Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फेडएक्सचा एलजीबीटीक्‍यूआयए+ समुदायाकरिता उपक्रम

फेडएक्सचा एलजीबीटीक्‍यूआयए+ समुदायाकरिता उपक्रम मुंबई, -- : फेडरल एक्‍स्‍प्रेस कॉर्पोरेशन (फेडएक्स) या जगातील सर्वात मोठ्या एक्‍स्‍प्रेस परिवहन कंपनी सक्षम मानवतावादी प्रयत्‍नांसोबत सहयोगाने व्‍यावसायिक प्रशिक्षण स्‍कॉलरशिप्‍स देत जवळपास १०० एलजीबीटीक्‍यूआयए+ समुदाय सदस्‍यांना अपस्किल करत आहे. सक्षम उपक्रमांतर्गत पात्र एलजीबीटीक्‍यूआयए+ व्‍यक्‍तींना सौंदर्य, शिवणकाम, नृत्‍य, मेकअप व मेहंदी कला अशा विविध क्षेत्रांमध्‍ये व्‍यावसायिक प्रशिक्षण स्‍कॉलरशिप्‍स देण्‍यात आल्‍या आहेत. टेक्निकल कौशल्‍यांव्‍यतिरिक्‍त सहभागींना व्‍यक्तिमत्त्व विकास व ग्रूमिंग, नातेसंबंध व्‍यवस्‍थापन, प्रभावी संवाद, तणाव व्‍यवस्‍थापन, टीमवर्क आणि व्‍यक्तिमत्त्व संवर्धन यावरील सत्रांमधून फायदा मिळतो. हा सर्वांगीण दृष्टिकोन सर्वसमावेशक वैयक्तिक व व्‍यावसायिक विकासाची खात्री देतो. फेडएक्सच्‍या इंडिया ऑपरेशन्‍स व कस्‍टमर एक्‍स्‍पेरिअन्‍स एमईआयएसएचे उपाध्‍यक्ष सुवेंदू चौधरी म्‍हणाले, ''कर्मचारी-केंद्रित तत्त्वानुसार फेडएक्सची स्‍थापना करण्‍यात आली आणि सर्वांचा आदर हे मुलभूत व्‍यवसाय तत्त्व राहिले आहे. आमच्‍या डीईआय कटिबद्धता आमच्‍या संयुक्‍त सांस्‍कृतिक मूल्‍यांशी संलग्‍न आहेत आणि प्रत्‍येकजण प्रगती करण्‍यास पात्र आहे या विश्‍वासाने मार्गदर्शित आहे. व्‍यावसायिक प्रशिक्षण व रोजगार संबंध प्रदान करत आमचा शाश्‍वत उदरनिर्वाहाला चालना देण्‍याच्‍या माध्‍यमातून इक्विटी व सर्वसमावेशकता वाढवण्‍याचा मनसुबा आहे. सर्वांसाठी सन्‍मान व आदर यावर आमचे लक्ष केंद्रित आहे.''
कंपनीची समुदाय प्रगतीप्रती कटिबद्धता एलजीबीटीक्‍यूआयए+ समुदायासाठी देखील आहे. फेडएक्सने भारतातील हजारो महिला लघु व्‍यवसाय मालकांना साह्य केले आहे. तसेच त्‍यांना सक्षम उपक्रमाचा भाग म्‍हणून त्‍यांचा व्‍यवसाय विकसित करण्‍यास मदत करत आहे. जागतिक स्‍तरावर, फेडएक्सने २००५ मध्‍ये एलजीबीटीक्‍यू+ कार्यांप्रती पहिले दान केले, २०१७ मध्‍ये आपला पाठिंबा दर्शवला आणि तेव्‍हापासून जगभरातील एलजीबीटीक्‍यू+ उपक्रमांसाठी जवळपास २ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दान केले आहे. यूएनडीपी रिपोर्टनुसार, समान रोजगार संधी धोरणांची अंमलबजावणी केलेल्‍या आणि लैंगिक-सर्वसमावेशक संस्‍कृतीला चालना देणाऱ्या व्‍यवसायांची उत्‍पादने व उत्‍पादकतेमध्‍ये सुधारणा होण्‍याची शक्‍यता ६० टक्‍क्‍यांहून अधिक आहे. तसेच, या कंपन्‍या अधिक उत्तम प्रतिष्‍ठेचा आनंद घेतात, सहजपणे टॅलेंटचे लक्ष वेधून घेण्‍यासोबत त्‍यांना कायम ठेवतात आणि सुधारित सर्जनशीलता व इनोव्‍हेशन राखतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.