Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

इझमायट्रिपने चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले

 इझमायट्रिपने चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले


मुंबई, २७ मे २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने या तिमाहीदरम्‍यान आपली प्रबळ आर्थिक कामगिरी कायम ठेवली. आर्थिक वर्ष २४ च्‍या चौथ्‍या तिमाहीसाठी कार्यसंचालनांमधून महसूल वार्षिक ४१ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह १,६४० दशलक्ष रूपये होता. ईबीआयटीडीए वार्षिक २४ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ५७७ दशलक्ष रूपये होते. करपूर्व नफा वार्षिक २४ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ५५१ दशलक्ष रूपये होता. तसेच, ग्रॉस बुकिंग रेव्‍हेन्‍यू (जीबीआर) आर्थिक वर्ष २४ च्‍या चौथ्‍या तिमाहीमध्‍ये २०,९०० दशलक्ष रूपये होते.

आर्थिक वर्ष २४ च्‍या चौथ्‍या तिमाहीमध्‍ये आमच्‍या नॉन-एअर विभागाने प्रबळ वाढ केली, जेथे एकूण हॉटेल नाइट बुकिंग्‍ज १.४ लाख होत्‍या, ज्‍यामध्‍ये ३९ टक्‍क्‍यांची वाढ झाली आणि इतर बुकिंग्‍ज ५३ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह २.७ लाख होत्‍या. आर्थिक वर्ष २४ साठी हॉटेल नाइट बुकिंग्‍ज व इतर बुकिंग्‍ज अनुक्रमे ४९ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ५.२ लाख आणि ६७ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह १०.४ लाख होत्‍या.





आर्थिक वर्ष २४ साठी कार्यसंचालनांमधून महसूल वार्षिक ३२ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ५,९०६ दशलक्ष रूपये होता. ईबीआयटीडीए वार्षिक १९ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह २,२८२ दशलक्ष रूपये होते आणि करपूर्व नफा वार्षिक १६ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह २,१५१ दशलक्ष रूपये होता. या प्रबळ कामगिरीमधून इझमायट्रिपची सातत्‍यपूर्ण गती दिसून येते आणि उद्योगामधील काही लाभदायी आधुनिक टेक कंपन्‍यांपैकी एक म्‍हणून कंपनीचे स्‍थान अधिक दृढ होते. तसेच, कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्‍ये ८५,१२६ दशलक्ष रूपये जीबीआरची नोंद केली, ज्‍यामुळे कंपनीचे बाजारपेठेतील स्‍थान अधिक दृढ झाले आहे.  

ही तिमाही आणि आर्थिक वर्ष २४ मध्‍ये प्रबळ आर्थिक कामगिरी संपादित करण्‍यासह इझमायट्रिपने विकास-केंद्रित कंपनी म्‍हणून स्‍वत:ला स्‍थापित करण्‍यासाठी लक्षणीय सहयोग सुरू केले. भारतीय इतिहासामधील मोठ्या इव्‍हेण्‍टनंतर कंपनीने जीवानी हॉस्पिटॅलिटीमध्‍ये ५० टक्‍के हिस्‍सा संपादित केला आणि अयोध्‍या शहरामध्‍ये १५० खोलींचे रॅडिसन ब्‍लू हॉटेल विकसित करण्‍यासाठी रॅडिसन हॉटेल ग्रुपसोबत सहयोग केला. या धोरणात्‍मक पुढाकारामुळे नुकतेच प्राणप्रतिष्‍ठा करण्‍यात आलेल्‍या राम मंदिराच्‍या सान्निध्‍यात हॉटेल स्‍थापित होईल, ज्‍यामुळे परिसराच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर होण्‍यासह दरदिवसाला १.५ लाख भक्तांना हॉटेल सुविधेचा आनंद घेता येईल. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.