मिलाग्रोने अत्याधुनिक रोबोटिक क्लीनर्स सादर केले
मुंबई, २९ मार्च २०२४: भारतात सुरु आणि विकसित झालेला कन्ज्युमर रोबोटिक्सचा ब्रँड मिलाग्रो ह्युमनटेकने आयमॅप २३ ब्लॅक, आयमॅप १४ आणि ब्लॅककॅट२३ ही रोबोटिक फ्लोर क्लीनिंग सोल्युशन्सची सर्वात नवी श्रेणी लॉन्च केली आहे. इंटेलिजंट नेव्हिगेशन आणि स्मार्ट होम इंटिग्रेशनसह सर्वोत्तम स्वच्छता करण्याची क्षमता मिलाप असलेल्या या अत्याधुनिक उत्पादनांमध्ये ग्राहकांना जमिनीच्या स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छता, सुविधा आणि कार्यक्षमतेची नवी पातळी अनुभवायला मिळते. या सर्व रोबोट्समध्ये प्रोप्रायटरी मिलाग्रो सॉफ्टवेयर आरटी२आर-रिअल टाइम टेरेन रेकग्निशन तंत्रज्ञान आहे.
मिलाग्रो ह्युमनटेकचे व्हीपी अमित गुप्ता यांनी सांगितले, "मिलाग्रोमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणतील अशी नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमच्या नवीन ब्लॅककॅट २३, आयमॅप १४ आणि आयमॅप २३ ब्लॅक रेन्जसह आम्ही फरशीच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक रोबोटिक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची शक्ती उपलब्ध करवून देत आहोत. ही उत्पादने स्वच्छतेची सर्वोत्तम कामगिरी बजावतात, इतकेच नव्हे तर अतुलनीय सुविधा व स्मार्ट होम इंटिग्रेशन देखील देतात. भारतात रोबोटिक क्रांतीमध्ये आम्ही आघाडीवर आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, ऑटोमेशनची शक्ती प्रदान करून आम्ही आमच्या ग्राहकांची नेहमीच्या कंटाळवाण्या कामातून सुटका करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे."
आयमॅप २३: सर्वोत्तम रोबोटिक क्लीनिंग सोल्युशन
फ्लॅगशिप सेल्फ एम्पटिंग आयमॅप २३ ब्लॅक रेन्जची किंमत ४९,९०० रुपयांपासून पुढे असून यामध्ये हातांचा अजिबात वापर न करता स्वच्छता करण्याचा संपूर्ण अनुभव घेता येतो. आयमॅप२३ ब्लॅकचा डस्टबिन सर्वात मोठा ४ लिटर क्षमतेचा आणि डिस्पोजेबल असून ७० पेक्षा जास्त दिवस हातांचा अजिबात वापर न करता स्वच्छता करता येऊ शकते. यामध्ये अल्टिमेट रोबोटिक सिक्स्थ सेन्स क्लिनिंग तंत्रज्ञान आहे. इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅन्क असलेला संपूर्णपणे स्वतंत्र सेल्फ-नेवीगेटिंग रोबोट ५ मजल्यांपर्यंतचे मॅप स्टोर करून ठेवू शकतो, त्यामुळे अनेक मजले किंवा भागांची स्वच्छता याच्या साहाय्याने करता येते.
मिलाग्रो आयमॅप १४: ऑटोनॉमस क्लीनिंगची नवी व्याख्या
आयमॅप १४ ची किंमत २९,९९० रुपयांपासून पुढे आहे. हा संपूर्णपणे स्वतंत्र सेल्फ-नेवीगेटिंग रोबोट असून यामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅन्क आहे. अत्याधुनिक आरटी२आर २.० नेव्हिगेशन तंत्रज्ञान व स्वतः विकसित केलेले सॉफ्टवेयर यामध्ये असून रोबोटिक कमांड ६ भारतीय भाषांमध्ये दिल्या जाऊ शकतात, भारतीय घरांच्या स्वच्छतेच्या गरजांनुसार क्लीनिंग अल्गोरिदम वापरले जाऊ शकतात. हा रोबोट वेगवेगळे मॅप स्टोर करून ठेवू शकतो, ३००० चौरस फीटपर्यंत मोठ्या भागात संपूर्ण क्षमतेने स्वच्छता करू शकतो. दर सेकंदाला ४००० वेळा ६*३६० डिग्रीमध्ये फिरून स्कॅन करणारे स्मार्ट लेजर नेव्हिगेशन असल्याने आयमॅप १४ पारंपरिक क्लीनर्सइतक्याच वेळेत दुप्पट मोठा भाग स्वच्छ करू शकतो.
मिलाग्रो ब्लॅककॅट २३ रेन्ज: सहजसोपे स्मार्ट क्लीनिंग
ब्लॅककॅट२३ रेन्जची किंमत सहज परवडण्याजोगी १६९९० रुपयांपासून पुढे आहे, यामध्ये सर्वात नवे ब्लॅककॅट-२३ मॉडेल आहे. अत्याधुनिक गायरो मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हा रोबोटिक व्हॅक्युम क्लीनर रिअल टाइम क्लीनिंग प्रक्रिया ऍपवर दाखवतो आणि ३१० एमएल इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड वॉटर टॅन्कसह फुल वेट मॉपिंग क्षमता प्रदान करतो. यामध्ये जपानी ब्रशलेस मोटर, २७००पीए सक्शन पॉवर आहे, ब्लॅककॅट २३ स्वच्छतेच्या बाबतीत अतुलनीय कामगिरी बजावतो, घाण, धूळ व पाळीव प्राण्यांचे केस सहजपणे उचलू शकतो.