Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वझीरएक्सद्वारे जून २०२४ च्या प्रुफ ऑफ रिझर्व्ह्जचे प्रकाशन

वझीरएक्सद्वारे जून २०२४ च्या प्रुफ ऑफ रिझर्व्ह्जचे प्रकाशन ~ पारदर्शकता आणि वापरकर्त्यांच्या विश्वासाप्रती वचबध्दता दृढ करते ~ मुंबई, १४ जून २०२४: आकाराने भारतात सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज असलेल्या वझीरएक्सद्वारे जून २०२४ च्या प्रुफ ऑफ रिझर्व्हचे प्रकाशन करण्यात आले आणि अशा प्रकारे व्हर्च्युअल डिजिटल असेट्स अर्थ प्रणालीतील पारदर्शकता आणि वापरकर्त्यांच्या विश्वासास जोपासले गेले. ३५० क्रिप्टोकरन्सीज आणि ७०० मार्केट जोड्यांशी संलग्न व्यवहारांस सुविधाजनक बनवणारे, उद्यमातील अग्रणी संस्था या नात्याने वझीरएक्स त्यांच्या वापरकर्त्याच्या संपत्तीचे उत्तरदायित्त्व आणि सुरक्षिततेचे सर्वोच्च मापदंड जतन करण्याचे महत्त्व जाणतात. जून १०, २०२४ रोजी वझीरएक्स ची एकूण होल्डिंग्ज लक्षवेधक रु ४,२०३.८८ कोटी (युएसडीटी ५०४.६४ मिलियन) एवढी होती व जानेवारी २०२३ मध्ये शेअर केलेल्या डेटाच्या तुलनेत ७९% इतकी प्रचंड वाढ नोंदवली गेली. लागोपाठ २ वर्षे वझीरएक्स ने रिझर्व्ह्जच्या दृष्टीने सर्वात मोठे एक्स्चेंज हे स्थान अभिमानाने टिकवून ठेवले आहे व अशा प्रकारे क्रिप्टो चाहत्यांसाठी एक विश्वासपात्र आणि सॉल्व्हंट प्लॅटफॉर्म या नात्याने आपले स्थान अधोरेखित केले आहे.
विशेषकरून क्रिप्टो संपत्तीचा पाठपुरावा म्हणजेच ट्रॅक करण्यासाठी असलेला सुप्रसिध्द प्लॅटफॉर्म कॉइन गब्बरच्या नैपुण्याचा उपयोग करत वझीरएक्स ने त्यांचे रियल-टाइम-प्रुफ ऑफ रिझर्व्ह्ज सार्वजनिक रित्या प्राप्त करण्याजोगे केले आहेत कॉइन गब्बरने त्यांच्य वेबसाइटवर डीआयवाय (स्वत: करा) मॉड्युल सक्षम केल्याने, वापरकर्ते त्यांच्या पसंतीच्या क्रिप्टोकरन्सीजसाठी वॉलेट ॲड्रेसेसची पडताळणी करू शकतात. वझीरएक्सचे उपाध्यक्ष राजगोपाल मेनन म्हणाले, "वझीरएक्समध्ये आम्ही ठामपणे मानतो की विश्वास हाच एक असा मजबूत पाया आहे ज्यावर क्रिप्टोची क्रांती रचली जाईल. या मूल्यांप्रती आमची अटूट बांधिलकी दर्शवणारे आमचे सर्वसमावेशक प्रुफ ऑफ रिझर्व्ह्ज स्टेटमेंट. आमच्या वापरकर्त्यांना हा प्रुफ ऑफ रिझर्व्ह्ज रिपोर्ट देऊन, त्यांचा रास्त हक्क असलेली हमी आणि सुरक्षितता देऊन त्यांना सक्षम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे."

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.