Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आई बहिणीवरून अपशब्द बोलणाऱ्यांविरोधात कडक कायदा करा! - डॉ. भारती लव्हेकर, आमदार

*आई बहिणीवरून अपशब्द बोलणाऱ्यांविरोधात कडक कायदा करा! - डॉ. भारती लव्हेकर, आमदार - वर्सोवा विधानसभा* आम्ही आई बहिणीवरून शिव्या कधीही सहन करणार नाही. आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांविरोधात कडक कायदा झालाच पाहिजे!'' अशी मागणी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची विधानसभेत केली.
महाराष्ट्राच्या २०२४-२५ अर्थसंकल्पाला समर्थन देताना आज विधानसभेत वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर म्हणाल्या की, मी नेहमी बघते, विधानसभा असो विधानपरिषद असो किंवा बाहेरचे लोक नेहमी आई बहिणीवरून शिव्या दिल्या जातात. आई बहिणीवरून शिव्या देणे, हा आम्हा महिलांच अपमान नाही का? ह्या संदर्भात एक कठोर कायदा असला पाहिजे. आई बहिणीवरून जर कुणी शिव्या दिल्यात तर ते आम्ही खपवून घेणार नाही. यापुढे आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्याच्या विरोधात कडक कायदा आणावा! तसेच ही मागणी करण्या पूर्वी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्यातील महिलांसाठी आणलेल्या अनेक योजनांसाठी आभार मानले. सर्व योजनांचे कौतुक करून त्या महिलांसाठी कशा लाभदायी आहेत ते सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.