जागतिक पर्यावरण दिनी हरित भविष्यासाठी ब्लू डार्टकडून ईव्ही फ्लीटचा विस्तार
मुंबई, 29 मे 2024: शाश्वततेला चालना देऊन आपले कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या दृष्टीने ब्लू डार्ट या दक्षिण आशियातील आघाडीच्या कुरियर आणि एकात्मिक एक्स्प्रेस पॅकेज वितरण कंपनीने आपला इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) ताफा सादर केला आहे. त्यांच्या ताफ्यात सध्या 480 ई-वाहने (2, 3 आणि 4 चाकी गाड्या) आहेत. हा उपक्रम जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ब्लू डार्टच्या पर्यावरण संवर्धनाबाबत कटिबद्धता दर्शवतो. कंपनीने शून्य कार्बन ऊत्सर्जनाचे ध्येय ठेवले असून ते साध्य करण्याच्या दृष्टीने त्यांचा हा प्रवास आहे.
ब्लू डार्टच्या ताफ्यात ईव्हीचा समावेश केल्यामुळे पर्यावरणासाठी खूप फायदे होतील. यामुळे दर महिन्याला 15.05 टन कार्बन डाय ऑक्साइड ऊत्सर्जन कमी होईल असा अंदाज आहे. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसीसी) च्या 'क्लायमेट न्यूट्रल नाऊ' (सीएनएन) प्रतिज्ञेवर ब्लू डार्टने पुढाकार घेऊन स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे जागतिक वातावरणाबाबत त्यांची वचनबद्धता दिसून येते. कंपनीच्या शाश्वतता आराखड्यात दरवर्षी 111,000 झाडे लावण्यासारख्या विविध उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. ही झाडे मोठी होतील तेव्हा प्रतिवर्ष 13,320 टनांपेक्षा जास्त कार्बन डाय ऑक्साइडचे ऊत्सर्जन कमी होईल अशी अपेक्षा आहे.
ब्लू डार्ट’चे मॅनेजिंग डायरेक्टर बॅलफर मैनुअल यांनी या उपक्रमाबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “ब्लू डार्ट भारतात शाश्वत लॉजिस्टिक्सला प्रोत्साहन देत आहे. आम्ही हरित भविष्याच्या दिशेने वाट आखत आहोत. आमच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करून आम्ही आमचा कार्बन फूटप्रिंट कमी करून पर्यावरण संवर्धनात योगदान देण्यासाठी सज्ज आहोत. हरित ताफ्याच्या दिशेने आमचे काम शून्य कार्बन ऊत्सर्जन आणि शाश्वत वाढीच्या दिशेने ब्लू डार्टच्या वचनाचे प्रतीक आहे."
ब्लू डार्ट आपल्या पर्यावरणाप्रति जबाबदाऱ्यांचे पालन करत असतानाच नावीन्यपूर्ण उपाययोजना देण्यासाठी कार्यरत आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांचा अंगीकार करून दीर्घकालीन शाश्वतता उद्दिष्टांप्रति एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आणि एक स्वच्छ, हरित भविष्यासाठी उद्योगातील आघाडीची कंपनी म्हणून आपले स्थान बळकट केले आहे.