Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

केवल किरण क्लोदींग कडून " ज्युनिअर किलर " लाँच

केवल किरण क्‍लोदिंग लिमिटेडकडून पहिला एक्‍सक्‍लुसिव्‍ह बॉईज वेअर ब्रॅण्‍ड - ज्‍युनिअर किलर लाँच* 


ज्‍युनिअर किलर हा हाय स्‍ट्रीट फॅशन ब्रॅण्‍ड आहे, जो तरूण मुलांच्‍या एण्‍ड-टू-एण्‍ड वॉर्डरोब गरजांची पूर्तता करण्‍यासाठी सज्‍ज आहे. 

कलेक्‍शनमध्‍ये कॅज्‍युअल्‍स, स्‍पोर्ट्स व क्‍लासिक यामधील व्‍यापक स्‍टाइल श्रेणींचा समावेश आहे.  

 

 तरूण फॅशनिस्‍टांसाठी स्‍टाइल अधिक आकर्षक करण्‍यासाठी आज शहरामध्‍ये केवल किरण क्‍लोदिंग लिमिटेड (केकेसीएल)च्‍या अधिपत्‍याखालील भारतातील नवीन हाय स्‍ट्रीट फॅशन ब्रॅण्‍ड ज्‍युनिअर किलर लाँच करण्‍यात आला. हा नवीन ब्रॅण्‍ड विचारपूर्वक डिझाइन केलेल्‍या डिझाइन्‍सच्‍या माध्‍यमातून ४ ते १६ वर्षे वयोगटातील तरूण मुलांच्‍या एण्‍ड-टू-एण्‍ड वॉर्डरोब गरजांची पूर्तता करत फॅशनला नव्‍या उंचीवर नेण्‍यास सज्‍ज आहे. ज्‍युनिअर किलर तरूण फॅशनप्रेमींच्या विविध पसंतींची पूर्तता करण्‍यासाठी अनेक पर्याय देतो. मुंबईमध्‍ये अधिकृतरित्‍या ज्‍युनिअर किलरचे अनावरण करण्‍यात आले. या अनावरण समारोहादरम्‍यान भव्‍य फॅशन शोचे देखील आयोजन करण्‍यात आले, ज्‍यामध्‍ये ब्रॅण्‍डचे सुरूवातीचे कलेक्‍शन दाखवण्‍यात आले. यावेळी अभिनेत्री श्रीमती बिपाशा बासू व अभिनेता श्री. करण सिंग ग्रोव्‍हर यांनी उपस्थिती दाखवून फॅशन शोची शोभा वाढवली. तसेच अॅमस्‍टरडॅम येथे शूटिंग करण्‍यात आलेल्‍या ब्रॅण्‍डच्‍या टीव्‍हीसीचे देखील अनावरण करण्‍यात आले.

ज्‍युनिअर किलरचे पहिलेच कलेक्‍शन आजच्‍या सूक्ष्‍मदर्शी तरूण मुलांच्‍या अद्वितीय गरजा व पसंतींची पूर्तता करण्‍यासाठी बारकाईने डिझाइन करण्‍यात आले आहे. क्‍लोदिंग पर्यायांच्‍या व्‍यापक श्रेणीसह ज्‍युनिअर किलरने मुलांसाठी क्‍लोदिंगच्‍या श्रेणी डिझाइन केल्‍या आहेत - कॅज्‍युअल, स्‍पोर्ट्स व क्‍लासिक. डेनिम्‍स, टी-शर्ट्स, शर्ट्स व को-ऑर्ड्स यांसह कलेक्‍शनमध्‍ये विविध प्रसंगांसाठी व स्‍टाइल्‍ससाठी आवश्‍यक असलेल्‍या वॉर्डरोबचा समावेश आहे, ज्‍यामधून प्रत्‍येक तरूण मुलगा त्‍याच्‍या व्‍यक्तिमत्त्वाला अभिव्‍यक्‍त करण्‍याची खात्री मिळू शकते. कॅज्‍युअल वेअरपासून ओकेजन वेअरपर्यंत ज्‍युनिअर किलर अनेक पर्याय देतो, ज्‍यामध्‍ये स्‍टाइल व आरामदायीपणाचे संयोजन आहे. 



या लाँचबाबत आपले मत व्‍यक्‍त करत केवल किरण क्‍लोदिंग लिमिटेडचे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. हेमंत जैन म्‍हणाले, ''आम्‍हाला ब्रॅण्‍ड ज्‍युनिअर किलर सादर करण्‍याचा आनंद होत आहे. या ब्रॅण्‍डमधून आजच्‍या तरूण मुलांचा उत्‍साह दिसून येतो. आम्‍ही तरूण मुलांची अनोखी स्‍टाइल प्रकाशझोतात आणण्‍यासाठी, तसेच त्‍यांना स्‍वत:ची संस्‍कृती जपत जगामध्‍ये नावलौकिक करण्‍यास सक्षम करण्‍यासाठी हे कलेक्‍शन काळजीपूर्वक डिझाइन केले आहे. आमचा स्‍टाइल व लूकला महत्त्व देणाऱ्या तरूण मुलांसाठी फॅशनेबल पर्याय प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे.'' 

ज्‍युनिअर किलरचे पदार्पणीय कलेक्‍शन मुलांच्‍या दैनंदिन स्‍टाइलमधून प्रेरित आहे, जेथे ब्रॅण्‍ड त्‍यांच्‍या डायनॅमिक व साहसी उत्‍साहाला प्रशंसित करतो. ४९९ रूपयांपासून २३९९ रूपयांपर्यंतच्‍या कलेक्‍शनसह हा ब्रॅण्‍ड किफायतशीर दरांमध्‍ये उच्‍च दर्जाचे फॅशनेबल वॉर्डरोब देतो. ज्‍युनिअर किलर कलेक्‍शन आघाडीचे मल्‍टी-ब्रॅण्‍ड आऊटलेट्स, तसेच किलर एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्स, के-लाऊंज व नॅशनल चेन स्‍टोअर्समध्‍ये त्‍यांच्‍या सुरूवातीच्‍या एसएस'२४ कलेक्‍शनसह उपलब्‍ध असेल.     

 

केवल किरण क्‍लोदिंग लि. बाबत: केवल किरण क्‍लोदिंग लिमिटेड भारतीय रिटेल व फॅशन उद्योगामधील ४० वर्षांहून अधिक काळाचा वारसा असलेली कंपनी आहे. १९८० मध्‍ये केवलचंद पुखराज जैन व हेमंत पुखराज जैन या भावांनी डेनिमवर लक्ष केंद्रित करणारा वस्‍त्र निर्मिती व्‍यवसाय म्‍हणून सुरूवात केलेली केकेसीएल आज प्रसिद्ध व लोकप्रिय स्‍वदेशी फॅशन व लाइफस्‍टाइल सादर करणारी कंपनी बनली आहे. आज, केकेसीएलची किलर, इंटेग्रिटी, लॉमन पीजी३ व ईजीज अशा प्रमुख ब्रॅण्‍ड्स अंतर्गत ऑफरिंग्‍जची व्‍यापक श्रेणी आहे, जसे जीन्‍स, टी-शर्ट्स, शर्ट्स, शॉर्ट्स, जॅकेट्स, ब्‍लेझर्स, विंटरवेअर, अॅथलेजर, अॅक्‍सेसरीज. तसेच कंपनी भारतभरातील ईबीओ, एमबीओ, नॅशनल चेन स्‍टोअर्समध्‍ये उपस्थित आहे.

केकेसीएलने जागतिक ब्रॅण्‍ड्ससोबत यशस्‍वीपणे स्‍पर्धा केली आहे आणि सतत नाविन्‍यतेच्‍या माध्‍यमातून, तसेच ग्राहकांच्‍या गरजाची पूर्तता करत देशातील सर्वात मोठी ब्रॅण्‍डेड अॅपरल उत्‍पादक राहिली आहे. कंपनीच्‍या नाविन्‍यता आणण्‍यासह स्‍पर्धा करण्‍याच्‍या क्षमतेने कंपनीला देशातील लोकप्रिय फॅशन ब्रॅण्‍ड बनवले आहे. 

किलर बाबत: पुरूषांसाठी प्रिमिअम फॅशन ब्रॅण्‍ड किलर हा केवल किरण क्‍लोदिंग लिमिटेडने निर्माण केलेला व मालकीहक्‍क असलेला पहिला अस्‍सल आंतरराष्‍ट्रीय भारतीय ब्रॅण्‍ड आहे. हा ब्रॅण्‍ड उत्तम दृष्टिकोन असलेला उत्‍साही, ट्रेण्‍डी व वैविध्‍यपूर्ण आहे. किलर प्रिमिअम मेन्‍सवेअर विभागामध्‍ये अग्रस्‍थानी आहे आणि भारतातील सर्वात मोठा सेलिंग डेनिम ब्रॅण्‍ड आहे. जीन्‍स ब्रॅण्‍ड म्‍हणून सुरूवात केलेल्‍या किलरच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओमध्‍ये आज मेन्‍स रेडी-टू-वेअर जीन्‍स, ट्राऊझर्स, कार्गो, कॅप्री, शर्ट्स, जॅकेट्स, टी-शर्ट्स, अॅथलेजर, इनरवेअर (वेस्‍ट्स व ब्रीफ्स), फूटवेअर (शूज, शॉक्‍स), टाइम-वेअर, आयवेअर आणि इतर अॅक्‍सेसरीज (बेल्‍ट्स, ब्रेसलेट्स इत्‍यादी) यांचा समावेश आहे. किलरच्‍या डिझाइन्‍स तरूणांच्‍या उत्‍साहपूर्ण वृत्तीला अनुसरून आहेत. किलरची उत्‍पादने ईबीओ (२५० हून अधिक), के-लाऊंज (१८० हून अधिक), लार्ज फॉर्मेट स्‍टोअर्स (७५० हून अधिक) आणि एमबीओ (२००० हून अधिक) येथे विक्री केली जातात, ज्‍यामुळे ग्राहकांपर्यंत ब्रॅण्‍डची पोहोच वाढण्‍यास आणि बदलत्‍या काळासह ब्रॅण्‍ड विकसित होण्‍यास मदत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.