विविध उद्योगक्षेत्रांमध्ये अभियंत्यांना कौशल्य वाढवण्यासाठी
बिट्स पिलानी तर्फे 'स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग पीजी डिप्लोमा प्रोग्राम’
मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४: बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS), पिलानीच्या वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम्स (WILP) विभागाने स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नवीन पीजी डिप्लोमा प्रोग्राम सादर केला आहे. हा अभ्यासक्रम डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन ऑपरेशन्सची रचना, अंमलबजावणी आणि व्यवस्थापन करण्यासाठी विविध उद्योगक्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यांना मदत करण्याकरता डिझाइन केलेला आहे. हा अभ्यासक्रम करिअरमध्ये खंड पडू न देता पूर्ण करता येऊ शकतो. उत्पादन क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम विकसित केला गेला आहे.
पीजी डिप्लोमा प्रोग्राममध्ये ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्रियल IoT आणि ऑपरेशन्स मॅनेजमेंट अशा तीन विस्तृत संकल्पना आहेत. डेटा मिळवण्यापासून ते डिजिटल फॅक्टरी साकारण्यापर्यंतच्या प्रक्रियांची श्रेणी यामध्ये आहे. यात मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल IoT, बिग डेटा ॲनालिटिक्स, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन, क्लाउड कंप्युटिंग, कनेक्टेड मॅन्युफॅक्चरिंग, मायक्रोफॅब्रिकेशन आणि सायबर सिक्युरिटी यासारख्या डिजिटल कारखान्यांच्या तंत्रज्ञान सक्षम करणाऱ्या गोष्टींचा समावेश आहे. या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ मार्च २०२४ आहे.
स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग पद्धतींच्या अंमलबजावणीत मदत करण्यासाठी अनुभवात्मक शिक्षण विविध उद्योगांमधील जागतिक कंपन्या स्मार्ट उत्पादन पद्धती लागू करण्यात प्रचंड स्वारस्य दाखवत आहेत. फॉर्च्यून बिझनेस इनसाइट्सच्या मते, २०२२ मध्ये जागतिक स्मार्ट उत्पादन बाजारपेठेचे मूल्य २७७.८१ अब्ज डॉलर होते आणि २०२३ मधील ३१०.९२ अब्ज डॉलर वरून २०३० पर्यंत ७५४.१ अब्ज डॉलर पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत १३.५% चा CAGR आहे. या अभूतपूर्व वाढीमध्ये सहभागी होण्यासाठी, अभियंत्यांना स्मार्ट उत्पादन पद्धतींमध्ये स्वत:चे कौशल्य उंचावणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि इंडस्ट्री 4.0 घटकांची सखोल माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव घेणे यांचा समावेश आहे.
वास्तव-जगातील केस स्टडी अनेकदा अभियंत्यांना उद्योगांना भेडसावणारी विशिष्ट आव्हाने आणि उपाय समजून घेण्यास मदत करतात, त्यांना सर्व प्रकारच्या भूमिका पार पाडण्यासाठी तयार करतात. अभ्यासक्रमात प्रायोगिक शिक्षण सामावून घेतल्यामुळे प्रत्यक्ष अनुभव आणि व्यावहारिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात. त्यानुसार, संस्था विद्यार्थ्यांना त्यांच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये प्रवेश देते. त्यामध्ये दूरवरून अॅक्सेस करण्यायोग्य आणि संगणक-नियंत्रित उपकरणांचा समावेश आहे.
प्रा.परमेसव चिदंपरम,प्रमुख- WILP विभाग कोअर अभियांत्रिकी गट म्हणाले,“हा अभ्यासक्रम सहभागींमध्ये सर्जनशीलता, नावीन्यता आणि प्रभावी सहयोग वाढवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान, डेटा ॲनालिटिक्स, ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि सायबर सिक्युरिटी या सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात कौशल्य प्रदान करतो. यामुळे त्यांना एकाहून अधिक प्रकारचे तंत्रज्ञान आणि प्रक्रिया एकत्रित करण्याच्या क्षमतेसह मदत होते. जोडीला त्यांच्या अनुभवाने शिकण्याच्या संधींमुळे समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि निर्णय घेण्याची त्यांची क्षमता वाढते. त्यामुळे त्यांना इंडस्ट्री 4.0 ची मोठी आव्हाने स्वीकारण्यास मदत होते आणि स्मार्ट कारखान्यांच्या विकासात ते योगदान देऊ शकतात.”
अभ्यासक्रमाबद्दल अधिक जाणून घ्या-https://bits-pilani-wilp.