Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बीएलएस ई-सर्विेसेस लिमिटेडच्या महसूलात वार्षिक २५.७ टक्क्यांची वाढ

 बीएलएस ई-सर्विेसेस लिमिटेडच्या महसूलात वार्षिक २५.७ टक्क्यांची वाढ



मुंबई, १५ मे २०२४: बीएलएस ई-सर्विसेस लिमिटेड (बीएलएसई) या तंत्रज्ञान-सक्षम डिजिटल सेवा प्रदाता कंपनीने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्‍त झालेली तिमाही व आर्थिक वर्षासाठी त्‍यांच्या लेखापरिक्षित केलेल्‍या एकत्रित आर्थिक निकालांची घोषणा केली.

बीएलएस ई-सर्विसेस लि.चे अध्‍यक्ष श्री. शिखर अग्रवाल म्‍हणाले, ''आम्‍हाला आर्थिक वर्ष २४ मधील आर्थिक कामगिरीची घोषणा करताना आनंद हेात आहे, ज्‍याचे श्रेय एकूण महसूल व पीएटीमधील (करोत्तर नफा) मोठ्या वाढीला जाते, ज्‍यामध्‍ये अनुक्रमे २५.७ टक्‍के आणि ६५.० टक्‍क्‍यांची प्रबळ वाढ झाली. या वर्षभरात आमची पोहोच व नेटवर्क १००,००० हून अधिक टचपॉइण्‍ट्स आणि १,००० हून अधिक बीएलएस स्‍टोअर्सपर्यंत पोहोचले आहे. आम्‍ही अद्वितीय आर्थिक समावेशन व डिजिटल सक्षमीकरणाच्‍या युगात प्रवेश करत आहोत, जे विविध क्षेत्रांमधील आमच्‍या परिवर्तनात्‍मक उपक्रमांमधून दिसून येते. दूरदर्शी नॅशनल डिजिटल हेल्‍थ मिशनअंतर्गत उत्तरप्रदेशमधील नॅशनल हेल्‍थ ऑथोरिटी फॉर द आयुष्‍मान भारत क्‍वॉलिटी चेक (क्‍यूसी) सोबतचा आमचा सहयोग आरोग्‍यसेवा उपलब्‍ध करून देण्‍यामधील नवीन अध्‍यायाची सुरूवात आहे.





आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा एकूण महसूल आर्थिक वर्ष २३ मधील २४६.३ कोटी रूपयांच्‍या तुलनेत आर्थिक वर्ष २४ मध्‍ये वार्षिक २५.७ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ३०९.६ कोटी रूपयांवर पोहोचला. ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २३ मधील ३६.३ कोटी रूपयांच्‍या तुलनेत आर्थिक वर्ष २४ मध्‍ये ३७.६ टक्‍क्‍यांनी वाढून ४९.९ कोटी रूपयांवर पोहोचले. ईबीआयटीडीए मार्जिन आर्थिक वर्ष २३ मधील १४.७ टक्‍क्‍यांवरून आर्थिक वर्ष २४ मध्‍ये १६.१ टक्‍क्‍यांवर पोहोचले, ज्‍यामध्‍ये १३९ बीपीएसने वाढ झाली. आर्थिक वर्ष २४ मध्‍ये अपवादात्‍मक वस्‍तूंपूर्वी पीबीटी (करपूर्व नफा) आर्थिक वर्ष २३ मधील २९.६ कोटी रूपयांच्‍या तुलनेत ५४.५ टक्‍क्‍यांनी वाढून ४५.७ कोटी रूपयांवर पोहोचले. आर्थिक वर्ष २४ मध्‍ये पीएटी (करोत्तर नफा) आर्थिक वर्ष २३ मधील २०.३ कोटी रूपयांच्‍या तुलनेत ६५.० टक्‍क्‍यांनी वाढून ३३.५ कोटी रूपयांवर पोहोचले. आर्थिक वर्ष २४ मध्‍ये पीएटी मार्जिन आर्थिक वर्ष २३ मधील ८.३ टक्‍क्‍यांवरून १०.८ टक्‍क्‍यांवर पोहोचले, ज्‍यामध्‍ये २५८ बीपीएसची वाढ झाली.      

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.