Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्कूलबसच्या अपघातात गंभीर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलविले.

*बेस्ट कर्मचाऱ्यांची बेस्ट कामगिरी*....*स्कूलबसच्या अपघातात गंभीर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलविले.*
बेस्टच्या पाठकवाडी येथील कामगार रात्रपाळीचे काम करून बुधवार दि.26 जून रोजी सकाळी 6:45 वा. जे. जे.पुलावरून परत येताना अंजुमन हायस्कूलची विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस 80 km/h च्या स्पीडने ओव्हरटेक करून पुढे जाऊन लेफ्ट साईडला धडकुन मोठा अपघात झाला, हे त्यांनी पाहिले आणि पुढे जाऊन त्या बसचा अपघात झाला, त्या बसमध्ये असलेल्या 21 विद्यार्थी आणि बस क्लिनर यापैकी 2 विद्यार्थी आणि बसचा क्लीनर हा गंभीररित्या जखमी होऊन रस्त्यावर फेकले गेलेले पाहिले. त्वरित त्यांनी रस्त्यावरून उचलून आपल्या बेस्टच्या गाडीमध्ये ठेवले.
तसेच बसमधील 9 विद्यार्थी जखमी झालेले होते, त्यांना टॅक्सी मध्ये बसवले आणि सर्व अपघातग्रस्तांना जी टी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले,याची माहिती त्यांनी त्यांच्या अधिकारी नवघरे साहेब आणि विभागीय अभियंता श्री नारखेडे यांना कळवली त्यांनी त्याची दखल घेऊन कौतुक केले, त्यानंतर गंभीर जखमी असलेले विद्यार्थी आणि बसचा क्लिनर यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात आयसीयू मध्ये शिफ्ट केले. सर्व स्तरातून बेस्ट च्या कर्मचाऱ्यांचे ड्रायव्हर श्री भोंडवे, आणि श्री. खतीले, श्री.चानखवा,श्री.गवळी, श्री.एस.सुर्वे, श्री.पी सुर्वे, श्री.वाघमारे* यांचे कौतुक होत आहे. याची माहिती मिळताच बेस्टचे मा.अध्यक्ष नगरसेवक श्री.अनिल कोकीळ,बेस्ट कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्री.गणेश शिंदे,श्री.मिलिंद हळदणकर यांनी आज सदर बेस्ट कर्मचारी वर्गाच्या बेस्टच्या पाठकावडी आगारात जाऊन सदर सर्व कामगार वर्गाचा सत्कार केला,सदर प्रसंगी बेस्टचे अधिकारी,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.