Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

इलाया थैलागम प्रभू गणेशन आणि शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते कल्याणच्या दालनाचे उदघाटन

 कल्याण ज्वेलर्स या भारताच्या दागिने क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह आणि आघाडीच्या ब्रँडने मुंबईतील चेंबुर येथे नवे दालन लाँच केले. ब्रँड अ‍ॅम्बेसिडर इलाया थैलागम प्रभू गणेशन आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले व त्यानंतर या कलाकारांनी कल्याण ज्वेलर्सच्या काही ग्राहकांशी खास संवाद साधला. हे दालन चेंबुरसारख्या गजबजलेल्या उपनगरात सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू रस्ता आंबेडकर गार्डन येथे वसलेले आहे. या लाँचमुळे कल्याण ज्वेलर्सच्या भारताची आर्थिक राजधानी मुंबईतील दालनांची संख्या ९ आणि महाराष्ट्रभर दालनाची संख्या १६ वर गेली.



याप्रसंगी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर प्रभू गणेशन म्हणाले,‘’कल्याण ज्वेलर्स हा भारतातील सर्वाधिक पसंतीचा दागिने ब्रँड आहे आणि कल्याण ज्वेलर्स परिवारासह असलेल्या प्रदीर्घ नात्याचा मला अभिमान वाटतो. ‘ट्रस्ट इज एव्हरीथिंग’ या विचारसरणीशी असलेली त्यांची बांधिलकी कौतुकास्पद आहे. याचमुळे ते दागिन्यांच्या इतर ब्रँड्सपेक्षा वेगळे ठरतात. कल्याण ज्वेलर्सचे ग्राहक व मुंबईतील प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. कल्याण ज्वेलर्स आता विकासाच्या पुढच्या टप्प्यावर वाटचाल करत आहे. मला खात्री आहे, की यापुढेही ग्राहक त्यांच्यावर अशाच प्रकारे प्रेम करत राहातील.’



प्रेक्षकांशी संवाद साधताना बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टी म्हणाल्या,‘'कल्याण ज्वेलर्सच्या चेंबुरमध्ये वसलेल्या या नव्या दालनात येताना मला आनंद होत आहे. कारण मी सुद्धा लहानाची मोठी चेंबूर परिसरातच झाली आहे, त्यामुळे चेंबूर परिसराशी माझे ऋणानुबंध कायमच राहतील. कल्याण ब्रँड विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहक समाधानाचे प्रतीक आहे व मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. कल्याण ज्वेलर्सचे दालन त्यांची अविरत बांधिलकी व खरेदीचा असामान्य अनुभवय यांचा मिलाफ साधणारे आहे.’'


नव्या दालनाविषयी कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री.रमेश कल्याणरामन म्हणाले,‘‘तीन दशकांच्या या दीर्घ प्रवासात आम्ही लक्षणीय टप्पे गाठले आहेत व समग्र यंत्रणा तयार करत ग्राहकांच्या दागिने खरेदी करण्याच्या अनुभवात क्रांती आणली आहे. आज चेंबुरमध्ये अत्याधुनिक दालन सुरू करत ब्रँडचे अस्तित्व विस्तारण्याचे आणि पर्यायाने मुंबई शहरातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय ठेवले आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठांतील अस्तित्व ग्राहकांप्रती आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.’’




या महिन्यात कल्याण ज्वेलर्सने जगभरातील आपले २०० वे दालन सुरू केले. हे यश साजरे करण्यासाठी कंपनीने ‘सेलिब्रेटिंग २०० शोरूम्स कॅम्पेन’ लाँच केले असून त्याअंतर्गत ग्राहकांना दागिने खरेदीवर विविध लाभ मिळणार आहेत. याचाच एक भाग म्हणून ग्राहकांना अनोख्या ऑफर्सचा लाभ घेता येईल. त्यामध्ये किमान एक लाख रुपयांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खरेदी मूल्याच्या निम्म्या रकमेवर २५% टक्के घडणावळचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.