विमानात नवीन फोनचा बॉक्स उघडून पहाण्याचा जगातील पहिला कार्यक्रम
July 24, 2024
0
*टॉप-10 रिटेल्स प्रा. लिमिटेड आणि ओप्पो मुंबई यांनी, विमानात नवीन फोनचा बॉक्स उघडून पहाण्याचा जगातील पहिला कार्यक्रम आयोजित केला*
मुंबईस्थित किरकोळ विक्री साखळीची कंपनी , टॉप-10 रिटेल्स प्रा. लिमिटेड यांनी ओप्पो मुंबईच्या सहकार्याने विमानात फोन अनबॉक्सिंग करायचा,जगातील अशा प्रकारचा पहिला कायर्कम आयोजित करून इतिहास रचला आहे. 17 जुलै 2024 रोजी रात्री 10:00 वाजता आयोजित केलेल्या या अनोख्या कार्यक्रमात टॉप-10 रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या 108 भाग्यवान ग्राहकांना सहभागी होऊन त्यांचे नवीन फोन विमान आकाशात उडत असताना बॉक्स उघडून बघता आले.
या कार्यक्रमासाठी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसआयए)-टर्मिनल 1 येथून विमानतळ प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्देशित केलेल्या मार्गाचा अवलंब करून 180 आसन क्षमतेच्या विशेष चार्टर्ड विमानाने उड्डाण केले. हे विमान एका तासाचे उड्डाण करून सी. एस. आय. ए. कडे परतले, ज्यामुळे प्रवाशांना एक रोमांचक आणि संस्मरणीय प्रवासाचा अनुभव मिळाला.
उड्डाणादरम्यान, केबिन क्रूच्या नेतृत्वाखाली आधी ठरवलेले आकडे उलट्या क्रमाने मोजून, ग्राहकांनी त्यांचे नवीन ओप्पो रेनो 12 प्रो मोबाइल फोन बॉक्स मधून बाहेर काढले. हा अभूतपूर्व कार्यक्रम ग्राहकांचा आनंद आणि उत्साह टिपण्यासाठी तयार करण्यात आला होता कारण त्यांनी त्यांचे नवीन उपकरण आकाशात उघडून बघायचा अनुभव पहिल्यांदाच घेतला होता. सहभागींना त्यांच्या नवीन ओप्पो रेनो 12 प्रो 5 जी फोनसह त्यांचा नवीन फोन बॉक्स मधून काढण्याच्या अद्वितीय क्षणांचे जतन करण्याची संधी देखील मिळाली.
हा उपक्रम टॉप-10 रिटेल्स प्रा.लिमिटेड आणि ओप्पो मुंबई यांचा असून या दोन्ही कंपनींनी त्यांच्या निष्ठावंत ग्राहकांसाठी अविस्मरणीय आठवणी निर्माण करण्याचे आणि ब्रँड आणि त्याचे चाहते यांच्यातील बंध दृढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यांचा हा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन मोबाइल उद्योगात एक नवीन मापदंड स्थापित करतो, ज्यामध्ये पारंपरिक किरकोळ विक्रीच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञान आणि अनुभवांचा मिलाफ झालेला दिसून येतो.
टॉप-10 रिटेल्स प्रा. लिमिटेड, ही मोबाईल फोन, अॅक्सेसरीज, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीमध्ये विशेष प्राविण्य असलेली मुंबई स्थित किरकोळ साखळी, ग्राहकांना अनोख्या अनुभवांचा आनंद देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि ही कंपनी टॉप-10 आघाडीच्या ब्रँडमधील नवीनतम मोबाइल उपकरणांची विस्तृत श्रेणी ऑफर करते.
ओप्पो बद्दल : ओप्पो हा जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त तंत्रज्ञान ब्रँड आहे, जो त्याच्या अत्याधुनिक स्मार्टफोन आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. वापरकर्त्यांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी ओप्पो तंत्रज्ञानाच्या सीमा ओलांडत आहे.