Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दिव्यांग मुलांच्या 'स्वानंद सेवा सदनातील 'श्री स्वामी समर्थ ध्यान केंद्राचे प.पू. बालयोगी श्री सदानंद महाराजांचे हस्ते उद्घाटन संपन्न!*


*अर्नाळा येथे दिव्यांग मुलांच्या 'स्वानंद सेवा सदनातील 'श्री स्वामी समर्थ ध्यान केंद्राचे प.पू. बालयोगी श्री सदानंद महाराजांचे हस्ते उद्घाटन संपन्न!*





दिव्यांग मुलांसाठी विविध सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबविणाऱ्या 'नूतन गुळगुळे फाउंडेशन'तर्फे अर्नाळा येथे 'स्वानंद सेवा सदन' हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पातील तळ-मजल्यावर 'श्री स्वामी समर्थांचे शक्तीस्थान व ध्यान धारणा केंद्र' उभारण्यात आले असून कमळासनाधिष्ठित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे व पादुकांची प्राणप्रतिष्ठापना तुंगारेश्वर पर्वतावरील प.पू. बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या हस्ते आज करण्यात आले. या केंद्रात ठेवण्यात आलेल्या स्वामी समर्थांच्या पादुका श्री दत्त दिगंबरांचे मूळ स्थान गाणगापूर, नरसोबाची वाडी आणि खुद्द अक्कलकोट या पवित्र दैवी स्थानांना स्पर्श करुन आणण्यात आल्या आहेत. 


"आजी सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु - हरी पाहिलारे हरी पाहिलारे। या अभंगातील गर्भितार्थ आज आम्हा 'नूतन गुळगुळे फाऊंडेशन'च्या आणि 'तेंडूलकर परिवारा'च्या नशिबात स्वामी समर्थांच्या कृपेने आल्याने आजचा दिवस खरोखरच  सोन्याचा झाला आहे. प.पू. बालयोगी सदानंद महाराज यांच्या हस्ते श्री. स्वामी समर्थ शक्तीस्थान व ध्यानधारणा केंद्रातील तसबिरीची स्थापना व पादुकांची प्राणप्रतिष्ठा या सोहळ्यानिमित्त महाराजांचा अर्नाळ्याच्या भूमीला चरणस्पर्श झाल्याने खऱ्या अर्थानं आज या भूमीवर 'अमृताचा पाऊस बरसला' असे मला वाटते. नूतन गुळगुळे फाऊंडेशन सन्मानपूर्वक उभारत असलेल्या 'दिव्यांग मुलांसाठीच्या 'स्वानंद सेवा सदन' या अत्याधुनिक सोईसुविधायुक्त सुसज्ज वसतिगृहाला त्यांचा शुभाशीर्वाद लाभला आहे. यासोबतच 'स्वानंद सेवा सदनाची वास्तू साकारण्यास अर्नाळावासी श्री. अमरनाथ तेंडुलकर(काका) तसेच या वास्तूचा विकास व सुशोभीकरण हे श्री. आश्विनकुमार तेंडुलकर व श्री. बलराम वासन(बंटी भाऊ) यांचे विशेष योगदान लाभले आहे". असे नूतन गुळगुळे फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. नूतन गुळगुळे म्हणाल्या. 





या निमित्त प्रतिक्रिया देताना संस्थेचे अर्थसल्लागार अमरनाथ तेंडूलकर म्हणाले, "या प्रकल्पासोबत मी सुरुवातीपासून जोडला गेलो आहे. अनंत अडचणींवर मात करीत गुळगुळे दांपत्य हा प्रकल्प तडीस नेण्यासाठी झटत होते. अर्नाळ्यासारख्या ठिकाणी असा 'नॉनकमर्शियल' प्रकल्प उभा राहणं हे आम्हासाठी भूषण म्हणता येईल, हा उदात्त हेतू पाहून तेंडूलकर परिवार गुळगुळे परिवाराच्या खांद्याला खांदा लावण्यास आल्याने लौकिकार्थाने आनंद होत आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले होते, 'दिव्यांग सेवा ही ईश्वर सेवा आहे', ती करण्याचे भाग्य गुळगुळे परिवारासोबत आम्हाला मिळत आहे."


रविवार दि. २६ मे रोजी श्री श्री श्री शिवानंद सरस्वती महाराज (कवळे मठ - गोवा ) यांच्या हस्ते 'स्वानंद सेवा सदन' इमारतीतील पहिल्या मजल्याचे उदघाटन व कळस पूजन होणार असून या सोहळ्यास प्रमुख अतिथी श्री.हितेंद्र ठाकूर - आमदार, वसई विरार, सौ. प्रवीणा ठाकूर - माजी महापौर, श्री. सुनील देवधर - रा. सचिव, भा.ज.प., सीए. हिमांगी नाडकर्णी - अध्यक्षा, एनकेजीएसबी कॉ. बँक, सीए. संतोष केळकर - अध्यक्ष, जनकल्याण कॉ. बँक, श्री. किशोर रांगणेकर - संचालक, सारस्वत कॉ. बँक, श्री विनायक प्रभू - टाइम्स ग्रुप, यांसह श्री.नंदकुमार घरत - सरपंच - अर्नाळा, अम्प्रपाली साळवे - इन. संचालक - कोचीन शिपयार्ड, श्री. आनंद पेजावर - व्य. संचालक - एसबीआय, पदाधिकारी - जी.एस.बी. टेम्पल ट्रस्ट वाळकेश्वर, सीए. सांतेश वर्टी - उपाध्येक्ष- एन.के.जी.एस.बी. बँक, श्री. किरण कामत - संचालक - एन.के. जी. एस. बी. बँक, श्री. किरण उमरुटकर - संचालक - सारस्वत कॉ. बँक, श्री. बिमलकुमार केडिया - अध्यक्ष - केशव सृष्टी - राष्ट्रीय स्वयंसेक, श्री. दीपक घैसास - उद्योजक, सौ. विद्या सप्रे - दादर भगिनी समाज इत्यादी प्रभुतींची विशेष उपस्तिथी लाभणार आहे. 





शुक्रवारी रात्री श्री स्वामी समर्थ महाराजांची तसबीर व पादुकांची भव्य मिरवणूक तेंडूलकर वाड्यातून प्रभात कॉलोनी पर्यंत काढण्यात आली होती, संपूर्ण अर्नाळकरांनी दसऱ्या दिवाळी सारख्या रांगोळ्या काढून या पालखीचे स्वागत केले होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.