आमदार सुनील राणे यांनी अथर्व फाउंडेशनतर्फे शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना भेट तीन रुग्णवाहिका*
July 28, 2024
0
*बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांनी अथर्व फाउंडेशनतर्फे शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना भेट तीन रुग्णवाहिका*
अथर्व फाउंडेशनने पूर्वोत्तर राज्यांच्या सैनिक मंडळाला भेट स्वरूपात दिल्या तीन रुग्णवाहिका
'कारगिल विजय दिवस'च्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त अथर्व फाउंडेशनतर्फे राजभवन, मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये राज्यपाल श्री. रमेश बैसजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बोरिवलीचे आमदार श्री सुनील राणे, सेना अधिकारी आणि अथर्व फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा वर्षा राणे आदी उपस्थित होते.
अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष व बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांनी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी रुग्णवाहिका देऊन मदत केली आहे. राज्यपाल श्री. रमेश बैसजी यांनी मिझोराम, मेघालय आणि त्रिपुराच्या राज्य लष्करी मंडळांना सशस्त्र दलांमध्ये सेवा देणाऱ्या सर्व शूर सैनिकांसाठी आरोग्य सेवा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अथर्व फाउंडेशनने याआधीच मणिपूर, आसाम, सिक्कीम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या राज्य सैनिक मंडळांना रुग्णवाहिका भेट स्वरूपात दिल्या आहेत.
अथर्व फाउंडेशनचे अध्यक्ष व बोरिवलीचे आमदार श्री.सुनील राणे यांनी यावेळी सांगितले की, मी सर्व शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतो.
आणि मिझोरम, मेघालय आणि त्रिपुरा येथे राहणारे आमचे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य लक्षात घेऊन आम्ही ही सेवा देत आहोत. याशिवाय 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या मोहिमेअंतर्गत आम्ही आमच्या मुलींना शिक्षण क्षेत्रात उच्च स्तरावर पोहोचवता यावे यासाठी लॅपटॉपचे वाटपही करत आहोत. तसेच, अथर्व फाऊंडेशनतर्फे शिलाँग, मेघालय येथे सेवास्वरूपी केंद्र देखील सुरू करण्यात येत आहे. जेणेकरून तिथे स्थायिक झालेल्या आपल्या देशवासीयांची सेवा करण्याची संधी मिळेल. हा कार्यक्रम देशाच्या सुरक्षेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या शूर आत्म्यांप्रती आपल्या राष्ट्राची कृतज्ञता अधोरेखित करतो आणि आपल्या माजी सैनिकांच्या कल्याणासाठी आपली कटिबद्धता अधिक दृढ करतो.
अथर्व फाउंडेशन हा एज्युकेशनल ट्रस्टचा एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश श्री सुनील राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली महिला, मुले आणि तरुणांना शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करणे आहे जेणेकरून त्यांना सन्मानाने आणि स्वावलंबीरित्या जगता येईल. फाऊंडेशन भारताच्या ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण, शहीदांच्या कुटुंबीयांना मदत, महिला सक्षमीकरण आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासारख्या उदात्त उपक्रमांसाठी काम करण्यासाठी वचनबद्ध आहे