*एनआरएआय पुणे चॅप्टर तर्फे पुण्यात "पॉवरिंग अप युअर ब्रँड विथ इंद्रनील चितळे" कार्यक्रमाचे आयोजन*
· नॅशनल रेस्टारंट अससोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे मंगळवार दिनांक २० जून रोजी या कार्यक्रमाचे आयोजन वन लाउंज रेस्टॉरंट, कोरेगाव पार्क पुणे येथे करण्यात आले आहे.
· चितळे बंधू यांची चौथी पिढी व पार्टनर, श्री. इंद्रनील चितळे हे उपस्थितांना आपल्या कंपनी / ब्रँड ची प्रसिद्धी कशी वाढवावी यावर मार्गदर्शन करतील
मुंबई -- नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) तर्फे मंगळवारी, २० जून २०२३ रोजी "पॉवरिंग अप युअर ब्रँड विथ इंद्रनील चितळे" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वन लाउंज रेस्टॉरंट कोरेगाव पार्क, पुणे येथे आहे.
हा कार्यक्रम विशेषत: फूड अँड बेव्हरेज इंडस्ट्री मालक (F&B Industry), उद्योजक, उद्यम भांडवलदार (VCs) आणि २० हून अधिक शहरांमधील इतर उद्योग-संबंधित भागधारकांसाठी डिझाइन केलेले आहे. २०० हुन व्यावसायिकांच्या अपेक्षित उपस्थितीसह, अत्यंत स्पर्धात्मक F&B मार्केटमध्ये ब्रँड पॉवर वाढविण्यासाठी अमूल्य अंतर्दृष्टी आणि धोरणे मांडणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाले चेनची चौथी पिढी व पार्टनर श्री. इंद्रनील चितळे यांच्या सोबत हे सत्र असेल. मिठाई आणि स्नॅक्ससाठी ओळखले जाणारे, चितळे बंधू मिठाईवाले हे भारतात घराघरात ओळखले जातात. त्यांच्या व्यापक अनुभवामुळे आणि उद्योगाबद्दलच्या सखोल अभ्यासाबद्दल श्री. इंद्रनील चितळे हे ओळखले जातात. या कार्यक्रमामध्ये इंद्रनील चितळे हे त्यांच्या कौशल्य आणि अनुभवाबद्दल उपस्थितांना माहिती देतील. त्याचबरोबर उपस्थितांना त्यांच्या ब्रँडची पातळी कशी वाढवावी या बद्दल मार्गदर्शन करतील.
आगामी कार्यक्रमाबद्दल बोलताना, श्री प्रफुल्ल चंदावरकर - NRAI पुणे चॅप्टरचे प्रमुख आणि संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक: मलाका स्पाइस म्हणाले, “पुण्यात 'पॉवरिंग अप युवर ब्रँड विथ इंद्रनील चितळे' कार्यक्रमाचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत आहे. उपस्थितांसाठी श्री. इंद्रनील चितळे यांच्या कौशल्यातून व्यवसायातील अभ्यास कसा करावा आणि स्वतःचे ब्रँड वाढवण्यासाठी आणि एक बहु-पिढीचा ब्रँड कसा तयार करायचा याबद्दल याबद्दल सांगतील त्यामुळे नवनवीन व्यावसायिकांना ब्रँड बिल्डिंग बद्दल माहिती मिळेल. या संधीचा पुणेकरांनी नक्कीच फायदा घ्यावा."
श्री. चितळे हे अनेक विषयनावर संवाद साधतील त्यामध्ये विशेष म्हणजे ब्रँड पोझिशनिंग आणि ग्राहकांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या अनोख्या पद्धती तसेच गुणवत्ता वाढ या काही विषयनाकडे त्यांचे बारकाईने लक्ष देणार आहेत. त्याचे भाषण उपदेशात्मक असणे अपेक्षित आहे, ज्यामुळे उपस्थितांना प्रेरित केले जाईल आणि उपयुक्त टिप्स असतील ज्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायाचा मार्ग बदलण्यात मदत होईल.
कार्यक्रम संध्याकाळी ०७ वाजता सुरू होईल. या कार्यक्रमाचा नेटवर्किंग हा एक उद्देश आहे. ज्यामुळे उपस्थितांना सहकारी व्यावसायिक, उद्योग तज्ञ आणि संभाव्य सहयोगी यांच्याशी संपर्क साधता येईल. हा कार्यक्रम संपूर्ण खाद्य आणि पेय बंधुवर्गासाठी खुला आहे.