Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एमजीएलची इ-मोबिलीटी क्षेत्रात आगेकूच

 एमजीएलची इ-मोबिलीटी क्षेत्रात आगेकूच

 

महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी ३इव्ही इंडस्ट्रीज प्रालि. कंपनीमध्ये रु. ९६ कोटींचे समभाग ओतण्यासाठी त्या कंपनीबरोबर शेअर सबस्क्रिप्शन करारावर (एसएसए) सह्या केल्या. ही गुंतवणूक जी साखळ्यांमध्ये केली जाणार आहेसामान्य क्लोजिंग तरतूदींच्या अधीन आहे. पहिली साखळी या महिन्याच्या अखेरीला गुंतवली जाणे अपेक्षित आहे.


३इव्ही इंडसट्रीज् ही एक २०१९ मध्ये बंगलोरकर्नाटक मध्ये स्थापन झालेली इलेक्ट्रिक व्हेइकल ओइएम आहे. कंपनी एल५ प्रवर्गातील थ्री-व्हील कार्गोपॅसेंजरआणि आयसीई-ते-इव्ही रुपांतरित इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करते. त्यांच्या प्रिमीयम इव्हीज् आघाडीच्या इ-कॉमर्सरिटेल आणि लास्ट माइल लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या वाहतूकीच्या गरजा भागवण्यासाठी वापरल्या जातात. या गुंतवणूकीचा उपयोग कंपनीकडून ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक्स कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या आरअँडडी प्रकल्पांना पाठबळ पुरवण्यासाठी आणि बॅटरी-एज-ए-सर्विस(बीएएएस) सह आफ्टर मार्केट सेवा विकसित करण्यासाठी  केला जाईल.





 या प्रसंगी बोलतानाश्री. आशु सिंघलएमजीएलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, “एमजीएलतिच्या स्थापनेपासून अधिकाधिक हरित पर्यावरणाची समर्थक राहिली आहे. या गुंतवणुकीमुळे लास्ट माईल लॉजिस्टिक सेगमेंटसाठी ईव्ही इकोसिस्टम मजबूत होण्यास मदत होईल, प्रामुख्याने डिझेल वाहनांच्या जागी जलद अवलंब करणे सुलभ होईल आणि कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी होईल.

एमजीएल अतिरिक्तपणे चार्जिंग किंवा स्वॅपिंग सुविधा उभारण्याची सुविधा देऊ शकते ज्यामुळे 3ev त्याच्या ग्राहकांना खात्रीशीर चार्जिंग पायाभूत सुविधांद्वारे व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत करू शकते.” श्री. सिंघल यांनी पुनरुच्चार केला,“ एमजीएल आपला मुख्य क्षेत्रातील व्यवसाय मजबूत करत आहे आणि त्याचवेळी उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करत आहेईव्ही क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे ऊर्जा मूल्य साखळीतील आमच्या उपस्थितीला आणखी पूरक ठरेलएमजीएल इव्ही क्षेत्रामध्ये सर्वांगीण दृष्टिकोन ठेवते आणि विश्वास ठेवते की EV मूल्य साखळीतील सहभाग त्याच्या उदयोन्मुख टप्प्यात या क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.”

 

श्री. पीटर वोकनर३इव्हीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, “एमजीएलने ३इव्ही मध्ये गुंतवणूक करून आमच्या व्यवसायात, व्यवस्थापकीय संचात आणि भवितव्यात तिचा विश्वास व्यक्त करून आमचा मोठा सन्मान केला आहे. एमजीएल आणि इव्ही तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म म्हणून आमच्या वाढत्या व्यवसायामध्ये, केवळ इव्हीज च्या प्रवेगक अवलंबनातूनच नव्हे, तर ३इव्हीच्या मालकीच्या बीएएएस (BaaS) मॉडेलसह उदयोन्मुख बॅटरी इकोसिस्टममध्ये महत्त्वपूर्ण समन्वय आहेत. इव्ही वापरकर्तेत्यांचे ग्राहक आणि इतर हितसंबंधींसाठी उच्च स्पर्धक टीसीओज् सक्षम करणाऱ्या परिपूर्ण जीवन-चक्रावरील आमचा प्रकाशझोतआमच्या स्वच्छ तंत्रज्ञानाला मार्केटमधील आवकाशात एक स्पष्ट मूल्य प्रस्ताव देते. एमजीएलच्य मौल्यवान पाठिंब्यामुळे आम्हाला भारतात आणि त्यापलीकडे इव्हीच्या अंतःप्रवेशाच्या आणि व्यापारीकरण झपाट्याने वाढवण्याच्या अनेक संधी दिसत आहेत.”

क्रिसिल एमजीएलला व्यवहार सल्लागार होती. एचडीएफसी ३व्हीला व्यवहार सल्लागार होती.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.