भारत २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ बनेल: टीमलीज
July 28, 2024
0
भारत २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ बनेल: टीमलीज
मुंबई : टीमलीज सर्विसेस या भारतातील रोजगार, रोजगारक्षमता व व्यवसाय करण्यामधील सुलभता यामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या भारतातील आघाडीच्या स्टाफिंग समूहाने त्यांचा 'कंझ्युमर ड्यूरेबल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स - ए स्टाफिंग परस्पेक्टिव्ह रिपोर्ट' जारी केला. हा अहवाल देशातील झपाट्याने विकसित होणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राबाबत सर्वसमावेशक माहिती देतो. भारत जगातील झपाट्याने विकसित होणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान दृढ करत असताना देश २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ बनेल अशी अपेक्षा या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या क्षेत्रातील कर्मचारीवर्ग लाभार्थींना सेवा देण्यासाठी, तसेच कार्यक्षमपणे शाश्वत विकास संपादित करण्यासाठी क्षेत्राच्या क्षमता वाढवण्यामध्ये महत्त्वाचे असतील. या अहवालामधून विविध टॅलेंटसाठी क्षेत्राच्या मागणी सुलभपणे व कार्यक्षमपणे पूर्ण करण्यामध्ये या कर्मचारीवर्गाची महत्त्वपूर्ण भूमिका निदर्शनास येते.
या अहवालाच्या माध्यमातून टीमलीज सर्विसेसने उच्च मागणी असलेल्या तात्पुरत्या पदांना निदर्शनास आणले, ज्यामध्ये इन-स्टोअर प्रमोटर्स, सर्विस टेक्निशियन्स, सुपरवायजर्स, सेल्स ट्रेनर्स, चॅनेल सेल्स एक्झिक्युटिव्ह्ज, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह्ज, वेअरहाऊस इन-चार्ज, टेलि-सपोर्ट एक्झिक्युटिव्ह्ज आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअर्स यांचा समावेश आहे, जे ग्राहकोपयोगी वस्तू व इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत. अहवालामधील सर्वसमावेशक बाजारपेठ विभाजन व आकार विश्लेषणामध्ये व्यापक ग्राहकोपयोगी वस्तूंचा समावेश आहे, जसे किचन अप्लायन्सेस, एलईडी लाइट्स व इलेक्ट्रिक फॅन्स सारखे लहान अप्लायन्सेस, एसी, रेफ्रिजरेटर्स व वॉशिंग मशिन्स सारखे मोठे अप्लायन्सेस आणि टीव्ही, मोबाइल फोन्स, कम्प्युटिंग डिवाईसेस व डिजिटल कॅमेरे यांसारख्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू. उल्लेखनीय बाब म्हणजे एसी बाजारपेठ १५ टक्क्यांच्या सीएजीआर दराने २०२८ पर्यंत ५.८ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, तर मोबाइल फोन बाजारपेठ ६.७ टक्क्यांच्या सीएजीआर दराने २०२८ पर्यंत ६१.२ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
तात्पुरत्या कर्मचारीवर्गाच्या डेमोग्राफिक प्रोफाइलमधून निदर्शनास येते की, प्रामुख्याने सरासरी वय ३१ वर्ष आणि कार्यकाल २.८ वर्ष असलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांचे (९४ टक्के) प्रमाण जास्त आहे. यापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांचे शिक्षण १२वी पेक्षा कमी आहे, म्हणून उत्पादकता वाढवण्याकरिता विशिष्ट कौशल्ये विकसित करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज आहे.
टीमलीज सर्विसेसचा अहवाल सखोल भौगोलिक विश्लेषण देखील देते, ज्यामधून निदर्शनास येते की तात्पुरत्या कर्मचारीवर्गाचे सर्वाधिक प्रमाण प्रामुख्याने दक्षिण प्रांतामध्ये आहे. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश व तेलंगणा ही तात्पुरत्या रोजगारांमध्ये सर्वोच्च वाढ निदर्शनास आलेली अव्वल पाच राज्ये आहेत. शहरी स्तरावर बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि मुंबई येथे तात्पुरत्या रोजगारांमध्ये वाढ निदर्शनास येते. हा अहवाल कम्पेन्सेशन ट्रेण्ड्सचे (नुकसान भरपाई ट्रेण्ड्स) देखील परीक्षण करतो, ज्यामधून मेट्रो शहरांमधील सर्वोच्च वार्षिक सीटीसी आणि द्वितीय श्रेणीच्या शहरांमधील सर्वोच्च सरासरी मासिक इन्सेंटिव्ह्जसह प्रांत व शहरांमधील सरासरी वार्षिक सीटीसी व इन्सेंटिव्ह्जमधील विविधता निदर्शनास येते.