Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पीव्हीआर आयनॉक्सने खाद्य सेवांच्या किमतीच्या स्वरूपात केला बदल!

 प्रेक्षकांच्‍या मागणीची पूर्तता करत भारतातील सर्वात मोठ्या मल्‍टीप्‍लेक्‍स साखळी पीव्‍हीआर आयनॉक्‍स लि.ने एफअॅण्‍डबीसाठी नवीन आकर्षक दरांत ऑफर्सची घोषणा केली आहे. देशभरातील सर्व पीव्‍हीआर आयनॉक्‍स सिनेमागृहांमध्‍ये या ऑफर्सचा लाभ घेता येऊ शकतो. या घोषणेसह पीव्‍हीआर आयनॉक्‍सचा प्रेक्षकांच्‍या सिनेमॅटिक अनुभवामध्‍ये वाढ करण्‍याचा मनसुबा आहे. आजपासून चित्रपट पाहायला येणारे प्रेक्षक सोमवार ते गुरूवार सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत फक्‍त ९९ रूपयांपासून सुरू होणारे हॉटडॉग्‍ज, बर्गर्स, पॉपकॉर्न व सँडविचेस् अशा खाद्यपदार्थांचा आस्‍वाद घेऊ शकतात. वीकेण्‍डला चित्रपट पाहण्‍याचा आनंद घेऊ इच्छिणारे चित्रपटप्रेमी बॉटमलेस पॉपकॉर्न खरेदी करू शकतात, ज्‍यामध्‍ये अनिलिमिटेड टब रिफिल्‍स, तसेच आकर्षक दरातील फॅमिली मील कॉम्‍बो यांचा समावेश आहे, ज्‍यामुळे एफअॅण्‍डबीचा खर्च जवळपास ४० टक्‍क्‍यांनी कमी होतो.



''प्रेक्षकांशी संलग्‍न होणे हे सिनेमागृह यशस्‍वीपणे कार्यान्वित राहण्‍याकरिता महत्त्वाचे आहे. आम्‍ही प्रेक्षकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न करतो. आमच्‍या सिनेमागृहांमध्‍ये आल्‍यानंतर त्‍यांना अद्वितीय सिनेमॅटिक अनुभव देण्‍याची आमची इच्‍छा आहे. आम्‍ही आमच्‍या एफअॅण्‍डबी किंमतीबाबत ग्राहकांचे मत ऐकून घेत आहोत. म्‍हणून आम्‍ही किफायतशीर एफअॅण्‍डबी डिल्‍स डिझाइन केल्‍या आहेत, ज्‍या चित्रपटप्रेमींचे लक्ष वेधून घेण्‍यासोबत त्‍यांच्‍या समस्‍यांचे निराकरण देखील करतील,'' असे पीव्‍हीआर आयनॉक्‍स लि.चे कार्यकारी संचालक संजीव कुमार बिजली म्‍हणाले. 


ते पुढे म्‍हणाले, ''आम्‍हाला जगातील अव्वल सिनेमा साखळ्यांमध्‍ये स्‍थान मिळवून दिलेले आमची विलिनीकरण आता आम्‍हाला व्‍यापक व्‍याप्‍ती देण्‍यासोबत देशभरातील अधिकाधिक प्रेक्षकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍याची आणि त्‍यांच्‍याकरिता सर्वोत्तम ऑफरिंग्‍ज डिझाइन करण्‍याची संधी देते. आम्‍हाला विश्‍वास आहे की, आमचे सुधारित पॅकेजेस् वीकडेजना सिनेमागृहांमध्‍ये कमी प्रमाणात येणाऱ्या प्रेक्षकांचे, तसेच वीकेण्‍ड्सना चित्रपट पाहणे पसंत करणाऱ्या कुटुंबांसह मोठ्या प्रमाणात येणाऱ्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील. यामधून त्‍यांच्‍या गरजांची पूर्तता होण्‍याची खात्री घेण्‍यात येईल. आमचे सर्व अतिथी आमच्‍या सर्वोत्तम एफअॅण्‍डबी ऑफरिंग्‍जचा आस्‍वाद घेतील यादिशेने आमचा प्रयत्‍न आहे. यामध्‍ये लोकप्रिय सिनेमा स्‍नॅक्‍ससोबत आमच्‍या शेफच्‍या उच्‍च कुशल टीमने तयार केलेल्‍या गॉर्मेट ऑफरिंग्‍जचा देखील समावेश आहे. आम्‍हाला आमच्‍या अतिथींसाठी ही सर्वोत्तम ऑफर घेऊन येण्‍याचा आनंद होत आहे आणि यामुळे त्‍यांच्‍यासोबतचे आमचे नाते अधिक दृढ होईल असा आम्‍हाला विश्‍वास आहे; पुढील काही तिमाहींसाठी श्रेणी अद्भुत दिसत आहे. आम्‍हाला खात्री आहे की, आमच्‍या नवीन डिझाइन करण्‍यात आलेल्‍या एफअॅण्‍डबी ऑफरिंग्‍ज निश्चितच चित्रपट पाहण्‍याच्‍या आनंदामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करतील.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.