Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्विस ब्युटीने ‘क्रेज’ कलेक्शन सादर केले

 स्विस ब्युटीने ‘क्रेज’ कलेक्शन सादर केले





मुंबई, २१ मे २०२४: भारताच्या अग्रगण्य मेकअप ब्रॅण्ड्सपैकी एक असलेल्या स्विस ब्युटीने क्रेज हे आपले जेन्झी मेकअप कलेक्शन बाजारात दाखल केले आहे. एकाच वेळी अनेक कामांमध्ये गुंतलेल्या मल्टी-टास्कर जेन-नेक्स्ट लोकसंख्येसाठी विविध प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचा यात समावेश आहे. क्रेज  कलेक्शनमध्ये आयशॅडो आणि ब्लश पॅलेट ते मस्कारासारख्या डोळ्यांच्या मेकअपपासून ते लिप बामपासून १२ तास राहणाऱ्या लिप क्रेऑन्ससारख्या ओठांसाठीच्या उत्पादनांपर्यंत ते प्रायमर आणि फिक्सरसारख्या चेहऱ्यासाठीच्या उत्पादनांच्या श्रेणीपर्यंतच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या उत्पादनांचे विपुल पर्याय उपलब्ध आहेत. 





या उत्पादनांसाठी वापरण्यात आलेले ट्रेण्डी पॅकेजिंग आणि फॉर्म्युले जेन झेडच्या खास बोलीभाषेत – स्लॅन्ग्जमध्ये ठेवण्यात उत्पादनांची नावे आणि बहुउपयोगी उत्पादने ही वैशिष्ट्ये असलेले क्रेज तरुणाईचा ध्यास व स्वत:ला बिनधास्तपणे व्यक्त करण्याची वृत्ती यांचा उत्सव साजरा करत आहे. यात चेहरा, ओठ व डोळ्यांसाठी नजरेत भरणारे रंगांचे पर्याय आणि नाविन्यपूर्ण मेकअप फॉर्म्युले उपलब्ध आहेत. या कलेक्शनमधील सर्व सौंदर्य उत्पादने बहुउपयोगी आणि उच्च दर्जाची कामगिरी करणारी आहेत. यामुळे क्रेज  मधील प्रसाधने सर्वांना परवडण्याजोगी असून सौंदर्यप्रसाधनाच्या जगातील नवनवे कल युवा व प्रवासी ग्राहकांच्या आवाक्यात राहावेत याची काळजी यात घेण्यात आली आहे.





स्विस ब्युटीचे सीईओ श्री. साहिल नायर म्हणाले, “आमची क्रेज  मेकअप श्रेणी उत्साहाने भारलेल्या आणि अष्टपैलू अशा जेन्झीसाठी आहे, जी कॉलेजमधील पदार्पण करताना, पदवीधर होताना, नोकरीवर रुजू होताना अशा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपला ठसा उमटवत आहेत. या श्रेणीतील उत्पादनांचे उठावदार रंग, वैविध्यपूर्ण फॉर्म्युले आणि विक्षिप्त व्यक्तिमत्त्व यात जेन झेडच्या कोणत्याही बंधनांना न जुमानणाऱ्या उर्मींचे प्रतिबिंब पडले आहे. या कलेक्शनद्वारे तरुण मुली नवे प्रयोग करू शकतात, नव्या लुक्सचा शोध घेऊ शकतात आणि मेकअपच्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त करू शकतात. भारतीय सौंदर्य प्रसाधनांच्या क्षेत्रात ११ वर्षांच्या प्रभावशाली अस्तित्वाद्वारे स्विस ब्युटीने भारतीय बाजारपेठेची नस अचूक पकडली आहे आणि आता क्रेजच्या रूपाने जेन झेडची रंगीत कॉस्मेटिक्सची आजवर अपूर्ण राहिलेली गरजही पूर्ण कऱण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. वैविध्यपूर्ण, बहुउपयोगी आणि ट्रेण्डी मेकअप उत्पादने ही खास जेन झेडसाठी, या पिढीशी संवाद साधण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत.”

“जेन झेड हा भारताच्या सौंदर्य आणि पर्सनल केअर गटाचा सर्वात वेगाने वाढत असलेला ग्राहकवर्ग आहे. तरुणाईवर लक्ष केंद्रित करणारा ब्रॅण्ड म्हणून दर्जा, नाविन्यपूर्णता आणि ट्रेण्डी स्वभावामधून आपल्या या ग्राहकवर्गाशी खरेखुरे नाते निर्माण करण्याची आमची इच्छा आहे.” ते पुढे म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.