Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फिजिक्‍सवालाची भारतातील विद्यार्थ्‍यांसाठी ५० लाख रूपयांच्‍या स्‍कॉलरशिपची घोषणा

 *फिजिक्‍सवालाची भारतातील विद्यार्थ्‍यांसाठी ५० लाख रूपयांच्‍या स्‍कॉलरशिपची घोषणा*


~ परदेशात शिक्षण घेण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या विद्यार्थ्यांना ठरणार उपयुक्त ~


मुंबई, ३१ मार्च २०२४: फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू) या भारतातील आघाडीच्‍या एडटेक कंपनीने नवीन लाँच करण्‍यात आलेला स्‍टडी अब्रॉड उपक्रम 'अकॅडफ्लाय'अंतर्गत ५० लाख रूपये मूल्‍य असलेल्‍या द ग्‍लोबल आयकॉन्‍स स्‍कॉलरशिपचे पहिले पर्व लाँच केले आहे.


द ग्‍लोबल आयकॉन्‍स स्‍कॉलरशिप यूएस, यूके व कॅनडामधील १,००० हून अधिक आघाडीच्‍या आंतरराष्‍ट्रीय युनिव्‍हर्सिटींमध्‍ये मास्‍टर डिग्रीचे शिक्षण घेण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या विद्यार्थ्‍यांसाठी खुली आहे. विद्यार्थी २६ मार्चपासून अकॅडफ्लाय डॉटकॉम येथे अर्ज करू शकतात. पूर्वी पीडब्‍ल्‍यू युनिगो म्‍हणून ओळखला जाणारा उपक्रम अकॅडफ्लायचा परदेशात शिक्षण घेण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या विद्यार्थ्‍यांसाठी एक-थांबा सोल्‍यूशन बनण्‍याचा मनसुबा आहे. अकॅडफ्लाय विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या शैक्षणिक प्रवासात योग्‍य निर्णय घेण्‍यास साह्य करेल, तसेच त्‍यांना युनिव्‍हर्सिटी शॉर्टलिस्टिंग, प्रवेशाबाबत समुपदेशन, स्‍टुडण्‍ट लोन्‍स व व्हिसा प्रक्रिया यामध्‍ये देखील मदत करेल. याव्‍यतिरिक्‍त निवास सुविधा, फॉरेक्‍स यांसह प्री-डिपार्चर सपोर्ट देखील देईल. 



फिजिक्‍सवालाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष मयंक शर्मा म्‍हणाले, ''अॅकडफ्लायच्‍या माध्‍यमातून आमचा परदेशात शिक्षण घेण्‍यासंदर्भात आवश्‍यक पाठिंबा न मिळणाऱ्या विद्यार्थ्‍यांना सर्वांगीण पाठिंबा व मार्गदर्शन प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे. यासंदर्भात होणारा उच्‍च खर्च हा विद्यार्थ्‍यांना परदेशात शिक्षण घेण्‍याचा प्रवास सुरू करण्‍यामधील जाणवणारा सर्वात मोठा अडथळा आहे. द ग्‍लोबल आयकॉन्‍स स्‍कॉलरशिप आर्थिक भार कमी करण्‍यास मदत करण्‍याच्‍या दिशेने एक प्रयत्‍न आहे. जागतिक दजाचे शिक्षण उपलब्‍ध करून देत अॅकडफ्लाय भारतातील महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्‍यांच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी पाया रचत आहे.''


तसेच, जानेवारीमध्‍ये फिजिक्‍सवालाने (पीडब्‍ल्‍यू) आघाडीच्‍या आंतरराष्‍ट्रीय युनिव्‍हर्सिटींमध्‍ये शिक्षण घेण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना सर्वांगीण मार्गदर्शन व पाठिंबा देण्‍यासाठी, तसेच त्‍यांना जीआरई व टीओईएफएल परीक्षांसाठी तयारी करण्‍यास मदत करण्‍यासाठी जगातील सर्वात मोठी खाजगी शैक्षणिक मूल्‍यांकन, संशोधन व मापन संस्‍था यूएस-स्थित ईटीएसची उपकंपनी ईटीएस इंडियासोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.