'मिला ब्युटी' लाँचसाठी साहिल नायर यांचा धोरणात्मक सहयोग
July 28, 2024
0
'मिला ब्युटी' लाँचसाठी साहिल नायर यांचा धोरणात्मक सहयोग
मुंबई, २४ जुलै २०२४: भारतातील सर्वात लोकप्रिय ब्युटी ब्रँड्सचे धोरणात्मक समर्थक साहिल नायर त्यांचा नवीन उद्यम 'मिला ब्युटी' (पूर्वीचा मिलाप कॉस्मेटिक्स) लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. व्यवस्थापकीय संचालक व सह-संस्थापक म्हणून साहिल भारतातील ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या सर्वोत्तम दर्जाच्या, नाविन्यपूर्ण व टॉक्सिन-फ्री मेकअप उत्पादनांसह भारतातील ब्युटी उद्योगाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यामध्ये मिला ब्युटीचे नेतृत्व करतील. साहिल यांनी सचिन चढ्ढा आणि केशव चढ्ढा यांच्यासोबत धोरणात्मक सहयोग केला, जे आता मिला ब्युटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलाप कॉस्मेटिक्सचे सह-संस्थापक व संचालक होते.
ब्रँड मेकअप बीगिनर्स व उत्साहींच्या गरजांची पूर्तता करतो, तसेच त्यांना सर्जनशीलतेला प्रेरित करणाऱ्या वैविध्यपूर्ण, आधुनिक मेकअप आवश्यक गोष्टींसह त्यांच्या स्वत:च्या अद्वितीय क्षमता अभिव्यक्त करण्यास मदत करतो. अपग्रेडेड सूत्रीकरण व पॅकेजिंगपासून प्रखर चाचणीपर्यंत मिला ब्युटी उत्साहपूर्ण अनुभवाची खात्री देतो, ज्यामधून लक्झरी मिळते.
जागतिक दृष्टीकोनामध्ये सामावलेला आणि अभिमानाने मेड इन इंडिया ब्रँड मिला ब्युटीची देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी मानेसरमध्ये ३६,००० चौरस फूट फॅक्टरी उभारण्याची योजना आहे, जेथे दर्जात्मक मानकांची पूर्तता केली जाईल. सध्याच्या १०,००० रिटेल काऊंटर्सच्या उपस्थितीसह साहिल नायरची देशभरात ही आकडेवारी दुप्पट करत २०,००० पर्यंत घेऊन जाण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
मिला ब्युटीचे व्यवस्थापकीय संचालक व सह-संस्थापक साहिल नायर म्हणाले, ''मिला ब्युटी आकर्षक दरांमध्ये उत्साहित ब्युटीसाठी ओळखला जातो. आमच्या उत्पादन क्षमता वाढवत आणि रिटेल उपस्थिती वाढवत आम्ही सर्वांसाठी प्रीमियम ब्युटी उत्पादने उपलब्ध करून देण्याप्रती समर्पित आहोत. उद्योगातील दिग्गज सचिन व केशव चढ्ढा यांच्यासोबतचा सहयोग आम्हाला आत्मविश्वासाने व कुशलतेने पुढे जाण्यास सक्षम करतो. सहयोगाने, आमचा मेकअप स्तर निर्माण करण्याचा मनसुबा आहे, जो तुमच्यासह सुरू होतो आणि तुम्हाला प्रशंसित करतो. 'ब्युटी बीगिन्स विथ यू' हे आमचे फक्त तत्त्व नसून ग्राहकांना वचन देखील आहे.''
मिला ब्युटीच्या सध्याच्या पोर्टफोलिओमध्ये फेस, लिप, आय व नेल श्रेणींसह सर्वोत्तम उत्पादनांचा समावेश आहे, जसे प्राइमर, बुलेट लिपस्टिक, लिक्विड लिपस्टिक, कन्सीलर, आय लाइनर, नेल पेंट आणि लिप बाम, ज्यांची किंमत १०० रूपयांपासून सुरू होतो. सर्व उत्पादने आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असतील. मिलाप कॉस्मेटिक्सने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर महसूलामध्ये १ कोटी रूपयांचा टप्पा गाठला आहे आणि मिला ब्युटीमध्ये रिब्रँडिंगसह या वर्षात या महसूलात तिप्पट वाढ होण्याची अपेक्षा आहे.