राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या कडून राष्ट्रहित कार्य योगदानाबद्दल डॉक्टर योगेश दुबे यांची प्रशंसा.
मुंबई -- महाराष्ट्र राज्यात पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेता,राष्ट्रीय अपंग पुरस्कार विजेता,भारतीय विकास संस्थान अध्यक्ष डॉक्टर योगेश दुबे द्वारा करण्यात येत असलेल्या सामाजिक आणि राष्ट्रहित कार्याची प्रशंसा करताना त्यांना शुभेच्छा ही दिल्या.डॉक्टर योगेश दुबे यांच्याशी झालेल्या मुलाखतीत आपल्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून युवा, दिव्यांग,आणि उपेक्षितांच्या उत्कर्षासाठी सामाजिक, शैक्षणिक कार्याची माहिती त्यांना दिली.
राष्ट्रपतींनी असे सांगितले की या प्रकारे समाज,देश सशक्त करण्यासाठी काम करत रहा.राष्ट्रपती मूर्मु यांनी संविधान दिवसानिमित्त आवाहन केले की देशातील तुरुंगात छोट्या अपराधासाठी बंदिवान असलेल्या आदिवासी यांच्या मुक्ततेसाठी काम करत राहिला हवे.डॉक्टर योगेश दुबे यांनी सांगितले की देशातील तुरुंगातील सजा पूर्ण केल्यानंतरही आर्थिक दंड भरू न शकणारे कित्येक वृद्ध कैदी अजून तुरुंगातच खितपत पडले आहेत.त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग येथे याचिका दाखल केली आहे.आणि त्यांच्या याचिकेवर आयोगाने गृहसचिव,भारत सरकार आणि तुरुंग महानिर्देशक यांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे.डॉक्टर योगेश दुबे यांनी सांगितले की या दिशेने ते प्रयत्न करत आहेत.