पेटीएमने १,५०२ कोटी रूपयांचा कार्यसंचालन महसूल संपादित केला
July 28, 2024
0
पेटीएमने १,५०२ कोटी रूपयांचा कार्यसंचालन महसूल संपादित केला
मुंबई: पेटीएमने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीसाठी आर्थिक निकालांसाठी घोषणा केली आहे, ज्यामधून विविध घटकांमधील सुधारणा निदर्शनास येते. कंपनीने १,५०२ कोटी रूपयांच्या कार्यसंचालन महसूलासह ७९२ कोटी रूपयांच्या ईबीआयटीडीए तोट्याची नोंद केली आहे. कंपनीसाठी नुकतेच व्यत्ययांचा संपूर्ण आर्थिक परिणाम आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत दिसून येऊ शकतो. कंपनीने सांगितले की व्यापारी पेमेंट मेट्रिक्स जसे जीएमव्ही, जलद व्यापारी सक्रियकरण आणि वाढत्या व्यापारीवर्गासह खर्च कमी करण्यासाठी सातत्याने केले जाणारे प्रयत्न यामुळे महसूल व नफ्यामध्ये वाढ होईल.
आर्थिक सेवांमधून महसूल २८० कोटी रूपये राहिला, तर विपणन सेवांमधून महसूल ३२१ कोटी रूपये राहिला. तिमाहीदरमयान योगदान नफा ७५५ कोटी रूपये राहिला, ज्यामध्ये मार्जिन ५० टक्के होते.
पेटीएमचे प्रवक्ते म्हणाले, “आम्हाला आमच्या व्यापारी कार्यसंचालन मेट्रिक्समध्ये सुधारणा आणि आमच्या ग्राहकवर्गामध्ये स्थिरता दिसून येत आहे, ज्यामधून आमची रिकव्हरीची गती निदर्शनास येते. तसेच, यामधून आमच्या प्लॅटफॉर्मवरील आमचे व्यापारी सहयोगी व ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास देखील दिसून येतो आणि आम्ही ही निष्ठा दाखवण्यासाठी आमच्या भागधारकांचे आभार व्यक्त करतो. पहिल्या तिमाहीत नुकतेच व्यत्ययांचा परिणाम दिसण्यात आला असला तरी आम्हाला भविष्यात शाश्वत विकास होत राहण्याचा विश्वास आहे.''
कंपनीच्या ताळेबंदमध्ये ८,१०८ कोटी रूपये रोख आहे. तसेच, कंपनीचा पेपे कॉर्पोरेशनमध्ये ५.४ टक्क्यांचा स्टॉक संपादन अधिकार आहे.
पेटीएम ग्राहकांना कर्ज, संपत्ती उत्पादने व विमा अशा श्रेणींमध्ये त्यांच्या गरजांनुसार सर्वोत्तम सेवा देते. कंपनीने सांगितले की व्यापारी माहितीचा वापर करत कंपनीला त्यांच्या शॉप इन्शुरन्स सेवांच्या वितरणामध्ये उत्तम समन्वय दिसण्यात आला आहे. ग्राहकांसंदर्भात, एम्बेडेड व डीआयवाय विमा उत्पादने जसे मोटर विमाची उत्तम प्रगती दिसण्यात आली आहे. आरोग्य विमासंदर्भात, पेटीएम आरोग्य विमा, आरोग्यसेवा व ओपीडी फायदे यांचा समावेश असलेल्या उत्पादनांची श्रेणी देत आहे आणि व्यापारी सहयोगींसाठी संरक्षण प्लॅन्स देखील लाँच केले आहेत.
कंपनीने सांगितले की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर साइनअप केलेल्या नवीन व्यापाऱ्यांची आकडेवारी जानेवारी २०२४ पातळ्यांवर पोहोचली आहे. तसेच, निष्क्रिय व्यापाऱ्यांकडून नवीन व्यापाऱ्यांकडे डिवाईसेसचे हस्तांतरण करण्याच्या प्रयत्नांमुळे व्यापारी ग्राहकवर्ग (किंवा डिवाईस मर्चंट्स) १.०९ कोटींपर्यंत वाढला आहे. नोएडा-स्थित पेमेंट्स कंपनीने सांगितले की, कंपनीला निव्वळ डिवाईस मर्चंट आकडेवारी आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत आधीच्या दरापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. मर्चंट पेमेंट्स कार्यसंचालन मेट्रिक्स पुन्हा जानेवारी २०२४ पातळ्यांवर परतले.
दैनंदिन सरासरी जीएमव्ही (विघ्न आणणारी उत्पादने वगळून) तिमाहीदरम्यान सतत सुधारणा दाखवत आहे आणि सकारात्मक राहत जानेवारी २०२४ पातळ्यांपर्यंत पोहोचत आहे. एकूण जीएमव्ही दर महिन्याला वाढत आहे आणि जून तिमाहीसाठी ४.३ लाख कोटी रूपये आहे.