Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

केकेसीएलच्‍या किलरकडून भारत टेक्‍स २०२४ येथे त्‍यांचे 'अॅक्‍सेलरेटिंग द परफॉर्मन्‍स' विकास धोरणाचे अनावरण

 *केकेसीएलच्‍या किलरकडून भारत टेक्‍स २०२४ येथे त्‍यांचे 'अॅक्‍सेलरेटिंग द परफॉर्मन्‍स' विकास धोरणाचे अनावरण* 



·         झपाट्याने विकसित होणाऱ्या रिटेल व उत्‍पादन पोर्टफोलिओ विस्‍तारीकरणासह भारतातील व जगभरातील धोरणात्‍मक विस्‍तारीकरण योजनांची घोषणा

        ब्रॅण्‍ड अनुभवामध्‍ये वाढ करण्‍यासाठी मध्‍य-पूर्वमध्‍ये विशेष किलर स्‍टोअर्स लाँच करण्‍याची योजना


·         ब्रॅण्‍ड डिसेंबर २०२५ पर्यंत ५०० एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्सचा टप्‍पा गाठण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहे


·         उत्‍पादन पोर्टफोलिओला नवीन आकार देणे आणि विकास व अवधान वाढवण्‍यासाठी विस्‍तारीकरण करणे सुरू   

:


मार्च. 1 -- भारतीय वस्‍त्रोद्योग जागतिक स्‍पर्धेला सामोरे जाण्‍यासाठी सज्‍ज होत असताना किलर या केवल किरण क्‍लोदिंग लिमिटेड (केकेसीएल) च्‍या अधिपत्‍याखालील आघाडीच्‍या फॅशन ब्रॅण्‍डने आज नवी दिल्‍लीमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या प्रतिष्ठित जागतिक टेक्‍स्‍टाइल इव्‍हेण्‍ट भारत टेक्‍स २०२४ मध्‍ये आपल्‍या विकास योजनांच्‍या नवीन चॅप्‍टरचे अनावरण केले. ब्रॅण्‍डने आपले 'अॅक्‍सेलरेटिंग द परफॉर्मन्‍स विथ डबल-इंजिन' विकास धोरणाला सादर केले, तसेच भारतातील व आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांमधील दीर्घकालीन विकासासाठी धोरणात्‍मक प्राधान्‍यक्रमांना सादर केले. केकेसीएलचे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचलाक श्री. हेमंत जैन यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत किलरच्‍या व्‍यवस्‍थापनाने प्रमुख प्राधान्‍यक्रमांना दाखवले: १. किलरचे भारतातील ३५ वर्षांचे नेतृत्‍व दृढ करणे, २. सर्जनशील उत्‍पादन पोर्टफोलिओला नवीन आकार देणे आणि ३. किलरला भारतमधून जागतिक फॅशन ब्रॅण्‍ड म्‍हणून उदयास आणणे.



या इव्‍हेण्‍टबाबत मत व्‍यक्‍त करत केकेसीएलचे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. हेमंत जैन म्‍हणाले, ''भारत टेक्‍स २०२४ ची घोषणा दूरदर्शी भारत सरकारने केली, यासह आम्‍ही आमचा प्रमुख ब्रॅण्‍ड किलरसाठी नवीन मोठ्या चॅप्‍टरचा शुभारंभ केला. आज, या प्रतिष्ठित इव्‍हेण्‍टमध्‍ये भारतातील व जगभरातील प्रेक्षकांसमोर आमच्‍या नवीन विकास धोरण आराखड्याचे अनावरण करताना सन्‍माननीय वाटत आहे. इक्‍वली एनचॅन्टीग हे आमचे क्रिएटिव्‍ह बूथ आहे, जेथे आम्‍ही अभिमानाने आमच्‍या अत्‍याधुनिक उत्‍पादनांची व्‍यापक श्रेणी आणि आगामी एडब्‍ल्‍यू२४ कलेक्‍शन दाखवले. आम्‍हाला किलर ब्रॅण्‍डमध्‍ये त्‍याच्‍या आगामी विकास टप्‍प्‍यासाठी परिवर्तन घडवून आणण्‍यासाठी आतापर्यंत केलेल्‍या कामगिरीचा अभिमान वाटतो. आमच्‍या नवीन विकास धोरणासह आमचा आमच्‍या अंतर्गत क्षमतांना दृढ करण्‍याचा, स्‍पर्धात्‍मक फायदे घेण्‍याचा आणि जागतिक स्‍तरावरील आजच्‍या तरूणांना ट्रेण्‍डी फॅशन वीअरेबल सोल्‍यूशन्स प्रदान करत राहण्‍यासाठी नाविन्‍यतांमध्‍ये गुंतवणूक करण्‍याचा मनसुबा आहे. आमचे मल्‍टी-ब्रॅण्‍ड आऊटलेट्स (एमबीओ) आणि ओम्‍नीचॅनेल उपस्थितीमध्‍ये वाढ करण्‍यासह आमची डिसेंबर २०२५ पर्यंत भारतात ५०० एक्‍सक्‍लुसिव्‍ह आधुनिक किलर ब्रॅण्‍ड स्‍टोअर्सचा टप्‍पा गाठण्‍याची योजना आहे.''


जागतिक विकास योजनांबाबत मत व्‍यक्‍त करत श्री. जैन पुढे म्‍हणाले, ''विश्‍व मोठे आहे आणि उत्तम काळ आला आहे, जेथे अभिमानी भारत ब्रॅण्‍ड किलरने भारतातील सखोल उपस्थितीव्‍यतिरिक्‍त विस्‍तार करण्‍यास आणि इतर प्रांतांमध्‍ये प्रवेश करण्‍यास सुरूवात केली, जेथे आम्‍हाला आगामी वर्षांमध्‍ये मोठा विकास होण्‍याची अपेक्षा आहे. किलर ब्रॅण्‍ड अनुभवामध्‍ये वाढ करत आम्‍ही मध्‍य-पूर्वमध्‍ये आमच्‍या एक्‍सक्‍लुसिव्ह ब्रॅण्‍ड स्‍टोअर्सना लाँच करण्‍याची तयारी करत आहोत, जेथे आमच्‍या एमबीओ सहयोगींच्‍या माध्‍यमातून आमची प्रबळ उपस्थिती आहे. ईस्‍टर्न युरोपवर लक्ष केंद्रित करत आमचे धोरणात्‍मक विस्‍तारीकरण सुरू आहे, ज्‍यामुळे युरोपच्‍या उर्वरित भागांमध्‍ये आमच्‍या ब्रॅण्‍डला उपस्थिती वाढवण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, आम्‍ही आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांसाठी ५० डॉलर्सपासून २०० डॉलर्सपर्यंत (४,००० रूपये ते १६,००० रूपये) प्रिमिअम किंमत मॉडेल डिझाइन केले आहे. थोडक्‍यात, आमच्‍या 'अॅक्‍सेलरेटिंग द परफॉर्मन्‍स विथ डबल-इंजिन' विकास धोरणासह मला विश्‍वास आहे की आम्‍ही प्रबळ, साहसी आणि ट्रेण्डियर आंतरराष्‍ट्रीय फॅशन ब्रॅण्‍ड म्‍हणून गती कायम राखू.''


किलरने अलिकडील काळात आपल्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओला धोरणात्‍मकरित्‍या नवीन आकार देत, तसेच टॉप-वेअर उत्‍पादनांमध्‍ये वाढ करण्‍यावर आणि फूटवेअर, अंडरगारमेंट्स व विविध प्रकारच्‍या अॅक्‍सेसरीज अशा नवीन श्रेणी सादर करत मोठी प्रगती केली आहे. ब्रॅण्‍डच्‍या बॉटम-वेअर उत्‍पादनांनी भारतातील अनेक प्रांतांमध्‍ये बाजारपेठ अग्रस्‍थान कायम ठेवले आहे. किलर आपली उपस्थिती प्रबळ करण्‍यासाठी आणि परिपूर्ण फॅशन वॉर्डरोबचा शोध घेणाऱ्या पुरूषांसाठी पसंतीचा बनण्‍यासाठी व्‍यवहारांना नवीन आकार देणारा अतिरिक्‍त पोर्टफोलिओ सक्रियपणे तयार करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.