन्ड बरोबर सहकार्य करतांना मला आनंद होत आहे आणि मी या नवीन आयवेअरचा प्रसार करण्यासाठी आनदी आहे. कॅरेरा प्रॉल हा माझ्या व्यक्तिमत्वाशी जोडला जातो आणि सतत प्रवास करणार्‍या तरुणाईसाठी की एक योग्य ॲक्सेसरी आहे.” असे टायगर श्रॉफ यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.