Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ. बत्रा'ज हेल्थकेअरने केसगळतीच्या समस्येसाठी 'एक्सोजेन' लॉन्च केले

डॉ. बत्रा'ज हेल्थकेअरने केसगळतीच्या समस्येसाठी 'एक्सोजेन' लॉन्च केले ~ टार्गेटेड अनुवांशिक केसगळतीसाठीची जगातील सर्वात प्रगत उपचारपद्धती ~
मुंबई, १३ जून २०२४: होमियोपॅथिक क्लिनिक्सची जगातील सर्वात मोठी साखळी असलेल्या डॉ. बत्रा'ज हेल्थकेअरने एक्झोसोम आधारित फॉर्म्युलेशनच्या साथीने अनुवांशिक केस गळतीवरील उपायांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी तयार केलेल्या एक्सोजेन ही एक्झोसोमवर आधारित टार्गेटेड अर्थात विशिष्ट जागेवर काम करणाऱ्या हेअर ट्रीटमेंटच्या रूपाने एक आद्यप्रवर्तक संकल्पना बाजारात आणली आहे. एक्सोजेन केसांच्या पुनर्संचयनाच्या पद्धतींमधील अद्ययावत प्रगत पद्धतीचे प्रतिनिधीत्व करते, ज्यात केस नव्याने उगवण्यासाठी २ बिलियन पेशींचा एक पोटंन्ट फॉर्म्युला वापरला जातो. अवघ्या तीन महिन्यांमध्ये दिसून येईल असा बदल घडवून आणण्याची या पद्धतीची क्षमता प्रयोगसिद्ध आहे. हा फॉर्म्युला स्टेम सेल्सना नैसर्गिक पुनर्वाढीसाठी चेतना देतो, फॉलिकल्सची जोपासना करतो, टाळूच्या त्वचेचा दाह होण्याचे प्रमाण कमी करतो आणि रक्तप्रवाहामध्ये सुधारणा घडवून आणतो, जे अधिक मजबूत आणि दाट केसांसाठी आवश्यक असते. या प्रक्रियेमध्ये वाढीस पोषक घटकांनी समृद्ध असलेले एक्झोसोम टाळूच्या त्वचेवर सोडले जातात, जे तिथून प्रवास करतात आणि खराब झालेल्या केसांच्या पेशींना जाऊन चिकटतात, अत्यंत खोलवर पाझरतात आणि केसांना दुरुस्त व आजारमुक्त करणाऱ्या अत्यावश्यक पोषक घटकांना तेथवर पोहोचते करतात.
डॉ. बत्रा'ज हेल्थकेअरचे व्हाइस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आणि ट्रायकॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनचे पहिले भारतीय अध्यक्ष डॉ. अक्षय बात्रा म्हणाले, “एक्सोजेन ही जगातील सर्वात प्रगत एक्झोसोम आधारित उपचारपद्धती बाजारात दाखल करणे हा आम्हाला हर्षोल्हसित करणारा अनुभव आहे. ही टार्गेटेड थेरपी आणि त्यातील पुनर्निर्मितीसाठीचे औषध केसांच्या वाढीला चालना देतात आणि केसांच्या फॉलिकल्सना नव्याने सक्रीय करतात. एक्सोजेन ही सर्वात वेगाने काम करणारी उपचार पद्धती आहे, जी अगदी अनुवांशिक केसगळतीला सामोऱ्या जाणाऱ्यांसाठीची सर्वोत्कृष्ट परिणाम देते. डॉ. बत्रा'ज® मध्ये आम्ही उपलब्ध पद्धतींपैकी सर्वोत्तम उपचारपद्धती पुरवतो आणि आमच्या रुग्णांना समाधान मिळेल याची काळजी घेतो.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.