Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*थम्‍स अपच्‍या ऑलिम्पिक्‍स मोहिमेने दाखवली ‘थम्‍स अप' गेस्‍चरची क्षमता*

*थम्‍स अपच्‍या ऑलिम्पिक्‍स मोहिमेने दाखवली ‘थम्‍स अप' गेस्‍चरची क्षमता* अप या कोका-कोला कंपनीअंतर्गत स्‍वदेशी बिलियन-डॉलर बेव्‍हरेज ब्रँडला आगामी पॅरिस २०२४ ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक गेम्‍ससाठी त्‍यांची नवीन मोहिम ‘उठा थम्‍स अप, जगा तूफान'च्‍या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. ही मोहिम अॅथलीट्सवर ‘थम्‍स अप'चा प्रेरणादायी प्रभाव या साध्‍या, पण प्रबळ संकल्‍पनेवर आधारित आहे, जी अॅथलीट्सना त्‍यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्‍स देण्‍यास प्रेरित करते. आपले अॅथलीट्स डायनॅमिक ‘तूफान' आहेत, ते देशवासीयांना त्‍यांच्‍या अंतर्गत क्षमतेवर विश्‍वास ठेवण्‍यास प्रेरित करतात. पण चॅम्पियन रातोरात घडत नाहीत. अॅथलीट्स अडथळ्यांचा सामना करतात किंवा काही क्षणासाठी खचल्‍यासारखे वाटते तेव्‍हा त्‍यांचे समर्थक, प्रशिक्षक, मित्र व कुटुंबांकडून साधे थम्‍स-अप त्‍यांचे मनोबल वाढवतात आणि विजयासाठी प्रयत्‍न करत राहण्‍यास प्रेरित करतात. हीच बाब या मोहिमेचे तत्त्व आहे. कोका-कोला कंपनीच्‍या जागतिक स्‍पोर्ट्स इव्‍हेण्‍ट्ससोबतच्‍या कायमस्‍वरूपी सहयोगाचा भाग म्‍हणून थम्‍स अप २०२४ ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक गेम्‍ससाठी ऑफिशियल ग्‍लोबल पार्टनर आहे. थम्‍स अपने भारतातील टॅलेंटला जागतिक मंचावर दाखवणारे सक्षम व पॅरा-अॅथलीट्सची चिकाटी, धैर्य आणि निर्धाराला सतत पाठिंबा दलिा आहे. सिफ्त कौर सामरा, लोव्‍हलिना बोर्गोहन, निखत झरीन, रूबिना फ्रान्सिस आणि साक्षी कसाना यांचा समावेश असलेली मोहिम जाहिरात लक्षवेधक व व्हिज्‍युअल कथानकाला सादर करते, ज्‍यामध्‍ये वास्‍तविक जीवनातील क्षणांना दाखवण्‍यात आले, जेथे अॅथलीट्स थम्‍स-अपच्‍या क्षमतेला उजाळा देतात. या मोहिमेबाबत मत व्‍यक्‍त करत कोका-कोला इंडिया व साऊथ-वेस्‍ट एशियाच्‍या स्‍पार्कलिंग फ्लेवर्सच्‍या सीनियर कॅटेगरी डायरेक्‍टर सुमेली चॅटर्जी म्‍हणाल्‍या, “आम्‍हाला भारताच्‍या ऑलिम्पिक्‍स व पॅरालिम्पिक्‍स स्‍वप्‍नाचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. गेल्‍या ४ वर्षांमध्‍ये जागतिक क्रीडामध्‍ये आपल्‍या अॅथलीट्सच्‍या पॉवर-पॅक परफॉर्मन्‍सनी आपल्‍यामध्‍ये अभिमान जागृत केला आहे. पॅरिस २०२४ ऐतिहासिक प्रसंग ठरेल आणि आम्‍हाला आपल्‍या अॅथलीट्सना त्‍यांच्‍या प्रवासामध्‍ये पाठिंबा देण्‍यास सन्‍माननीय वाटत आहे. आमचा दृढ विश्‍वास आहे की, थम्‍स-अपचे साधे गेस्‍चर अॅथलीट्ससोबत सर्वांसाठी कोणत्‍याही क्षणाला प्रबळ करू शकते. या गेस्‍चरसह प्रख्‍यात थम्‍स अप ब्रँडमधून दृढता आणि अतूट निर्धाराचा उत्‍साह दिसून येतो.'' या मोहिमेसोबतच्‍या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत सिफ्त कौर सामरा म्‍हणाल्‍या, “मला या मोहिमेचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. अनेक लोक थम्‍स-अपसह पाठिंबा देत असल्‍याने आम्‍हाला जागतिक मंचावर आमची सर्वोत्तम कामगिरी करण्‍याची प्रेरणा मिळाली आहे. यामधून आम्‍हाला देशवासीयांकडून मिळणारा पाठिंबा दिसून येतो.''
या मोहिमेसोबतच्‍या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत लोव्‍हलिना बोर्गोहन म्‍हणाल्‍या, “मला थम्‍स अपसोबतच्‍या सहयोगाचा आनंद होत आहे. बॉक्‍सर असल्‍यामुळे मी विशेषत: आव्‍हानात्‍मक सामन्‍यांमदरम्‍यान प्रेरणेचे महत्त्व अनुभवले आहे. पाठिंब्‍याचा साध्‍या गेस्‍चर अविश्‍वसनीयरित्‍या प्रेरित करू शकतो आणि ही मोहिम याच बाबीला महत्त्व देते.'' या मोहिमेसोबतच्‍या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत निखत झरीन म्‍हणाल्‍या, “रिंगमध्‍ये प्रत्‍येक थम्‍स अप मला अधिक मेहनत घेण्‍यासोबत अधिक यश गाठण्‍याप्रती माझ्या निर्धाराला प्रबळ करतो. थम्‍स अपसोबतचा सहयोग उत्तम आहे, जेथे ब्रँडला आमच्‍यासारख्‍या अॅथलीट्सना पाठिंबा देण्‍यासोबत आमच्‍यावर विश्‍वास ठेवण्‍याचे महत्त्व माहित आहे.'' या मोहिमेसोबतच्‍या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत रूबिना फ्रान्सिस म्‍हणाल्‍या, “थम्‍स अपची मोहिम दृढता व एकतेला चालना देते, ज्‍यामधून निदर्शनास येते की साधे गेस्‍चर देखील आम्‍हाला सर्वोत्तम कामगिरी करण्‍यास प्रेरित करू शकते.'' या मोहिमेसोबतच्‍या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत साक्षी कसाना म्‍हणाल्‍या, “अॅथलीट्ससाठी समर्थकांचा पाठिंबा शक्‍तीसारखा असतो, ज्‍यामुळे आम्‍हाला आमची सर्वोत्तम कामगिरी करण्‍यास मदत होते. अनिश्चिततांच्‍या काळात चाहते आमचे मनोबल वाढवू शकतात, ज्‍यामुळे आम्‍ही सर्व विषमतांवर मात करण्‍यास सक्षम होऊ शकतो.'' ऑगिल्‍व्‍ही इंडिया (नॉर्थ)च्‍या चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर रितू शारदा म्‍हणाल्‍या, “एका थम्‍स अपमध्‍ये मोठी क्षमता असते. ते तुमच्‍यामधील क्षमतांना चालना देऊ शकते आणि खचल्‍यासारखे वाटत असताना तुमचे मनोबल उंचावू शकते. तर मग कल्‍पना करा की, अब्‍जो थम्‍स अप काय करू शकतात. यंदा ऑलिम्पिक्‍सना आपण अब्‍जो थम्‍स अपच्‍या क्षमतेसह उत्तम कामगिरी करण्‍यासाठी आपल्‍या अॅथलीट्सला पाठवत आहोत. आणि आमची हीच भावना या नवीन थम्‍स अप मोहिमेसह कॅप्‍चर करण्‍याची इच्‍छा होती. उठा थम्‍स अप, जगा तूफान.'' ही मोहिम सर्वांगीण विपणन दृष्टिकोनाचा वापर करत ग्राहकांपर्यंत पोहोचण्‍यासोबत संलग्‍न होण्‍यासाठी विविध चॅनेल्‍सचा वापर करेल, जसे टेलिव्हिजन, डिजिटल, प्रिंट आणि ओओएच. ब्रँडने जाहिरातींची सिरीज निर्माण केली आहे, जी अॅथलीट्सची गाथा आणि पॅरिसपर्यंतच्‍या त्‍यांच्‍या ऐतिहासिक प्रवासाला सादर करते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.