Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मंदीच्या वातावरणातही एआय, एफएमसीजी, ऑईल अँड गॅसमधील रोजगारामध्‍ये वाढ

मंदीच्या वातावरणातही एआय, एफएमसीजी, ऑईल अँड गॅसमधील रोजगारामध्‍ये वाढ: नोकरी जॉबस्‍पीक मुंबई,---- नोकरी जॉबस्‍पीक इंडेक्‍स हा भारतातील व्‍हाइट कॉलर हायरिंगचा आघाडीचा सूचक एप्रिल'२४ च्‍या तुलनेत मे महिन्‍यामध्‍ये ६ टक्‍क्‍यांनी वाढला, पण गेल्‍या वर्षीच्‍या मे महिन्‍याच्‍या तुलनेत मोठ्या प्रमाणात स्थिर राहिला. इंडेक्‍स मे २०२३ च्‍या तुलनेत २ टक्‍क्‍यांची घट होत २७९९ राहिला. बहुतांश क्षेत्रांनी मध्‍यम-एक अंकी वाढीची नोंद केली, पण आयटी (वार्षिक ० टक्‍के), बीपीओ (-३ टक्‍के) आणि शिक्षण (-५ टक्‍के) यांचा इंडेक्‍स घसरला. प्रमुख क्षेत्रे जसे ऑईल अँड गॅस (१४ टक्‍के), बँकिंग (१२ टक्‍के) आणि एफएमसीजी (१७ टक्‍के) यांनी उत्तम वाढ केली, तर हेल्‍थकेअर आणि ट्रॅव्‍हल अँड हॉस्पिटॅलिटी या प्रत्‍येक क्षेत्राने प्रबळ ८ टक्‍के वाढीची नोंद केली. लहान शहरांनी प्रमुख महानगरीय क्षेत्रांना मागे टाकण्‍याची कामगिरी कायम ठेवली आणि वरिष्‍ठ व्‍यावसायिकांसाठी मोठी मागणी दिसण्‍यात आली, ज्‍यामुळे अनुभवी उमेदवारांसाठी संधींमध्‍ये उत्तम वार्षिक वाढ झाली. एफएमसीजी: एफएमसीजी क्षेत्राने वार्षिक १७ टक्‍के वाढीची नोंद केली आणि स्थिरता व वाढ कायम ठेवली आहे, ज्‍याचे श्रेय ग्राहकांचे बदलते प्राधान्‍यक्रम, शहरीकरण आणि ई-कॉमर्स विस्‍तारीकरण अशा घटकांना जाते. मुंबई व कोलकातामधील हायरिंगमध्‍ये अनुक्रमे ३८ टक्‍के आणि २५ टक्‍के वाढ दिसण्‍यात आली. नाविन्‍यता, वितरण कार्यक्षमता आणि बाजारपेठ प्रवेशावर लक्ष केंद्रित करण्‍यासह एफएमसीजी कंपन्‍या सेल्‍स, मार्केटिंग, सप्‍लाय चेन व प्रॉडक्‍ट डेव्‍हलपमेंट अशा कार्यांमध्‍ये टॅलेंटची सक्रियपणे नियुक्‍ती करत आहेत. एआय-एमएल भूमिकांमध्‍ये शाश्‍वत वाढ: एआय-एमएल टॅलेंटसाठी शाश्‍वत वाढ दिसण्‍यात आली आहे. एआय-एमएलमधील रोजगारांमध्‍ये वार्षिक ३७ टक्‍क्‍यांची वाढ झाली, ज्‍यामधून कार्यरत कार्यक्षमता, नाविन्‍यता वितरण आणि स्‍पर्धात्‍मकता वाढवण्‍यासाठी एआय तंत्रज्ञानामधील विशेष कौशल्‍य व टॅलेंटप्रती उद्योगाचा विश्‍वास दिसून येतो.
ऑईल अँड गॅस: जागतिक ऊर्जा बाजारपेठा आणि सर्वसमावेशक नियामक लँडस्‍केपमध्‍ये चढ-उतार असताना देखील ऑईल अँड गॅस आणि ऊर्जा क्षेत्रांनी वार्षिक १४ टक्‍के वाढ केली आहे. सर्व अनुभव स्‍तरांवर वाढ निदर्शनास आली असली तरी क्षेत्रात १३ ते १६ वर्षांचा अनुभव असलेल्‍या व्‍यावसायिकांसाठी सर्वाधिक मागणी दिसण्‍यात आली. पायाभूत सुविधा विकास, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्‍प आणि शोध उपक्रमांमध्‍ये सुरू असलेल्‍या गुंतवणूकांमुळे या वाढीला चालना मिळाली आहे. हेल्‍थकेअर: हेल्‍थकेअर क्षेत्राने बेंगळुरू व हैदराबाद अशा मेट्रो शहरांमधील रोजगारामध्‍ये वार्षिक ८ टक्‍के वाढीची नोंद केली. फ्रण्‍टलाइन आरोग्‍यसेवा व्यावसायिकांपासून संशोधक, प्रशासक व टेक्‍नॉलॉजिस्‍ट्सपर्यंत हेल्‍थकेअर इकोसिस्‍टमच्‍या विविध विभागांमध्‍ये टॅलेंटची वाढती गरज आहे. विकसित होत असलेले प्रादेशिक लँडस्‍केप: मिनी-मेट्रोमधील हायरिंग प्रमुख महानगरीय क्षेत्रांमधील हायरिंगना मागे टाकत आहे. या ट्रेण्‍डमधून लहान शहरी केंद्रांमधील वाढती आर्थिक क्षमता आणि रोजगार संधी दिसून येतात, ज्‍याचे श्रेय शहरीकरण, पायाभूत सुविधा विकास आणि आर्थिक क्रियाकलापांचे विकेंद्रीकरण अशा घटकांना जाते. नॉन-मेट्रो शहरे जसे सुरत (वार्षिक +२३ टक्‍के) आणि रायपूर (+२२ टक्‍के) हायरिंग हॉटस्‍पॉट्स ठरले, तर दिल्‍ली-एनसीआर, चेन्‍नई व हैदराबाद अशा मेट्रो शहरांमध्‍ये स्थिर हायरिंग ट्रेण्‍ड्स निदर्शनास आले, तसेच पुण्‍यातील हायरिंग ट्रेण्‍डमध्‍ये काहीशी वाढ झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.