Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्राग बुद्धिबळातील विजयासह ऑर्किंडीयन अंश नेरूरकरने इतिहास रचला;फ्युचर कॅटेगरी जिंकणारा पहिला भारतीय बनला


 *प्राग बुद्धिबळातील विजयासह ऑर्किंडीयन अंश नेरूरकरने इतिहास रचला;फ्युचर कॅटेगरी जिंकणारा पहिला भारतीय बनला* 




पोलंड, स्लोवाकिया, झेक खेळाडूंविरुद्ध भव्य विजयासह अंश हा विक्रम नोंदविणारा पहिला भारतीय बनला!

अंश नेरुरकरने 132 एफआयडीए गुण कमवत, प्राग चेस फ्युचर कॅटेगरी जिंकली 

भारताच्या ग्रँडमास्टर प्राग्ननंधासह बेस्ट टीम अॅवॉर्ड देखील जिंकला 


राष्ट्रीय, 21 मार्च 2024: अंश नेरुरकर या ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, बोरीवली कॅम्पसच्या सहावीच्या विद्यार्थ्याने प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय प्राग बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळवला, आणि प्राग चेस फ्युचर कॅटेगरी जिंकून असा विक्रम करणारा पहिला भारतीय बनला.  


ही स्पर्धा अलीकडे एफआयडीईशी संलग्न असलेल्या युरोपियन चेस फेडरेशनद्वारा पुरस्कृत झेक चेस फेडरेशनद्वारा आयोजित करण्यात आली होती. अत्यंत स्पर्धात्मक फ्युचर्स कॅटेगरी स्पर्धेत जगभरातील 10 आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत एक कठोर असे राउंड-रॉबिन स्वरूप होते, ज्यात सहभाग्यांची एफआयडीईचे रेटिंग आणि वयाच्या निकषाच्या आधारावर निवड झाली होती. 


7 विजय आणि 2 अनिर्णीत निकालांसह 9 राउंडसमध्ये प्रभावी असे 8 गुण मिळवून स्पर्धेत वर्चस्व गाजवत, आंशने आपल्या लक्षणीय कामगिरीचे प्रदर्शन केले. त्याच्या अद्भुत कामगिरीमुळे त्याला उल्लेखनीय असे 132 एफआयडीई रेटिंग पॉइंट्स मिळाले, ज्यामुळे त्याचे एकंदर रेटिंग 1786 झाले. तो ब्रेझीना पावेल (पोलंड, एफआयडीई 1914) आणि आंद्रे टॉमस (स्लोवाकिया, एफआयडीई 1915) सारख्या खेळाडूंशी लढून देखील अपराजित राहिला.


अंश येत्या महिन्यांमध्ये “एफआयडीईकडून कँडिडेट मास्टरचे” आजीवन शीर्षक मिळवण्यासाठी देखील पात्र ठरला आहे. यासोबत, अंशने ग्रँडमास्टर प्राग्ननंधासह या स्पर्धेत बेस्ट टीम अॅवॉर्ड देखील जिंकत जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधील आपले सामर्थ्य दाखवून दिले. 




अंशच्या विजयात भारतीय बुद्धिबळातील दिग्गज विश्वनाथन आनंद या देशाच्या पहिल्या ग्रँडमास्टरच्या अविस्मरणीय कामगिरीची झलक दिसून येते. अंशने आजवरच्या बुद्धिबळाच्या प्रवासात 163 विजय, 47 अनिर्णीत आणि 68 पराभवांचा एक लक्षणीय यशापयश स्थापित केले आहे.


या उदाहारणीय संपादनाविषयी बोलताना, अंश नेरुरकर म्हणाला, “हे चॅम्पियनशिप जिंकणे एका स्वप्नाप्रमाणे आहे! हे सत्यात उतरलेले एक स्वप्न आहे, आणि मी माझे आईवडील, शिक्षक, प्रशिक्षक आणि ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या समर्थनाशिवाय इथवर पोहोचू शकलो नसतो. मी झेक चेस फेडरेशन, ग्रँडमास्टर प्राग्ननंधा, आणि या प्रसंगात सहभागी असलेल्या इतर अविश्वसनीय व्यक्तिमत्त्वांचे विशेष आभार मानू इच्छितो. त्यांच्या उपस्थितीमुळे हा प्रसंग माझ्यासाठी अत्यंत खास बनला.”


ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, बोरीवली कॅम्पसच्या मुख्याध्यापिका अनघा प्रभू म्हणाल्या, “आम्हाला आंतरराष्ट्रीय प्राग बुद्धिबळ स्पर्धेतील अंशच्या यशाबद्दल अत्यंत अभिमान वाटतो. अंशचे यश आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा आहे. हे शीर्षक संपादन केल्याबद्दल अंशला माझ्या हार्दिक शुभेच्छा. ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल येथे वर्गातील शिक्षणाच्या पलीकडील उपक्रम देऊन आमच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्णायक विचार आणि क्रीडागुण विकसित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.





ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलचे प्रतिनिधित्व करताना, अकॅडमिक्स-स्पोर्ट्सचे व्हीपी पियुष रंजन राय म्हणाले, “हे उल्लेखनीय संपादन युवा प्रतिभेचे संगोपन करण्यातील ऑर्किड्सच्या खेळातील अभ्यासक्रमाची परिणामकारकतेस ठळक करते. आम्हाला सर्जनशीलतेच्या संस्कृतीची जोपासणी करण्यात अत्यंत अभिमान वाटतो आणि आमच्या विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या उपक्रमांमध्ये दाखवलेल्या समर्पण आणि प्रतिभेची प्रशंसा करतो. हा प्रसंग खेळाच्या जिद्दीसह अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचे संगोपन करण्याच्या आमच्या प्रयत्नातील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो.”


अंश नेरुरकरची अद्वितीय कामगिरी त्याच्यासारख्या तरुण प्रतिभांच्या नेतृत्वात उज्ज्वल भविष्य असलेल्या भारतीय बुद्धिबळ या खेळातील एक उगवता तारा म्हणून उदयास येण्याचे संकेत देते. अंशने वयाच्या सातव्या वर्षी 2019 मध्ये बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केले. आजपर्यंत त्याने केलेल्या मुख्य कामगिरींमध्ये आहेत:  

- 2023 मधील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर – विशाखापट्टणम येथे झालेल्या राष्ट्रीय अंडर-11 बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.

- 2022 च्या एप्रिलमध्ये त्याने जम्मू येथे झालेल्या राष्ट्रीय अंडर-11 बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये कास्यपदक जिंकले.  

- 2023 च्या डिसेंबरमध्ये मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र चेस रॅपीड चेस राष्ट्रीय अंडर-11 बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.

त्याचे अंतिम उद्दिष्ट 2900 रेटिंगचा अवरोध पार करून जगातील सर्वात आघाडीचा खेळाडू बनणे आहे. सध्या अंश 2012 मध्ये जन्मलेल्या भारतातील सर्व बुद्धिबळ खेळाडूंमध्ये 3 ऱ्या क्रमांकावर आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.