Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

IIM अहमदाबादने त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये केला महानगर गॅस लिमिटेडच्या केस स्टडीचा समावेश

 २१ ऑगस्ट २०२३, मुंबई - भारतातील सर्वांत मोठ्या शहर वायु वितरण (सीजीडी) कंपन्यांपैकी एक असणारी महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल), आता इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट - अहमदाबाद ह्या भारतातील व्यवस्थापकीय अभ्यासाच्या एका आद्य संस्थेने प्रकाशित केलेल्या केस स्टडीचा विषय ठरली आहे. श्री. संजय शेंडे, उप व्यवस्थापकीय संचालक, महानगर गॅस लिमिटेड आणि श्री. सुनील रानडे, माजी सीएफओ आणि सल्लागार, महानगर गॅस लिमिटेड ह्यांनी सदर सुप्रतिष्ठित उद्योग संस्थेमध्ये नुकतेच एका कार्यक्रमामध्ये ह्या केस स्टडीचे अनावरण केले.




केस स्टडीचे शीर्षक, ‘‘महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) : इन सर्च ऑफ न्यू ग्रोथ ॲव्हेन्यूज टू गॅस इट अप’’ असून आयआयएम अहमदाबाद येथे स्ट्रॅटजी एरिया विषयाचे प्राध्यापक आणि पीजीपीएक्सचे अध्यक्ष प्राध्यापक अमित कर्ण; आयआयएम संभलपुर येथील प्राध्यापक दीप्तीरंजन महापात्रा आणि आयआयएम अहमदाबाद येथील डॉक्टरल विद्यार्थिनी कु. शिखा खुराना हे तिघेजण त्याचे लेखक आहेत. हा प्रवास तीन वेगवेगळ्या कालखंडांमध्ये विभागला गेला असून, प्रत्येक टप्प्यामध्ये अशा अनोख्या आव्हानांवर लक्ष दिलेले आहे, ज्यांवर एमजीएलने यशस्वीपणे मात केली आहे. ह्या यशामुळे कंपनी ह्या क्षेत्रामधील एक आघाडीची उद्योजक ठरली आहे. एवढ्या वर्षांत भागधारणेच्या स्वरूपात झालेल्या लक्षणीय बदलांचे, त्यांच्या प्रभावांचे आणि सध्याच्या बहुआयामी नैसर्गिक वायु प्राप्ती बाजारामध्ये कंपनीला स्थैर्य मिळवून देऊन तिचा विस्तार करण्यासाठी केलेले औद्योगिक प्रयत्न ह्यांवरही ह्या अभ्यासामध्ये निरीक्षण नोंदवले गेले.


आयआयएम मधील एक्झिक्युटिव्ह पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्रॅमचे विद्यार्थी ह्यांनी केस स्टडीमार्फत एमजीएलबद्दलचे त्यांचे आकलन सादर केले आणि अभ्यासामध्ये अवतरलेल्या प्रश्नांबद्दल उपाय सुचवले. श्री. संजय शेंडे आणि श्री. सुनील रानडे ह्यांनी महानगर गॅस लिमिटेडचे प्रतिनिधित्व केले आणि आयआयएमच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन केले, व त्यांच्या ज्ञानसंचयामध्ये आणि आकलनामध्ये भर घातली.



आयआयएम अहमदाबाद येथे प्रकाशित झालेल्या एका केस स्टडीचा विषय म्हणून निवड होणे हे एमजीएलसाठी गौरवास्पद आहे, विशेषत: भारतीय उद्योगांच्या केस स्टडीज्‌ त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये मर्यादित प्रमाणात आहेत ह्या कारणामुळे. आमची मेहनत, धोरणात्मक दृष्टिकोन आणि अनेक वर्षांमधील संपादने ह्यांना त्यांचा मान मिळवून दिल्याबद्दल आणि शिक्षणक्षेत्र व उद्योगक्षेत्र ह्यांमध्ये त्यांच्या संशोधनामार्फत समन्वय निर्माण केल्याबद्दल मी प्राध्यापक अमित कर्ण, प्राध्यापक दीप्तीरंजन महापात्रा, आणि कु. शिखा खुराना ह्यांचे आभार मानतो. आम्ही आमच्या टीम्सचेही आभार मानतो, कारण एमजीएलचा जन्म झाल्यापासून आत्तापर्यंतच्या एमजीएलच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे, कौशल्याचे आणि मेहनतीचे हे फलित आहे ज्यामुळे आज आम्ही ह्या पदावर पोहोचलो आहोत,’’ असे श्री. संजय शेंडे, महानगर गॅस लिमिटेडचे उप व्यवस्थापकीय संचालक म्हणाले.


 


आयआयएम अहमदाबाद येथील अभ्यासक्रमाचा भाग होण्याबरोबरच, हा केस स्टडी भारतभरातील सर्व आयआयएम्समध्ये उपलब्ध असेल. तुम्हीसुद्धा आयआयएम अहमदाबादच्या अधिकृत वेबसाइटवरून हा केस स्टडी मिळवू शकता : https://cases.iima.ac.in/index.php/mahanagar-gas-limited-mgl-in-search-of-new-growth-avenues-to-gas-it-up.html.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.