रिटेल लेण्डिंग क्षेत्रात रोजगार मागणीत वाढ: टीमलीज सर्विसेस
~ द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांत सर्वाधिक वाढ ~
मुंबई, २३ मे २०२४: द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील बीएफएसआयमध्ये रिटेल लेण्डिंगप्रती रोजगार मागणीत उल्लेखनीय वाढ झाली असल्याचे टीमलीज सर्विसेसने नुकतेच केलेल्या विश्लेषणामधून निदर्शनास आले आहे. कंपनीच्या शीर्ष क्लायण्ट्सकडून डेटाच्या आधारावर करण्यात आलेल्या या विश्लेषणामध्ये ४५,००० हून अधिक तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या विश्लेषणामधून उद्योगामधील मोठा ट्रेण्ड निदर्शनास येतो.
गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, क्रेडिट कार्डस् आणि मायक्रो फायनान्सिंग यांचा समावेश असलेल्या रिटेल लेण्डिंग क्षेत्राने एकूण रोजगार आकडेवारींमध्ये २९ टक्क्यांच्या वाढीसह उल्लेखनीय वाढ दाखवली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांनी आर्थिक वर्ष २३ व आर्थिक वर्ष २४ दरम्यान अनुक्रमे वार्षिक २१ टक्के आणि २६ टक्क्यांची वाढ दाखवली आहे. रोजगार मागणीतील या वाढीचे श्रेय नॉन-मेट्रो आणि अर्ध-शहरी भागांमधील रिटेल लेण्डिंग संस्थांचे फूटप्रिंट वाढवण्याच्या प्रयत्नांना जाते.
कर्मचारीवर्ग मागणीला चालना देणा-या शीर्ष द्वितीय श्रेणी शहरांमध्ये जयपूर, चंदिगड, कोईम्बतूर, सुरत, लुधियाना, इंदौर, अमृतसर, म्हैसूर, नागपूर, विझाग तर शीर्ष तृतीय श्रेणी शहरांमध्ये पटियाला, भटिंडा, मीरत, जामनगर, यमुनानगर, त्रिची, हसन, कोटा, औरंगाबाद, रोहतक आदींचा समावेश आहे.
टीमलीज सर्विसेसच्या बीएफएसआयचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख कृष्णेन्दू चॅटर्जी म्हणाले, "''हा डेटा विशेषत: द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील रिटेल लेण्डिंग उद्योगाच्या विकसित होत असलेल्या गतीशीलतेवर प्रकाश टाकतो. गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये रोजगार मागणीत २९ टक्क्यांनी झालेल्या वाढीमधून रिटेल लेण्डिंग उद्योगाच्या विकासाला गती देण्यासाठी कुशल व्यावसायिकांची त्वरित गरज दिसून येते. हा ट्रेण्ड चालू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये देखील कायम राहिल, जेथे रिटेल लेण्डिंग संस्था उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये प्रवेश आणि ग्राहक आऊटरिच धोरणांना प्राधान्य देणे सुरू ठेवेल अशी अपेक्षा आहे ''