Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

‘क्रॉस’मधील धोरणात्मक ताब्यासह केवल किरण क्लोथिंग लिमिटेडचा विमेन डेनिम वेअर क्षेत्रात प्रवेश*


 *‘क्रॉस’मधील धोरणात्मक ताब्यासह केवल किरण क्लोथिंग लिमिटेडचा विमेन डेनिम वेअर क्षेत्रात प्रवेश* 


मुंबई, ३ १   मे २०२४: केवल किरण क्लोथिंग लिमिटेड (बीएसईः ५३२७३२, एनएसईः "केकेसीएल")ने क्रॉस कॅज्युअल्स प्रायव्हेट लिमिटेड (“केसीपीएल”) मधील ५० टक्के समभागांची खरेदी १६६.५१ कोटी रूपयांना केल्याची घोषणा केली आहे. हे समभाग प्राथमिक गुंतवणूक आणि दुय्यम खरेदीच्या माध्यमातून ताब्यात घेतले जातील. केकेसीएलने या ताब्याद्वारे विमेन्स डेनिम अँड कॅज्युअल वेअर श्रेणीत प्रवेश करून आपले बाजारातील स्थान मजबूत केले आहे आणि त्याचबरोबर भारत व यूएईतील बाजारापेठांमध्ये आपले आघाडीचे स्थान मजबूत केले आहे.  




केसीपीएल सध्या 'क्रॉस जीन्स' या नावाने कार्यरत आहे. ही कंपनी महिला, किशोरवयीन मुले तसेच मुलांच्या कॅज्युअल आणि डेनिम बॉटम व टॉप यांचे उत्पादन, विक्री, डिझाइन आणि निर्यात या व्यवसायात आहे. हा बिझनेस यापूर्वी ओरिएंटल ट्रेडिंग कंपनी ("ओटीसी") या भागीदारी संस्थेमार्फत चालवला जात होता. केसीपीएल आणि ओटीसी यांनी बिझनेस ट्रान्सफर करारनामा (बीटीए) केला असून त्याद्वारे ओटीसीचे भागीदार (म्हणजेच श्री. रवी पंजाबी, श्री. सुनील पंजाबी, श्री. सुशील पंजाबी आणि श्री. आत्माराम पंजाबी) यांनी केसीपीएलला आपला भागीदारी व्यवसाय हस्तांतरित करण्यास मंजूरी दिली आहे. 


क्रॉस लाइफस्टाइल, पँटलून्स, शॉपर्स स्टॉप, लुलू इत्यादींसारख्या १००० पेक्षा जास्त मोठ्या स्टोअर्समध्ये तसेच आपल्या ८ ईबीओच्या नेटवर्कद्वारे केकेसीएलच्या ४८८ पेक्षा जास्त खास ब्रँड आऊटलेट्स, ३००० पेक्षा अधिक एमबीओ असलेल्या ८० पेक्षा जास्त वितरक आणि भारतात पसरलेल्या २००० पेक्षा अधिक काऊंटर्समध्ये राष्ट्रीय चेन स्टोअर्समध्ये आपले अस्तित्त्व दाखवेल. 


केकेसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. केवलचंद जैन म्हणाले की, "आजचा ताबा हा आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तो आमच्या डेनिम आणि कॅज्युअल वेअर पोर्टफोलिओचा विस्तार आणि वैविध्यीकरणाच्या धोरणात्मक दृष्टीकोनाशी जुळणारा आहे. केकेसीएलच्या इतिहासातील हा आमचा पहिला ताबा तर आहेच, पण त्याचबरोबर वाढ आणि नावीन्यपूर्णतेप्रति आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक देखील आहे. आम्ही क्रॉसचे आमच्या छत्राखाली स्वागत करतो. आम्ही हे हस्तांतरण प्रति समभाग फायदेशीर ठरेल आणि आमच्या समभागधारकांसाठी पुढील अनेक वर्षांसाठी मूल्यवर्धन करेल, अशी आशा करतो.”


केकेसीएलचे सह-व्यवस्थापकीय संचालक श्री. हेमंत जैन म्हणाले की, “आम्ही संस्थापकांमुळे आणि त्यांनी महिलांच्या डेनिम व कॅज्युअल वेअरसारख्या कमी सेवा मिळालेल्या आणि गुंतागूंतीच्या क्षेत्रात एक विश्वासू ब्रँड ज्या पद्धतीने तयार केला त्यामुळे प्रेरित आहोत. हा ताबा संपूर्ण कुटुंबासाठी एक कॅज्युअल वेअर ब्रँड होण्याच्या आमच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. केकेसीएलचे जागतिक वितरण नेटवर्क आणि अद्वितीय भागीदारांसोबत एक मजबूत अस्तित्त्व आहे. त्यामुळे आम्हाला क्रॉसची वाढ व विस्तार यांना ऊर्जा देणे शक्य होईल. श्री. रवी पंजाबी यांना विमेन वेअर कॅटेगरीची चांगली माहिती आहे. त्यामुळे क्रॉसची वाढ होण्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. आमचे आघाडीचे स्थान आणखी मजबूत करण्यासाठी व्यवसायांना पूरक होऊन धोरणात्मक गुंतवणूकी तसेच ताब्यावर भर देण्याच्या आमच्या हेतूंशी सुसंगत हा ताबा आहे."




क्रॉस कॅज्युअल्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री. रवी पंजाबी म्हणाले की, "आम्ही कायमच विमेन्स डेनिम अँड कॅज्युअल अपॅरल मार्केटमध्ये आमच्या वाढत्या उत्पादन श्रेणीसाठी जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या संधी शोधल्या आहेत. केकेसीएलमुळे आम्हाला आमची बाजारपेठ आणखी विस्तारित करण्यासाठी एक परफेक्ट जोडीदार मिळाला आहे. या भागीदारांच्या मदतीने आमचा ब्रँड अत्यंत वेगाने वाढेल आणि त्याचवेळी क्रॉसच्या संस्थापकांची तत्त्वे कायम राखली जातील. आमचे ब्रँड उभारणी, मार्केटिंग आणि वितरण यांच्यामधील एकत्रित ज्ञान क्रॉसला जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरेल. केकेसीएलचे स्त्रोत व ज्ञान आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. ही टीम त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे."


मॅरेथॉन कॅपिटल अॅडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड, बन्सी एस. मेहता अँड कंपनी, चार्टर्ड अकाऊंटंट्स आणि वाडिया गांधी अँड कं. अॅडव्होकेट्स, सॉलिसिटर्स अँड नोटरीज हे या धोरणात्मक ताब्यात केकेसीएलचे सल्लागार होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.