इझमायट्रिपची झॅगलसह भागीदारी
मुंबई, ८ मार्च २०२४: इझमायट्रिप या भारतातील आघाडीच्या ट्रॅव्हल टेक व्यासपीठाने एकीकृत प्रवास व खर्च व्यवस्थापन सोल्यूशन्स देण्यासाठी झॅगल प्रीपेड ओशियन सर्विसेस लिमिटेडसोबत धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली आहे. झॅगल प्रीपेड ओशियन सर्विसेस लिमिटेड ही सास फिनटेक कंपनी आहे, जी कॉर्पोरेट्सना खर्च व्यवस्थापन उत्पादने व सोल्यूशन्स देते.
इझमायट्रिपच्या कॉर्पोरेट क्लायण्ट्सना आता झॅगलचे ईएमएस व्यासपीठ मिळेल, जे एण्ड-टू-एण्ड प्रवास व खर्च व्यवस्थापन सोल्यूशन्स देते, ज्यामध्ये फ्लाइट्स, हॉटेल्स व इतर प्रवास व्यवस्थांचे बुकिंग करण्यापासून प्रवासादरम्यान होणाऱ्या खर्चाचे व्यवस्थापन करण्याचा समोवश आहे.
इझमायट्रिपचे सह-संस्थापक श्री. रिकांत पिट्टी म्हणाले, ''आम्हाला आघाडीची सास फिनटेक कंपनी झॅगलसोबतच्या आमच्या धोरणात्मक सहयोगाचा आनंद होत आहे. ट्रॅव्हल बुकिंगला खर्च रिपोर्टिंगसोबत एकीकृत करत आम्ही आमच्या कॉर्पोरेट क्लायण्ट्सना सुव्यवस्थित कार्यप्रवाह, धोरण अनुपालन आणि प्रवास खर्चाबाबत रिअल-टाइम दृश्यमानता देतो. झपाट्याने विकसित होत असलेल्या पर्यटन क्षेत्रात या सहयोगामधून नाविन्यता आणि अद्वितीय मूल्य प्रदान करण्यापती आमची कटिबद्धता दिसून येते.''
ट्रॅव्हल बुकिंग कार्यक्षमतेसह खर्च रिपोर्टिंग क्षमतांना एकत्र करत हा सहयोग सुव्यवस्थित कार्यप्रवाह देतो, कॉर्पोरेट धोरणांचे पालन होण्याची खात्री देतो आणि प्रवास खर्चाबाबत रिअल-टाइम दृश्यमानता देतो. कॉर्पोरेट प्रवास आणि वाढते खर्च व्यवस्थापन सोल्यूशन्स यांच्यामध्ये दृढ संबंध आहे, जेथे कॉर्पोरेट ट्रॅव्हल अधिक प्रवास आकारमान, खर्च नियंत्रणावर फोकस, सुधारित प्रवासी अनुभवासह मागणीला चालना देत आहे. तसेच आधुनिक खर्च व्यवस्थापन सोल्यूशन्स युजर-अनुकूल इंटरफेसेस, मोबाइल अॅप्स व ऑटोमेटेड प्रक्रिया देतात, खर्चाबाबत अहवाल देतात आणि कर्मचाऱ्यांसाठी एकूण प्रवास अनुभव उत्साहित करतात.