मुंबईचे डब्बेवाले प्रोटिन राइसचे महत्व मुंबईकरांना पटवून देणार
डबेवाल्यांसोबत ‘फॉर्च्युन सोया’ ने केली भागीदारी
मुंबई, १ मार्च २०२४ – अदानी विल्मार या आघाडीच्या खाद्यपदार्थ आणि एफएमसीजी कंपनीने प्रसिद्ध मुंबई डब्बावाला असोसिएशनची वर्ल्ड प्रोटिन डे निमित्त करार केला असून त्याद्वारे फॉर्च्युन सोया चंक्सच्या पॅक्सचे वितरण करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रोटिन राइसचे महत्त्व तसेच ‘घर का खाना, घर का होता है’ हा ब्रँडचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय आहे. कार्यक्षम मुंबई डबेवाल्यांनी मुंबईकरांना त्यांच्या जेवणाच्या डब्याबरोबरच फॉर्च्युन सोया चंक्सचा पॅक देत आश्चर्याचा सुखद धक्का दिला. यामुळे प्रोटिनचे महत्त्व ठसवण्यास मदत झाली, शिवाय रोजच्या जेवणात सोया चंक्सचा समावेश करण्याने अगदी सहजपणे जेवणातील पोषक घटक वाढवणे शक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. फॉर्च्युन सोयाने मुंबई डबेवाल्यांसह केलेली भागिदारी वितरणाच्या पलीकडे जाणारी आहे. कंपनीने प्रत्येक डबेवाल्याला फॉर्च्युन सोया टी- शर्ट्स, प्रोटिनयुक्त आहाराची माहिती देणारी पत्रके, प्रत्येक डब्याबरोबर माहितीपत्रके देण्यात आली आहेत, ज्यामुळे ग्राहकांना प्रोटिनयुक्त आहाराचे फायदे जाणून घेता येतील. त्याशिवाय डबेवाल्यांच्या प्रयत्नांना दाद म्हणून त्यांनाही फॉर्च्युन सोया चंक्सचे पॅक देत आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
श्री.जिग्नेश शाह, फॉर्च्युन ब्रँडचे मीडिया प्रमुख, अदाणी विल्मार म्हणाले,''वर्ल्ड प्रोटिन डे निमित्त या अर्थपूर्ण उपक्रमासाठी मुंबई डबेवाल्यांसह भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम आमच्या ‘घर का खाना, घर का होता है’ या ब्रीदवाक्याशी सुसंगत आहे. अदाणी विल्मारला आम्ही सोया चंकसारखे संपूर्ण प्रोटिन उपलब्ध करून देत असल्याचा अभिमान वाटतो. त्यामध्ये सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक अमिनो असिड्सचा समावेश करण्यात आला आहे. सोया चंकचे पॅक तसेच प्रोटिनयुक्त आहाराचे फायदे सांगणाऱ्या माहितीपत्रकाचे वितरण करून आम्ही योग्य आहाराच्या सवयी रूजवण्याचे व वैयक्तिक तसेच सामाजिक आरोग्य उंचावण्याचे ध्येय ठेवले आहे.''