Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्विस ब्‍युटीने प्रीमियम मेकअप श्रेणी 'स्विस ब्‍युटी सिलेक्‍ट' लाँच केली

स्विस ब्‍युटीने प्रीमियम मेकअप श्रेणी 'स्विस ब्‍युटी सिलेक्‍ट' लाँच केली
मुंबई: स्विस ब्‍युटी हा भारतातील आघाडीचा मेकअप ब्रँड स्विस ब्‍युटी सिलेक्‍टच्‍या लाँचसह ११वा वर्धापन दिन साजरा करत आहे. ब्रँडच्‍या सर्वोत्तमेच्‍या वारसाला अधिक दृढ करत हे नवीन कलेक्‍शन प्रीमियम श्रेणीमध्‍ये ब्रँडच्‍या प्रवेशाला सादर करते. भारतभरातील सूक्ष्‍मदर्शी सौंदर्यप्रेमींच्‍या सर्वसमावेशक पसंतींची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली स्विस ब्‍युटी सिलेक्‍ट हायब्रिड मेकअप श्रेणी म्‍हणून काळजीपूर्वक तयार करण्‍यात आली आहे. या श्रेणीमध्‍ये स्किनकेअर व मेकअपचे परिपूर्ण मिश्रण आहे. उत्‍पादनांमध्‍ये लिक्विड लिपस्टिक्‍स, बुलेट लिपस्टिक्‍स, आयशॅडो, मस्‍करा अशा विविध श्रेणींचा समावेश आहे आणि ब्रँडची प्रत्‍येक महिन्‍याला नवीन उत्‍पादने सादर करण्‍याची योजना आहे. हिरो म्‍हणून मेकअपसह नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या कलेक्‍शनमध्‍ये व्हिटॅमिन ई, कोकोनट वॉटर एक्‍स्‍ट्रॅक्‍ट्स आणि इतर उच्‍च दर्जाच्‍या स्किनकेअर घटकांचा समावेश आहे. या कलेक्‍शनमधील उत्‍पादने उत्‍पादन कार्यक्षमता वाढवण्‍यासाठी मायक्रो-ट्यूबिंग आणि हिल्‍युरिप तंत्रज्ञान यांसारख्‍या अत्‍याधुनिक व उच्‍च तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाइन करण्‍यात आली आहेत, ज्‍यामधून वापरकर्त्‍यांना स्किनकेअर व कलर कॉस्‍मेटिक्‍सचा उत्तम अनुभव मिळेल. कलेक्‍शनमधील उत्‍पादने डर्माटोलॉजिकली चाचणी केलेली, वीगन आणि दोष-मुक्‍त आहेत, ज्‍यामधून ब्‍युटी व स्किनकेअरमध्‍ये उच्‍च नैतिक मानकांप्रती स्विस ब्‍युटीची समर्पितता दिसून येते. स्विस ब्‍युटी सिलेक्‍ट पहिल्‍या तीन महिन्‍यांसाठी फक्‍त नाइकावर, तसेच कंपनीची वेबसाइट स्विसब्युटीडॉटइनवर उपलब्‍ध आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना सुलभपणे श्रेणी उपलब्‍ध होईल.
सह-संस्‍थापक व संचालक श्री. मोहित गोयल म्‍हणाले, ''भारतीय ब्‍युटी उद्योगामध्‍ये ११ वर्षांपासून उपस्थिती असण्‍यासह स्विस ब्‍युटीने ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांबाबत सखोलपणे जाणून घेतले आहे. स्विस ब्‍युटी सिलेक्‍ट नाविन्‍यता व दर्जाप्रती आमच्‍या कटिबद्धतेला सादर करते, तसेच प्रीमियम उत्‍पादने देते, जी आजच्‍या सौंदर्यप्रेमींच्‍या अत्‍याधुनिक प्राधान्‍यक्रमांची पूर्तता करतात. आम्‍ही नवीन उत्‍पादने लाँच करण्‍यासोबत प्रीमियम ब्‍युटी मानकांना नव्‍या उंचीवर देखील घेऊन जात आहोत. हे लाँच सर्वांना उच्‍च-कार्यक्षम ब्‍युटी उपलब्‍ध करून देण्‍याप्रती आमच्‍या प्रवासामधील नवीन चॅप्‍टर आहे.'' स्विस ब्‍युटीचे भारतातील ५५० शहरांमध्‍ये २५,५०० रिटेल टचपॉइण्‍ट्सचे नेटवर्क आहे आणि द्वितीय श्रेणीच्‍या व स्‍मार्ट शहरांमध्‍ये प्रवेश करत रिटेल टचपॉइण्‍ट्सची आकडेवारी ३०,००० पर्यंत वाढवण्‍याची योजना आहे. ब्रँडचा आर्थिक वर्ष २५ पर्यंत एक्‍सक्‍लुसिव्‍ह आऊटलेट्सची संख्‍या दुप्‍पट करत २४ पर्यंत वाढवण्‍याचा देखील मनसुबा आहे. आपल्‍या उत्‍पादनांना अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍यासाठी स्विस ब्‍युटी भारतभरात अतिरिक्‍त १४७ ब्‍युटी-असिस्‍टेड आऊटलेट्स देखील सुरू करणार आहे आणि या आर्थिक वर्षामध्‍ये ४५० हून अधिक टचपॉइण्‍ट्सची भर देखील करणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.