Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रामजन्मभूमी: रिटर्न ऑफ ए स्प्लेंडिड सन’ ने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, श्रद्धा आणि बारकाईने केलेल्या संशोधनामुळे माहितीपटावर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

 रामजन्मभूमीरिटर्न ऑफ  स्प्लेंडिड सन’ ने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेश्रद्धा आणि बारकाईने केलेल्या संशोधनामुळे माहितीपटावर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

 

माहितीपटाला पहिल्याच आठवड्यात मिळाले 3.5 दशलक्ष व्ह्यूजसगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ट्रेंडीं कंटेटमध्ये पटकावला तिसरा क्रमांक

 

अमिश त्रिपाठी आणि दिलीप पिरामल यांच्या उपस्थितीत पार पडला माहितीपटाचा यश सोहळा




 

 

राष्ट्रीय 28 फेब्रुवारी 2024: भारतताला लाभलेल्या अत्यंत वैभवशाली सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या   ‘रामजन्मभूमी: रिटर्न ऑफ ए स्प्लेंडिड सन’  या माहितीपटाच्या यशानिमित्त एका कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्हीआयपी इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष दिलीप पिरामल आणि प्रसिद्ध लेखक तथा या माहितीपटाचे सूत्रसंचालक अमिश त्रिपाठी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.  25 जानेवारी 2024 रोजी हा माहितीपट प्रसारीत करण्यात आला होता.  हा माहितीपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून पहिल्याच आठवड्यात या माहितीपटाला 3.5 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.   सगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ट्रेंडींग कंटेटमध्ये या माहितीपटाने तिसरा क्रमांकावर झेप घेतली आहे. दिलीप पिरामल, इम्मॉर्टल स्टुडिओ (प्रसिद्ध लेखक, माजी मुत्सद्दी आणि माहितीपटाचे सूत्रसंचालक अमिश यांनी स्थापन केलेला स्टुडियो) आणि कासा मीडिया द्वारे निर्मित माहितीपटामध्ये राम जन्मभूमीच्या संपूर्ण इतिहासाचा आणि सखोल सांस्कृतिक प्रभावासंदर्भात करण्यात आलेल्या विस्तृत संशोधनावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

या माहितीपटात भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी सरन्यायाधीश बोबडे, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, प्रसिद्ध संगीतकार उस्ताद अमजद अली खान, मालिनी अवस्थी, प्रतिष्ठित पुरातत्वशास्त्रज्ञ बी.आर.मणी आणि के.के.मोहम्मद यांच्या मुलाखती समाविष्ट करण्यात आल्या आहेत.  याशिवाय इतिहासकार मीनाक्षी जैन, नामवंत पत्रकार मधु त्रेहन यांच्याही मुलाखती या माहितीपटामध्ये पाहायला मिळतात.






या माहितीपटाचे दिग्दर्शन नितीश शर्मा आणि प्रणव चतुर्वेदी यांनी केले आहे. माहितीपटाच्या शीर्षक गाण्याला ग्रॅमी-पुरस्कार विजेते रिकी केज यांनी संगीत दिले असून हे गाणे सोनू निगम आणि मालिनी अवस्थी या प्रतिभावंत गायकांनी गायले आहे.

या माहितीपटाच्या यशानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कौतुक सोहळ्याला रिकी केज, कबीर बेदी, इला अरुण, रवी दुबे, अमित टंडन, अश्विन सांघी यांनी हजेरी लावली होती. त्यांची उपस्थिती या माहितीपटाचे आणि त्याला मिळालेले अभूतपूर्व यश अधोरेखित करणारी ठरली.

दर्शकांना या माहितीपटातून रामजन्मभूमीचे ऐतिहासिक महत्त्व, प्रभू रामाचे जीवन आणि भारतावरील या सगळ्याच्या सांस्कृतिक प्रभावाचा सखोल शोध घेण्यात आला आहे. भारतीय इतिहासातील ही एक अत्यंत महत्त्वाची घटना असून प्रभू श्रीराम अयोध्येत परतले तो क्षण आपण दुसरी दिवाळी म्हणून का साजरा करणे गरजेचे आहे याचे महत्त्व सांगणारी आहे.  अमिश यांनी सांगितलेली कथा, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि विचार करायला लावणाऱ्या विषयांसह राम मंदिराचा आतापर्यंतचा प्रवास आणि त्याची कहाणी ही ठळकपणे प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे.  रामजन्मभूमी मंदिराची सुरुवातीपासून आतापर्यंतची संपूर्ण कथा समजून घेण्यासाठी हा माहितीपट पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

या माहितीपटाच्या निमित्ताने बोलताना प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांनी म्हटले की, "'राम जन्मभूमी: रिटर्न ऑफ अ स्प्लेंडिड सन' या माहितीपटाला मिळालेला प्रतिसाद हा सुखावणारा आहे. आम्ही केलेल्या श्रमाला लाभलेले हे प्रेम आहे. राम जन्मभूमी मंदिराचे निर्माण हे आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा क्षण का आहे, हे आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा क्षण विविध आस्था जपणाऱ्या लोकांना एकत्र आणणारा क्षण आहे. परकीय आक्रमकांनी मंदिर उध्वस्त केल्यानंतर हे मंदिर पुन्हा उभारण्यात आले आणि तिथे मूर्तीपूजा पुन्हा सुरू करण्यात आली. भारताच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे.  ही कथा दृकश्राव्य माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर करता आली याचा निर्मिती चमूला प्रचंड आनंद वाटतो आहे."






अमिश आणि दिलीप पिरामल यांच्यातील सहकार्य हा भारतीय माहितीपट निर्मितीतील एक महत्त्वाचा क्षण आहे. व्हीआयपी इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष दिलीप पिरामल यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, “यशस्वी स्क्रिनिंग आणि आम्हाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे मला फार आनंद झाला आहे. ‘रामजन्मभूमी: रिटर्न ऑफ अ स्प्लेंडिड सन’ हा माझ्यासाठी एक जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे.  निर्माता म्हणून हा माझा पहिला माहितीपट आहे आणि तो जगभरातील लोकांना पाहता यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो.  सखोल माहिती आणि संशोधनाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या हा माहितीपट सांस्कृतिक उपक्रमांबद्दलच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेला पूरक असा आहे.  मला हा विश्वास आहे की या माहितीपटामुळे दर्शकांना माहिती मिळेल, प्रेरणा मिळेल आणि आपल्या सामायिक वारशाद्वारे लोकांना एकत्र आणण्यास प्रोत्साहन मिळेल”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.