शशी रंजन यांनी वर्सोवा मधील के वेस्ट वॉर्डातील अकार्यक्षम अधिकाऱ्याची प्रशंसा केल्याबद्दल माध्यमांना धारेवर धरलं.
July 13, 2024
0
*वर्सोवामधील सामाजिक कार्यकर्ते आणि दिग्दर्शक व निर्माते शशी रंजन यांनी वर्सोवा मधील के वेस्ट वॉर्डातील अकार्यक्षम अधिकाऱ्याची प्रशंसा केल्याबद्दल माध्यमांना धारेवर धरलं.*
काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरातील के पश्चिम ह्या वॉर्डातील बीएमसी अधिकाऱ्याची बदली झाली असता काही वृत्तपत्रांनी बीएमसी अधिकाऱ्याची प्रशंसा केली त्यांचं कार्यतत्पर असणं अनेकांना खुपलं अशी बातमी एका वृत्तपत्रातून केली होती. पण हे साफ खोटं आहे असं शशी रंजनजी यांनी एका व्हिडिओ मधून सांगितलं तसेच ती बातमी एक इमेज बनवण्यासाठी केलेली होती जे काही छापून आलं ते साफ खोटं आहे.
गेली ३ वर्ष तो अधिकारी कार्यरत असताना त्याने कधीही वृत्तपत्रात उल्लेख केलेल्या अनधिकृत बांधकामावर ऍक्शन घेतली नाही. हा अधिकारी पदावर ३ वर्ष झोपेत होता का असा थेट प्रश्न त्यांनी आपल्या व्हिडिओ मार्फत केला आहे. तसेच अश्या अकार्यक्षम अधिकाऱ्याचं खापर स्थानिक लोकप्रतिनिधीच्या नावे फोडून त्यांची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न सुद्धा केल जात आहे असं त्यांनी व्हिडिओ मध्ये सांगितलं.