Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

" कासाग्रँड " ने केला क्रिकेट किंग सौरव गांगुली यांच्या सोबत सहकार्य करार


 *कासाग्रॅण्‍डने सौरव गांगुली यांच्‍यासोबत केला सहयोग: ट्रान्‍सफॉर्मिंग लाइव्‍ह्ज* 

~ सौरव गांगुली यांचा दक्षिण भारतातील झपाट्याने विकसित होत असलेली डेव्‍हलपर कासाग्रॅण्‍डला पाठिंबा, जेथे कंपनीचा भारतातील अग्रणी कंपनी बनण्‍याच्‍या महत्त्वाकांक्षेसह नवीन बाजारपेठांमध्‍ये प्रवेश ~  

मुंबई, २१ ऑगस्‍ट २०२३: कासाग्रॅण्‍ड या दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या डेव्‍हलपरने आज दिग्‍गज क्रिकेटर सौरव गांगुली यांची राष्‍ट्रीय ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्‍हणून नियुक्‍तीची घोषणा केली. ही नियुक्‍ती कंपनीच्‍या नवीन भौगोलिक बाजारपेठांमध्‍ये झपाट्याने विस्‍तारीकरण करण्‍याच्‍या योजनांशी संलग्‍न आहे. दक्षिण भारतातील झपाट्याने विकसित होणारी कंपनी कासाग्रॅण्‍ड आपला पोर्टफोलिओ नवीन विभागांपर्यंत, विशेषत: महाराष्‍ट्रात विस्‍तारित करत आहे. कंपनीचा महाराष्‍ट्रात पुढील ३ वर्षांमध्‍ये २० दशलक्ष चौरस फूट क्षेत्र विकसित करण्‍याचा उद्देश आहे, जेथे कंपनी आपल्‍या विस्‍तारीकरण योजनेसाठी जवळपास ८००० कोटी रूपयांची गुंतवणूक करत आहे. 



२००४ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेला तरूण रिअल इस्‍टेट ब्रॅण्‍ड कासाग्रॅण्‍डने आत्‍मविश्‍वास, आक्रमकता, निष्‍पक्षपणा, नाविन्‍यता व उत्‍कटतेच्‍या आपल्‍या मुलभूत डीएनएच्‍या माध्‍यमातून हजारो कुटुंबांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. कासाग्रॅण्‍डचा विश्‍वास आहे की, त्‍यांची मुलभूत मूल्‍ये माजी कर्णधार व आयकॉन सौरव गांगुली यांच्‍याशी परिपूर्णपणे संलग्‍न होतात. सौरव गांगुली यांनी आपल्‍या अद्वितीय नेतृत्‍वासह भारतीय क्रिकेटमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणला. त्‍यांच्‍यामध्‍ये ब्रॅण्‍डची मूल्‍ये दिसून येतात, ज्‍यामुळे त्‍यांच्‍यासोबत सहयोग करण्‍यात आला आहे. 

ब्रॅण्‍डने २०२३ मध्‍ये चेन्‍नई, बेंगळुरू, कोईम्‍बतूर व हैदराबाद येथे १४० हून अधिक प्रकल्‍प आणि ४०,००० घरे यशस्‍वीरित्‍या वितरित केली आहेत. आपल्‍या विस्‍तारीकरण योजनांना अधिकाधिक भौगोलिक बाजारपेठांपर्यंत घेऊन जात प्रबळ करण्‍यासाठी कंपनीने आयकॉनिक कर्णधार व क्रिकेटर सौरव गांगुली यांना ऑन-बोर्ड केले आहे. कंपनीचा माध्‍यमांमध्‍ये सर्वांगीण, एकीकृत विपणन मोहिम 'ट्रान्‍सफॉर्मिंग लाइव्‍ह्ज' राबवण्‍याचा मनसुबा आहे. 



कासाग्रॅण्‍ड अस्‍सल 'व्‍हॅल्‍यू फॉर मनी' किमतीत जागतिक दर्जाच्‍या घरांच्‍या अद्वितीय संयोजनामुळे इतरांपेक्षा वरचढ ठरते. कासाग्रॅण्‍डचे सर्व समुदाय त्‍यांच्‍या जागतिक दर्जाच्‍या सुविधा, प्रिमिअम वैशिष्‍ट्ये, हवेशीर कार्यक्षम योजना, व्‍यापक खुले हरित परिसर, विशेषत: ज्‍येष्‍ठ नागरिक व लहान मुलांसाठी अनुकूल सुविधा अशा इतर अनेक सुविधांसाठी ब्रॅण्‍डच्‍या क्रांतिकारी तत्त्वाचे कौतुक करतात. कासाग्रॅण्‍ड मालमत्ता सुपूर्द केल्‍यानंतर देखील देखभाल, खात्रीदायी रेण्‍टल्‍स, खात्रीदायी रिसेल्‍स आणि सर्वसमावेशक समुदाय अनुभवाच्‍या अद्वितीय ऑफरिंग्‍जच्‍या माध्‍यमातून आपल्‍या सर्व मालमत्तांचे व्‍यवस्‍थापन पाहते. ज्‍यामुळे ही ऑफरिंग अद्वितीय आहे. या ऑफरिंग्‍ज नाविन्‍यपूर्ण, त्‍यांच्‍या उत्‍कटतेने संचालित आहे, ज्‍या व्‍यक्‍तींच्‍या जीवनावर परिणाम करण्‍यासह गृहनिर्माण क्षेत्रात अग्रणी परिवर्तन घडवून आणतात. 

'दादा' म्‍हणून लोकप्रिय असलेले सौरव गांगुली दिग्‍गज क्रिकेटर आहे. त्‍यांचे नेतृत्‍व व क्षमतेने कायमस्‍वरूपी प्रभाव टाकला आहे. या स्‍टायलिश फलंदाजाची ऑफ-साइडला फटके मारण्‍याची कला डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. वैयक्तिक उपलब्‍धी प्राप्‍त करण्‍यासोबत गांगुली यांच्‍या कर्णधारपदांतर्गत भारतीय क्रिकेटला नवीन वळण मिळाले, खेळाडूंमध्‍ये नीडरपणा व एकतेची भावना जागृत झाली. तरूण प्रतिभावान खेळाडूंना निपुण करण्‍याच्‍या, तसेच उत्‍साही क्रिकेटर्सना मार्गदर्शन करण्‍याच्‍या माध्‍यमातून त्‍यांचा वारसा दिसून येतो. गांगुली प्रेरणास्रोत आहेत आणि त्‍यांनी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट मंचावर भारताला नव्‍या उंचीवर नेण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

याप्रसंगी आपले मत व्‍यक्‍त करत कासाग्रॅण्‍डचे संस्‍थापक व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. अरूण एमएन म्‍हणाले, ''आम्‍हाला दादासोबत सहयोग करण्‍याचा आणि आमचे ऑफिशियल, राष्‍ट्रीय ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्‍हणून त्‍यांना ऑन बोर्ड करण्‍याचा आनंद होत आहे. अद्वितीय आशावादासह उत्‍कट खेळाडू म्‍हणून त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व आणि भारतीय क्रिकेट संघामध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍यात त्‍यांचे नेतृत्‍व कासाग्रॅण्‍डमध्‍ये आमच्‍यासाठी प्रेरणादायी आहे. स्‍थापनेपासून विश्‍वास, प्रगतीशील विकास, नाविन्‍यता, निष्‍पक्षपणा व उत्‍कटता हा आमचा डीएनए आहे. आम्‍ही कासाग्रॅण्‍ड समूहामध्‍ये गांगुली यांचे स्‍वागत करतो आणि पुढील उत्‍साहवर्धक प्रवासासाठी उत्‍सुक आहोत.''

श्री. अरूण पुढे म्‍हणाले, ''आम्‍ही वर्ष २००४ मध्‍ये विनम्र सुरूवात केली आणि आज, आम्‍ही दक्षिण भारतातील टॉप ३ बिल्‍डर्सपैकी एक आहोत. आमची पुढील पाच वर्षांमध्‍ये देशातील टॉप ५ बिल्‍डर्समध्‍ये असण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे. आमचे उच्‍च दर्जाचे उत्‍पादन, सर्वोत्तम अभियांत्रिकी पद्धती, ऑन-टाइम डिलिव्‍हरीने आम्‍हाला गृहखरेदीदारांमध्‍ये सर्वात लोकप्रिय बनवले आहे. आतापर्यंत आम्‍ही वेळेवर १२३ प्रकल्‍प वितरित केले आहेत. गेल्‍या वर्षी आम्‍ही ४२०० कोटी रूपयांची विक्री संपादित केली आणि या आर्थिक वर्षात आमचा ७२०० कोटी रूपयांची विक्री संपादित करण्‍याचा मनसुबा आहे. यंदा आम्ही नवीन बाजारपेठांमध्ये, विशेषत: महाराष्‍ट्रात आमची उपस्थिती विस्‍तारित करण्‍यास उत्‍सुक आहोत. आमची प्रदेशातील आमच्‍या निवासी पोर्टफोलिओमध्‍ये ८० दशलक्ष चौरस फूटाची भर करण्‍याची योजना आहे. तसेच आमची कंपनी कर्मचारी-केंद्रित आहे, आमच्‍या कर्मचाऱ्यांना वार्षिक व्‍यवसाय लक्ष्‍य संपादित करण्‍याकरिता स्‍टॉक पर्याय (इतर लाभांसह) व वार्षिक इन्‍सेंटिव्‍ह ट्रिप्‍स देत रिवॉर्डस् देतो. खरेतर गेल्‍या वर्षाचे लक्ष्‍य संपादित करण्‍याचे कौतुक म्‍हणून आम्‍ही १४०० कर्मचाऱ्यांना इन्‍सेंटिव्‍ह रिवॉर्ड म्‍हणून ऑस्‍ट्रेलियाकरिता ट्रिप देत आहोत. निवासी हा मुख्य व्यवसाय असल्याने आमचे कासाग्रॅण्‍ड  कमर्शियल (ऑफिस स्पेसेस व मॉल्स), कासाग्रॅण्‍ड कॉन्ट्रॅक्ट्स (ईपीसी कंपनी), कासाग्रॅण्‍ड औद्योगिक उद्याने व गोदाम विभाग आणि कॅसाग्रँड इंटर्नल शाळा असे सहयोगी उपक्रम आहेत.''



कासाग्रॅण्‍डसोबत सहयोग करण्‍याबाबत श्री. सौरव गांगुली म्‍हणाले, ''मला कासाग्रॅण्डसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. कासाग्रॅण्‍ड अस्‍सल व्‍हॅल्‍यू फॉर मनी किमतीत अद्वितीय उत्‍पादन ऑफरिंगसह गृहनिर्माण बाजारपेठेला सेवा देत आहे. ब्रॅण्‍डची उत्‍कटता व आक्रमकता आम्‍ही २००० दशकाच्‍या सुरूवातीला सुरू केलेल्‍या परिवर्तनात्‍मक प्रवासाशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे. मला या प्रवासाचा भाग होण्‍याचा आनंद होत आहे, जेथे कंपनी महाराष्‍ट्र बाजारपेठेसह नवीन क्षेत्रांमध्‍ये आपला विस्‍तार करत आहे. सहयोगाने आम्‍हाला उच्‍च दर्जाच्‍या उत्‍पादनांसह अधिकाधिक व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याचा, तसेच गृहनिर्माण बाजारपेठेवर दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्‍याचा विश्‍वास आहे.'' 

कासाग्रॅण्‍ड भविष्‍यात ६०,००० घरे विकसित करणार आहे. प्रमुख ठिकाणी ३८ दशलक्ष चौरस फूट रिअल इस्‍टेट विकसित केलेली कासाग्रॅण्‍ड ८० दशलक्ष चौरस फूट रिअल इस्‍टेट विकसित करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहे, ज्‍याद्वारे गृहखरेदीदारांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल होईल. 

कासाग्रॅण्‍ड बाबत: 

२००४ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली कासाग्रॅण्‍ड आयएसओ प्रमाणित रिअल इस्‍टेट एंटरप्राइज आहे, जी महत्त्वाकांक्षा निर्माण करण्‍याप्रती आणि मूल्‍य वितरित करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. कंपनीने चेन्‍नई, बेंगळुरू व कोईम्‍बतूर येथे ३८ दशलक्ष चौरस फूटांहून अधिक प्राइम निवासी रिअल इस्‍टेट विकसित केले आहे. १४० हून अधिक उल्‍लेखनीय प्रॉपर्टीजमध्‍ये ३७,००० हून अधिक आनंदी कुटुंबं असण्‍यामधून कंपनीची कटिबद्धता दिसून येते. उच्‍च दर्जाचे राहणीमान निर्माण करण्‍याच्‍या तत्त्वाशी बांधील राहत कंपनीचा विश्‍वास सार्थ ठरतो. कंपनीच्‍या प्रवासाच्‍या अठराव्‍या वर्षामध्‍ये कासाग्रॅण्‍ड दीर्घकालीन मूल्‍य, निष्‍ठा व दर्जासह ८००० कोटी रूपयांच्‍या प्रकल्‍पांच्‍या माध्‍यमातून अधिक प्रगती करण्‍यास सज्‍ज आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.