विजय सेल्सचा 'बॅक टू स्कूल' सुपर सेल
July 22, 2024
0
विजय सेल्सचा 'बॅक टू स्कूल' सुपर सेल
~ विद्यार्थ्यांसाठी आवश्यक गोष्टींवर मोठी बचत ~
मुंबई: विजय सेल्स या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनेल रिटेल चेनने 'बॅक टू स्कूल' सुपर सेलची घोषणा केली आहे. सुरू असलेला सेल आधुनिक काळातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स व अॅक्सेसरीजच्या व्यापक श्रेणीवर मोठी बचत देतो. लॅपटॉप्सपासून ट्रेण्डी स्मार्टवॉचेसपर्यंत विजय सेल्सकडे शाळेत परतणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वकाही आहे.
विजय सेल्सचे संचालक श्री. निलेश गुप्ता म्हणाले, ''विजय सेल्समध्ये आम्हाला शिक्षणामधील यशासाठी योग्य साधने असण्याचे महत्त्व माहित आहे. आमचा 'बॅक टू स्कूल' सुपर सेल विद्यार्थ्यांना व पालकांना अविश्वसनीय किफायतशीर दरांमध्ये उच्च दर्जाचे इलेक्ट्रॉनिक्स उपलब्ध करून देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. तुम्ही असाइनमेंट्ससाठी नवीन लॅपटॉप, डिजिटल टेक्सटबुक्ससाठी टॅब्लेट किंवा अध्ययन अनुभव वाढवण्यासाठी अॅक्सेसरीजचा शोध घेत असाल तर आम्ही आमच्या उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणीमध्ये अद्वितीय डिल्ससह या सुविधा देत आहेत.''
प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटिंग क्षमता:
विजय सेल्स येथील कम्प्युटिंग डिवाईसेसची व्यापक श्रेणी शिक्षणामध्ये उत्तम कामगिरी करण्यास सज्ज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण आहे. असाइनमेंट्स व ऑनलाइन क्लासेसकरिता लॅपटॉप्स फक्त १३,९९० रूपयांपासून उपलब्ध आहेत. अधिक पोर्टबल पर्यायाला प्राधान्य देणाऱ्या आणि चालता-फिरता ई-बुक्सचे वाचन व नोट्सची नोंद करायला आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विजय सेल्स टॅब्लेट्सवर जवळपास ५० टक्के सूट देत आहे.
स्मार्ट डिवाईसेससह कनेक्टेड राहा:
६,४९९ रूपये या किफायतशीर किमतींपासून सुरू होणाऱ्या स्मार्टफोन्सवर आकर्षक डिल्ससह अभ्यास पूर्ण करण्यासोबत सामाजिक जीवनाशी संलग्न राहा. डिवाईसला पूरक असे ५९९ रूपयांपासून सुरू होणारे ट्रूली वायरलेस स्टिरिओ इअरबड्स आहेत, जे ऑनलाइन क्लासेससाठी किंवा अभ्यासादरम्यान संगीत ऐकण्याचा आनंद घेण्यासाठी परिपूर्ण आहेत. विजय सेल्सकडे फक्त १४९ रूपयांपासून सुरू होणारे इअरफोन्स आणि हेडफोन्सची व्यापक श्रेणी देखील आहे.
उत्पादकतेला चालना देण्यासाठी टेक अॅक्सेसरीज:
आमच्या अॅक्सेसरीजच्या श्रेणीसह स्टडी सेटअप सर्वोत्तम करा. ८९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या ट्रेण्डी स्मार्टवॉचेससह वेळेचे कार्यक्षमपणे व्यवस्थापन करा आणि स्टायलिश देखील दिसा. विजय सेल्स ११९ रूपयांपासून सुरू होणारे मोबाइल अॅक्सेसरीज आणि १४९ रूपयांपासून सुरू होणारे कम्प्युटर अॅक्सेसरीज देत आहे, ज्यामुळे उत्पादनक्षम शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक असलेली सर्व साधने तुम्हाला उपलब्ध होतील. सर्व टेक अॅक्सेसरीजना सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी ४९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या प्रबळ व स्टायलिश बॅग्जची श्रेणी पाहायला विसरू नका.
अविश्वसनीय दरांमध्ये अॅप्पल उत्पादने:
अॅप्पल इकोसिस्टममध्ये गुंतवणूक केलेल्यांसाठी विजय सेल्स संपूर्ण श्रेणीवर अपवादात्मक डिल्स देत आहेत. ५१,०९० रूपयांपासून सुरू होणारे आयफोन्स, २६,५०० रूपयांपासून सुरू होणारे आयपॅड्स आणि ६७,५९० रूपयांपासून सुरू होणारे शक्तिशाली मॅकबुक्स यांच्यासह अध्ययन अनुभव अधिक उत्तम करा. ९०० रूपयांपासून सुरू होणाऱ्या अॅक्सेसरीज, २८,९९० रूपयांपासून सुरू होणारे अॅप्पल वॉचेस् आणि १९,००० रूपयांपासून सूरू होणारे एअरपॉड्स यांच्यासह अॅप्पल सेटअप परिपूर्ण करा. या किमतींमध्ये आयसीआयसीआय आणि एसबीआय बँक कार्डवर त्वरित सूटचा समावेश आहे.
विशेष बँक ऑफर्स:
आमच्या पेमेंट पार्टनर ऑफर्ससह अधिकाधिक बचत करा. जवळपास ७,५०० रूपयांची त्वरित सूट, तसेच एचडीएफसी बँक, अॅमेक्स, येस बँक, वनकार्ड आणि मोबिक्विकसह नो कॉस्ट कॉस्ट ईएमआय पर्यायांचा आनंद घ्या.