Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ओमेगा पॅरिस २०२४ ब्रॉन्झ गोल्ड एडिशन लॉन्च

ओमेगा पॅरिस २०२४ ब्रॉन्झ गोल्ड एडिशन लॉन्च मुंबई: कोणत्याही क्रीडा प्रकारातील यशाचे मोजमाप म्हणजे गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदक. पॅरिस २०२४ ऑलिंपिकच्या अधिकृत टाइमकीपर ओमेगाने ऑलिंपिक खेळांमध्ये मिळणाऱ्या या प्रतिष्ठित पदकांच्या सन्मानार्थ एका खास घड्याळाचे अनावरण केले आहे.
या ओमेगा पॅरिस २०२४ ब्रॉन्झ गोल्ड एडिशनमध्ये एकाच संग्राह्य डिझाईनमध्ये उपरोक्त तिन्ही प्रतिष्ठित धातूंचा उपयोग केला आहे. या घड्याळाची ३९ मिमिची केस ही ओमेगाच्या खास ब्रॉन्झ गोल्डने बनवली आहे. यातील चमकदार डायल एजी ९२५ सिल्व्हरचे बनलेले आहे तर, घड्याळाचे नाजुक हात १८ के सेडना गोल्डचे बनलेले आहेत, ज्यावर खास पीव्हीडी ब्रॉन्झ गोल्डचा मुलामा चढवला आहे. हे डिझाईन जागतिक स्तरावर ओमेगा ज्या क्रीडा सिद्धीशी निगडीत आहे, त्यास समर्पित आहे. ही घड्याळ बनवणारी स्विस कंपनी १९३२ पासून ऑलिंपिक गेम्सची अधिकृत टाइमकीपर आहे आणि इतिहासात ३१व्यांदा ऑलिंपिकमध्ये वेळेचे मोजमाप करण्यासाठी आता या उन्हाळ्यात ती पॅरिसमध्ये येऊन दाखल झाली आहे. हीच परंपरा पॅरालिंपिक गेम्समध्ये देखील चालू आहे. पॅरालिंपिक गेम्समध्ये हा ब्रॅंड १९९२ पासून अधिकृत टाइमकीपर आहे. पॅरिस २०२४ ब्रॉन्झ गोल्ड एडिशनचा व्हिंटेज लुक १९३९ च्या ओमेगाच्या एका क्लासिक मनगटी घड्याळातून प्रेरित आहे. तो काळ म्हणजे या ब्रॅंडचा टाइमकीपिंगचा सुरुवातीचा काळ होता. त्या घड्याळात ओमेगाचे प्रसिद्ध ३ ओटी मॅन्युअल-वाइंडिंग स्मॉल सेकंड्स कॅलिबर होते आणि त्यातील धातू व केसच्या आकाराच्या बाबत तांत्रिक शीट्सवर संदर्भ “सीके ८५९” अंकित केले होते.
ती परंपरा चालू ठेवत, पॅरिस २०२४ ला आदरांजली वाहणाऱ्या या घड्याळात केसच्या मागे ‘बीजी ८५९' असे कोरले आहे, जे ब्रॉन्झ गोल्डमध्ये केसच्या आकाराचे प्रतीक आहे. सौम्य गुलाबी छटा असलेला आणि व्हर्डिग्रीस-ऑक्सिडेशन होऊ न देता बेजोड गंज-प्रतिरोध करणारा ब्रॉन्झ गोल्ड हा ओमेगाचा स्वतःचा मिश्रधातू आहे, जो ९के हॉलमार्कचे ३७.५% सोने तसेच पॅलडियम आणि चांदीसारख्या थोर घटकांनी समृद्ध आहे. ही उत्कृष्ट आणि अद्वितीय निर्मिती या घड्याळाला आगळावेगळा लुक देते. या घड्याळाचे अन्य उल्लेखनीय फीचर म्हणजे घड्याळाच्या डायलच्या केंद्रस्थानी असलेली ‘क्लास द पॅरिस’ची पॅटर्न जी फ्रेंच कलाकुसरीमधून स्फुरली आहे आणि बारीक आणि मोहक सजावटीचे अस्सल प्रतीक आहे. आणखी बरकाव्यात शिरून ओमेगाने मिनिट ट्रॅकवर एक गोलाकार ब्रश्ड पॅटर्न दिली आहे आणि ६ वाजण्याच्या स्थानी छोटा सेकंड्स सबडायल ट्रॅक दिला आहे, तर गडद ग्रे रंगाचा ओमेगा लोगो हा ब्रॅंडच्या पारंपरिक शैलीत सादर केला आहे. तसेच, कोरलेले ‘बीजी ८५९’ आणि केसबॅकला एका मुद्रित आणि फ्रॉस्टेड ऑलिंपिक गेम्स पॅरिस २०२४ पदकाने सुशोभित केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.