Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने अँपल BKC येथे संयुक्त विद्यमाने शाश्वत भविष्याकरिता राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*

*ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने अँपल BKC येथे संयुक्त विद्यमाने शाश्वत भविष्याकरिता राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा* 



आकर्षक आणि परिवर्तनशील अनुभवासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून ऑर्किडियन अँपल BKC मध्ये एकत्र.

"सायन्स फॉर अ सस्टेनेबल फ्यूचर," च्या संकल्पनेसह सत्राचा उद्देश पर्यावरणस्नेही विचारवंत आणि समस्यांचे निरसन करणाऱ्या पिढीला प्रेरणा देणे  

 



मार्च  1. -- : शाश्वत भविष्यासाठीविषयी वचनबद्धतेच्या अनुषंगाने, आंतरराष्ट्रीय शाळांची प्रमुख K12 शृंखला असलेल्या ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने अँपल BKC मध्ये एका अनोख्या कार्यशाळेद्वारे आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला. या विशेष कार्यशाळेच्या माध्यमातून ऑर्किड्सच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा एक अप्रतिम अनुभव मिळाला, ज्यामुळे त्यांना शिकण्यासाठी, निर्मितीच्या दृष्टीने आणि प्रेरणा घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. प्रायोगिक शिक्षण प्रवासाचा गाभा खोल विचार करण्यास शिकवते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कृतीनिहाय योजना विकसीत करण्यास प्रवृत्त करण्याचा हा प्रयत्न होता.



यंदाच्या विज्ञान दिनाची संकल्पना “सायन्स फॉर अ सस्टेनेबल फ्यूचर” अशी असून ऑर्किड्स’च्या भूतकाळातील वैज्ञानिक विजयात तिचे प्रतिबिंब दिसते. त्याचप्रमाणे शाळा पर्यावरणासंदर्भात जागरूक समाजाचे संगोपन करण्याप्रती समर्पणाची खातरजमा करते. सर सी. व्ही. रमण यांच्या 'रमण’स् इफेक्ट' च्या अभूतपूर्व शोधाला सन 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांच्या कामगिरीला सलाम म्हणून दरवर्षी भारतभर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. 



ऑर्किड्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाश्वततेचा प्रसार करण्याच्या अनुषंगाने इयत्ता 6, 7 आणि 8 वी च्या विद्यार्थ्यांकरिता अँपल BKC दालनात विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्राचे आरेखन (डिझाईन) विद्यार्थ्यांमधील पर्यावरण-चेतना प्रज्वलित करण्यासोबत समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसीत करण्यासाठी, शाश्वत विकासाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी करण्यात आले. यावेळी त्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षणामार्फत विशिष्ट शाश्वत संकल्पनांना संबोधित करणारे शॉर्ट व्हीडिओ आणि पोस्टरची निर्मिती करण्यासाठी फ्रिफॉर्म, कॅमेरा आणि किनोट अशी विविध अँप्लिकेशन हाताळता आली. 

 


या उपक्रमाविषयी अधिक बोलताना ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल’च्या व्हीपी अकॅडमिक्स, कविता चटर्जी  म्हणाल्या, "आम्ही राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी देशासोबत सहभागी होताना, ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल’च्या आमच्या विद्यार्थ्यांना एक आकर्षक आणि परिवर्तनशील अनुभव देण्यासाठी मुंबईतील अँपल BKC मध्ये आयोजित कार्यशाळेत आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणात सहभागी होण्याची आणि नाविन्यपूर्ण शाश्वत उपाय शोधण्याची संधी मिळाली. आमच्या विद्यार्थ्यांना सक्षम करून शाश्वतता जीवनशैलीत भिनवण्यासाठी प्रोत्साहित करून, आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची आणि पर्यावरणीय कारभाराची सखोल भावना निर्माण करण्यास मदत करत आहोत".


शाश्वततेवरील कार्यशाळा तंत्रज्ञानविषयक संशोधन, सहयोगात्मक शिक्षण आणि अग्रेसर विचारांची मानसिकता विकसीत करून उज्ज्वल आणि अधिक शाश्वत भविष्याकडे सामूहिक वाटचाल सूचित करते. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने, ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल समाजातील घटकांना आवाहन करते आणि पुढील पिढ्यांसाठी शाश्वत भविष्यासाठी अपरिहार्य मार्ग म्हणून नवकल्पना आणि वैज्ञानिक चौकशी स्वीकारण्याचे आवाहन करते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.