*क्विक हीलचा ईईटी ग्रुपसोबत सहयोग*
~ युरोपमधील सायबरसुरक्षा सोल्यूशन्ससाठी पसंतीची वितरक म्हणून स्थान दृढ केले ~
*मुंबई, १५ मे २०२४:* ईईटी ग्रुप या युरोपमधील आयटी व तंत्रज्ञान सोल्यूशन्सच्या आघाडीच्या वितरक कंपनीला जागतिक सायबरसुरक्षा सोल्यूशन्स प्रदाता क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडसोबत धोरणात्मक सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. हा सहयोग युरोपमध्ये क्विक हीलच्या सायबरसुरक्षा उत्पादनांच्या सर्वसमावेशक श्रेणीसाठी ईटीटीला पसंतीची वितरक म्हणून स्थान देतो.
जवळपास तीन दशकांपर्यंतचा सर्वोत्तमतेचा वारसा असलेल्या क्विक हीलने सायबरसुरक्षा डोमेनमध्ये स्वत:ला अग्रणी म्हणून स्थापित केले आहे, तसेच आधुनिक काळातील डिजिटल जोखीमेच्या गुंतागुंतीच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली अत्याधुनिक सोल्यूशन्स प्रदान करते. क्विक हीलच्या पोर्टफोलिओमध्ये उत्पादनांची व्यापक श्रेणी आहे, जे ग्राहक, लघु व मध्यम व्यवसाय, सरकारी संस्था आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या विविध गरजांची पूर्तता करतात.
या सहयोगामधून ईईटीची आपल्या सायबरसुरक्षा ऑफरिंग्जमध्ये वाढ करण्याप्रती, तसेच युरोप प्रांतामधील सहयोगींना अद्वितीय मूल्य वितरित करण्याप्रती कटिबद्धता दिसून येते. आपल्या वितरण नेटवर्कमध्ये क्विक हीलच्या नाविन्यपूर्ण सोल्यूशन्सचा समावेश करत ईईटी युरोपमधील उच्चस्तरीय सायरबसुरक्षा सोल्यूशन्सची प्रमुख वितरक म्हणून आपल्या दर्जाची पुष्टी देते.
*क्विक हील टेक्नॉलॉजीज लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल साळवी* म्हणाले, ''डिजिटल परिवर्तनाच्या या युगामध्ये क्विक हीलचा ईईटी ग्रुपसोबतचा सहयोग युरोपमधील सायबरसुरक्षेमध्ये वाढ करण्याच्या दिशेने धोरणात्मक पाऊल आहे, जेथे वैविध्यपूर्ण डिजिटल लँडस्केपचे संरक्षण करण्यासाठी आमच्या प्रगत सुरक्षा सोल्यूशन्सचा फायदा घेतला जात आहे. ईईटीचे प्रबळ वितरण नेटवर्क आणि सायबरसुरक्षेप्रती आमच्या नाविन्यपूर्ण दृष्टीकोनासह आम्ही अद्वितीय सुरक्षितता प्रदान करण्यास सज्ज आहोत, ज्यामधून व्यवसाय व ग्राहकांना त्यांचे डिजिटल परस्परसंवाद सुरक्षित असण्याची खात्री मिळू शकते.''
*ईईटी गुपच्या नेटवर्क सोल्यूशन्सचे बिझनेस लाइन डायरेक्टर लेसे हेजमन* म्हणाले, ''क्विक हीलसोबतच्या आमच्या सहयोगामधून आमच्या सहयोगी व क्लायण्ट्सच्या व्यापक नेटवर्कला उच्चस्तरीय सायबरसुरक्षा सोल्यूशन्स प्रदान करण्याप्रती ईटीटीची कटिबद्धता दिसून येते. क्किक हीलचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक सायबरसुरक्षा ऑफरिंग्ज व्यवसायांना त्यांच्या डिजिटल मालमत्ता सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांसह सक्षम करण्याप्रती आमच्या मिशनशी परिपूर्णपणे संलग्न आहेत.''
क्विक हीलची उत्पादनांची संपूर्ण श्रेणी विविध डिवाईसेस व प्लॅटफॉर्म्सवरील आयटी सुरक्षा व्यवस्थापन सुव्यवस्थित करण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. ही श्रेणी आता सर्व ईईटी सहयोगींसाठी उपलब्ध आहे. हा सहयोग संपूर्ण युरोपमधील कंपन्यांचा सुरक्षा दर्जा वाढवण्याची आणि उदयास येत असलेल्या सायबर धोक्यांपासून प्रबळ संरक्षणाची खात्री देतो.