आर्या ओम्नीटॉकची मोटोरोला सोल्युशन्ससह भागीदारी
~ व्यावसायिक आणि वाणिज्यिक रेडिओ सेवेला प्रोत्साहन देणार ~
मुंबई, ०१ मे २०२४: आर्या ओम्नीटॉक या पुण्यातील कंपनीने भारतात व्यावसायिक व वाणिज्यिक रेडिओचे वितरण करण्यासाठी मोटोरोला सोल्युशन्ससोबत विशेष भागीदारी केली आहे. पुण्यात मुख्यालय असलेली आर्या ओम्नीटॉक ही अरविंद लि. आणि जेएम बाक्सी समूह या भारतातील दोन प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांची संयुक्त कंपनी आहे.
आर्या ओम्नीटॉक या कंपनीतर्फे शेअर्ड मोबाइल रेडिओ सेवा (एसएमआर), जीपीएस-आधारित फ्लीट ट्रॅकिंग व मॅनेजमेंट सोल्यूशन्स, टोल आणि हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (एचटीएमएस) हे तीन व्यवसाय विभाग चालविण्यात येतात. ‘मोटोरोला’सोबतच्या भागीदारीत ‘आर्या ओम्नीटॉक’तर्फे, मोटोरोला सोल्युशन्सच्या उत्पादनांच्या ‘मोटोटीआरबीओ’ या पोर्टफोलिओचे वितरण करण्यात येईल, तसेच सिम-आधारीत वेव्ह पीटीएक्स व संबंधित सेवांचे वितरण सुरू ठेवण्यात येईल.
आर्या ओम्नीटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश शेट्टी म्हणाले, “मोटोरोला सोल्युशन्ससोबत भागीदारी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचा ब्रँड आणि ग्राहक यांच्यासोबत वर्षानुवर्षे निर्माण केलेला विश्वास आम्ही यातून अधिक दृढ करत आहोत. या विशेष भागीदारीमुळे आम्हाला भारतातील सर्वोत्कृष्ट श्रेणीतील उत्पादने विकण्याची संधी मिळत आहे. ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव प्रदान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रत्येक परस्परसंवाद हा उत्कृष्टता आणि समाधान यांच्यासाठीच्या आमच्या समर्पणाचे प्रतिबिंब आहे, असे आम्ही मानतो.”
आर्या ओम्नीटॉकच्या वतीने पीएमआरटीएस (पब्लिक मोबाइल रेडिओ ट्रंकिंग सर्व्हिसेस), सीएमआरटीएस (कॅप्टिव्ह मोबाइल रेडिओ ट्रंकिंग सर्व्हिसेस) आणि ब्रॉडबँड पुश-टू-टॉक डिव्हाइसेस या सेवा पुरविण्यात येतात. अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, इंदूर, कोलकाता, भरूच, नवी मुंबई, गुडगाव, नोएडा, मुंबई, पुणे, सुरत, वडोदरा, विशाखापट्टणम, हैदराबाद, कोची आणि जयपूर अशा १८ शहरांमध्ये कामकाज करण्यासाठीचे परवाने या कंपनीकडे आहेत.
हे रेडिओ आजच्या वेगवान व्यवसाय वातावरणात कार्यरत असलेल्या संस्थांसाठी खास डिझाइन केलेले आहेत. कार्यपथकांना आपसांत झटपट व रिअल-टाईम संज्ञापन करण्यास आणि वेगवान वातावरणात एकमेकांशी समन्वय साधण्यास या रेडिओंची मदत होऊ शकते. क्रॉस-प्लॅटफॉर्म सुसंगता हे या रेडिओंचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे विविध उपकरणांवर आणि प्लॅटफॉर्म्सवर काम करण्याची त्यातून सोय होते आणि कंपनीमधील विविध विभाग व उपकरणे यांच्यात अखंड संवाद साधला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी आणि विविध सुविधांमध्ये पसरलेल्या पथकांना या रेडिओंमुळे जोडता येते. कोणतीही विद्यमान संज्ञापन प्रणाली आणि साधने यांच्याशी हे रेडिओ सहज समाकलित होऊ शकतात, त्यांच्यातील प्रक्रिया सुव्यवस्थित करू शकतात आणि कंपनीमधील एकंदर कनेक्टिव्हिटी वाढवू शकतात.
या रेडिओंच्या माध्यमातून संज्ञापन सुरक्षितपणे होऊ शकते. ज्या उद्योगांसाठी गोपनीयता आणि डेटा संरक्षण महत्त्वाचे असते, त्यांच्यासाठी हे रेडिओ वरदान ठरतात. आपत्कालीन किंवा गंभीर परिस्थितीत जलद प्रतिसाद मिळणे या रेडिओंमुळे शक्य होते. जलद निर्णय घेण्याकरिता आणि संकटकाळात व्यवस्थापन करण्याकरिता त्वरित संवाद साधण्यास हे रेडिओ महत्त्वाचे ठरतात.