Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*पत्रकार महामंडळ गठीत करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश...*

*पत्रकार महामंडळ गठीत करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश...* *जोपर्यत लोटांंगणधारी बाद संघटना वगळून*महामंडळ कार्यान्वित होत नाही तोवर लढाई सुरु राहील*- *शीतल करदेकर*
*दहा वर्ष घेतलेल्या कष्टाला अखेर फळ मिळाले - भावाची बहिणीला भेट* *मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या आमरण उपोषण आंदोलनास यश* माध्यमकर्मी कल्याणकारी मंडळासाठी ( वेल्फेअर बोर्ड ) मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात माई च्या अध्यक्ष शीतलताई करदेकर , बुधवारपासून आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसल्या होत्या ! विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आमरण उपोषणाच्या पहिल्याच दिवशी दूरध्वनीवरून संपर्क साधून "ताई तुमच्या मागण्या रास्त असून आम्ही यावर योग्य ते करू; परंतु तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी." तसेच त्यांनी चर्चा करण्याचे आश्वासनही दिले विधान सभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी सकाळी दूरध्वनीवरून संपर्क साधून " आपली महामंडळाची मागणी योग्य आहे!हे काम सत्ताधा-यांचे आहे! आम्ही यावर विषयावर आम्ही चर्चा करून,पण आपण आपली तब्येतीची काळजी घ्यावी "अशी विनंतीवजा सूचना केली! त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आजाद मैदान येथे शीतलताई करदेकर यांची भेट घेऊन तब्येतीचे विचारपूस केली तसेच "पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ असायला हवे ही रास्त मागणी असून किमान वेतनासारखे अनेक प्रश्न आहेत ते यामुळे मार्गी लागतील ! माई च्या शीतल करदेकर व सहकाऱ्यांनी माध्यमकर्मींसाठी उभारलेल्या लढ्याला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे" असे जाहीर केले. काँग्रेस चे माजी आमदार गाडगीळ दिनेश महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी कृष्णा भोयर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला .
गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विशेष दालनात भेट घेऊन शीतलताईंची असलेली प्रमुख मागणी म्हणजे "पत्रकारांसाठी महामंडळ" बनाव याबाबत निर्देश दिले शीतल करदेकर यांच्याशी बैठक करुन मार्ग काढावेत याबाबत चे लेखी निर्देश माई च्या निवेदनावर आपले माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांना दिले तसेच आता आपले आमरण उपोषण मागे घ्यावे ही विनंती शीतल करदेकर यांना केली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन शीतलताईंनी आंदोलन मागे घेतले ! त्यांना,आ.प्रसाद लाड व आ.नितेश राणे यांनी इलेक्ट्रॉल पाणी पाजून उपोषणाची सांगता केली . मा आमदार अनंत गाडगीळ दिनेश राणे, सचिव ( संघटण) मूलभूत अधिकार संघर्ष समिती , उद्योजक के रवी, यांनी भेटुन पाठिंबा दिला! देेवराई चळवळीचे प्रणेते प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे, अ भा मराठी नाट्य नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले,अभिनेते अंशुमन विचारे, अ भा मराठी चित्रपट महामंडळाचे मा अध्यक्ष विजय पाटकर , रंगभूमि परिनिरिक्षण मंडळाच्या मा सदस्य ज्योति निसळ व सामाजिक कार्यकर्त्या सुचेता मोरे यांनी विडिओ द्वारे तर अनेक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेटून व फोन वरुन आमरण उपोषणास पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी हे महामंडळ करण्यासाठी विनंतीवजा आवाहन केले. आ बच्चुभाऊ कडू यांनी विधानसभेत इलेक्ट्रॉनिक मिडीयातील असमान वेतनाबाबत विषय मांडून महत्वपूर्ण विषय ऐरणीवर आणला.
आझाद मैदानावर मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने सुरू असलेल्या शीतलताईं च्या आमरण उपोषणास माईचे संस्थापक सरचिटणीस डॉ.सुभाष सामंत,मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस, सहकोषाध्यक्ष चेतन काशीकर,संस्थापक सदस्य शेखर धोंगडे,डाॅ अब्दुल कदीर, लक्ष्मिकांत घोणसे पाटील, सुनील कटेकर,प्रवीण वाघमारे,गणेश तळेकर,अनिल चासकर,पराग सारंग,भुपेश कुंभार, चंद्रशेखर पाटील, भूषण मांजरेकर,विवेक कांबळे, चंद्रशेखर पाटील,दीपक चिंदरकर,सुभाष डुबळे,शशिकांत जाधव यांच्यासह अनेक सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. या लोकशाही हितासाठी केलेल्या मूलभूत चळवळीस दिलेल्या पाठिंब्याबद्दल सुभाष सामंत यांनी सर्वाचे आभार मानले. *तर जोपर्यत त्यात लोटांंगणधारी बाद संघटना सहभागी न होता* *महामंडळ कार्यान्वित होत नाही तोवर आमची लढाई सुरु राहील* *या एका दशकाच्या लढाईला मुर्त रुप येताना खूप काटेकोरपणे काम होण्याची गरज आहे , असे स्पष्ट मत शीतल करदेकर यांनी व्यक्त केले.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.