Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ईएफ़एल ३पीएल ने आपल्या भारतातील कामाचा विस्तार करण्याकरिता मुंबईमधे एका प्रमुख वितरण केंद्राची सुरवात केली आहे


 *ईएफ़एल ३पीएल ने आपल्या भारतातील कामाचा विस्तार करण्याकरिता  मुंबईमधे एका प्रमुख वितरण केंद्राची सुरवात केली आहे* 


१७५,००० चौ.फ़ू. वर विस्तारलेल्या या केंद्राकरिता , कंपनीने ५मिलियन (₹ ५०लाख) अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली असून  यामुळे एक आधुनिक  दर्जा  ए ची वेअरहाऊसिंग सुविधा निर्माण होणार आहे.



मुंबई, 1st March २०२४- ईएफ़एल ३पीएल ही ईएफ़एल ग्लोबलची जागतिक उपकंपनी  असून त्यांच्या  द्वारे भारतातील , मुंबईमधील भिवंडीमधे एक ग्रेड ए  असलेली गोदाम  सुविधा सुरू करण्याचे जाही र करण्यात आले आहे. या धोरणात्मक विस्तारामुळे, ५मिलियन (५० लाख) अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे;  यामुळे ईएफ़एल ३पीएलची भारतातील आपले अस्तित्वं सुधारण्याची बांधिलकी दिसून येते तसेच अथ: पासून इति पर्यंत पुरवठा आणि व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने करण्याची सक्षमता दिसून येते. लॉजिस्टिक्स उपाय योजनांचे आणि सप्लाय चे व्यवस्थापनामधे नेतृत्वं करण्याकरिता भक्कम निर्मीती उभी राहाणार आहे.  


भारतीय-बाजार व्यवस्थेमधील आपल्या २५ वर्षांचा अनुभवानंतर, ईएफ़एल ने फ़्रिट लॉजिस्टिक्स सेवांमधे  एक विश्वसनीय प्रदाता म्हणून स्वत:चे असे स्थान निर्माण केले आहे.या शिवाय आपल्या आत्याधुनिक वेअर हाऊस सुविधेमुळे ईएफ़एल आणि ईएफ़एल ३-पीएलचा क्षमतांमधे वाढ होणार आहे , आणि त्यांना विविध क्षेत्रातील आपल्या वेगवेगळ्या ग्राहकांना सर्वप्रकारच्या  सुविधा प्रदान करता येऊ शकतात. १७५,००० चौ.फ़ूटाचा ग्रेड ए वेअर हाऊस मध्ये  विविध सुविधा आणि आधुनिक पुरवठा  तंत्रज्ञानाची सोय असणार आहे. ईएफ़एल ३- पीएलचा एकूणच पुरवठा  उपाय योजनांप्रती असलेला दृष्टीकोन  आणि त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानासह कल्पकतेमुळे ग्राहकाचा  गरजा या अधिक कार्यक्षम पद्धतीने आणि  तत्परतेने  पूर्ण करण्याची हमी त्यांच्याकडून  मिळू शकते.



 ईएफ़एल इंडियाचे सीईओ, श्री, रूसो रामचंद्र्न म्हणाले, “ आम्हाला मुंबईमधील वेअर हाऊसचे उद्घाटन करताना अतीशय आनंद होतो आहे. या गुंतवणूकीमुळे  उत्तम अशी सेवा ग्राहकांना प्रदान करण्याची आणि भारतीय बाजारपेठेतील वाढत्या  गरजा पूर्ण करण्याची  आमची बांधिलकी दिसून येते. या आत्याधुनिक सुविधेमुळे, आम्ही फ़क्त आमच्या  कार्यातील पाऊलखूणा विस्तारण्याचा प्रयत्न करत नसून  आम्ही कल्पक आणि विश्वसनीय अशा लॉजिस्टिक्स उपाय योजना देण्याप्रती आमची हमी अधोरेखित करित आहोत. हे वेअर हाऊस नियोजन आणि गुंतवणूकीचे एक उत्तम एकत्रित सादरीकरण आहे असे म्हटले तरी चालेल. आम्हाला असा विश्वास आहे की गुणवत्ता आणि ग्राहकांचे मूल्य जपत  लॉजिस्टिक्सच्या  गरजा एकाच ठिकाणी उपलब्ध असण्याची एक महत्वाची आमची भुमिका यामुळे प्रस्थापित होईल. भारतातील आमचे अस्तित्व  अधिक बळकट करत आमच्या ग्राहकांचा  विकास आणि यशामध्ये आम्ही भागीदार होऊ शकू अशी आम्ही आशा करतो.”


ईएफ़एल ३-पीएल चे वैशिष्ठ्य हे  लॉजिस्टिक्स उपाययोजनांमधे कंत्राट तत्वावर विविध उपायोजना प्रदान करण्याचे आहे, यामध्ये ग्राहकाला  उत्तम स्पर्धात्मक असे लाभ चांगल्या आणि गुणवत्तापूर्ण सप्लाय चेनच्या  माध्यमाने करून दिले जातात. बेसिक वेअरहाऊस पासून ३पीएल उपाययोजना या कंपनीच्या  धोरणात्मक, आत्याधुनिक एकत्रित तंत्रज्ञानाच्या  बळासह ग्राहकांच्या  आगळ्यावेगळ्या आणि वेळेशी संवेदनशील असलेल्या गरजा परिणामकारकरित्या पूर्ण करतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.